गोपीनाथ मुंडेंना जाऊन सहा वर्षापेक्षा जास्त काळ झाला मात्र मुंडेंच्या आठवणी नेहमीच चर्चेत असतात. गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या देखील. पण त्यांच्या मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची खूप चर्चा झाली होती. निवडणुकी आधीच मुंडेंची उमेदवारी रद्द करण्यात आली. शरद पवारांनीच उमेदवारी रद्द करायला लावली असल्याचे आरोप मुंडेंनी केले होते. हा किस्सा आहे २०१३ चा.
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक.
आपल्या देशात क्रिकेटचं काय महत्व आहे हे सांगायला नको. क्रिकेट मंडळावर जाण्यासाठी सगळे राजकारणी धडपड करत असतात. त्यामुळे क्रिकेट आसोसिएशन निवडणूक आली कि राजकारणी त्यात हमखास भाग घेतात. जून २०१३ ला मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लागली होती. भाजपचे गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार एकमेकांच्या आमने सामने होते. आज पर्यंत मुंबई क्रिकेटच्या मंडळाच्या निवडणुका फार सहज होत असत पण दोन पक्षाचे मोठे नेते आमने सामने लढत असल्यामुळे निवडणूक रंगतदार झाली होती. मुंडे जिंकणार कि पवार बाजी मारणार या चर्चा महाराष्ट्रात रंगल्या होत्या.
निवडणुकीत मुंडेंचा अर्जच बाद ठरवला
मोठा गाजावाजा करत गोपीनाथ मुंडे यांनी निवडणुकीसाठी अर्ज केला होता. आता पर्यंत कधी न हरणारे शरद पवार मुंबई क्रिकेटच्या निवडणुकीत पराभूत होतील असाच मुंडे प्रचार करत होते. शरद पवारांचे विरोधक त्यांचा पराभव करण्यासाठी मेहनत करत होते. प्रचार जोरात चालू असताना अचानक मुंडेंना जोरदार धक्का बसला. मुंबई क्रिकेट असोसिशन निवडणूक अधिकाऱ्यांनी गोपीनाथ मुंडेंचा अर्ज बाद केला. निवडणुकीसाठी उमेदवार व्हायचे असल्यास उमेदवाराला मुंबईचा नागरिक होणे गरजेचे होते. गोपीनाथ मुंडे मुंबईचे नागरिक नव्हते. परळीमध्ये त्यांची नागरिकता होती. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा फॉर्म अर्ज ठरवला होता. गोपीनाथ मुंडे निवडणुकीतून बाहेर पडल्यामुळे शरद पवार यांच्या समोर विरोधकच उरला नाही आणि पवार सहज निवडणूक जिंकले.
शरद पवारांनीच मुंडेंचा अर्ज बाद करायला लावला?
गोपीनाथ मुंडेंची मुंबई क्रिकेट मंडळाची ही पहिलीच निवडणूक होती. पण त्यांचे विरोधक शरद पवार खूप दिवसांपासून क्रिकेट मंडळांवर काम करत होते. भारतीय क्रिकेट मंडळ आणि जागतिक क्रिकेट मंडळावर देखील शरद पवार अध्यक्ष राहिले होते. मुंबई क्रिकेट मंडळामध्ये शरद पवारांचा प्रभाव जास्त होता. पराभवाच्या भीती मुळेच शरद पवारांनी त्यांचा प्रभाव वापरून माझी उमेदवारी रद्द करायला लावली असल्याचे आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केले होते. शरद पवारांनी मात्र गोपीनाथ मुंडेंचे आरोप फेटाळून लावले. गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवायला आपल्याला आवडले असते असे शरद पवार म्हणाले होते.
हे खास आपल्यासाठी
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
संघाच्या शाखांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी १० हजार तिरंगा शाखा काढणार