आपल्या देशात नेत्यांवर अनेक आरोप होतात. अनेक महाशय तर जेलमध्ये गेले आहेत. पण देशाच्या माजी पंतप्रधानांवर “कोंबड्या आणि अंडे” चोरल्याचे हास्यास्पद आरोप देखील झाले आहेत. आणीबाणीनंतर जनता दलाचे सरकार आल्यावर इंदिरा गांधींवर असे आरोप झाले होते. नेमकं हे प्रकरण काय होते हे समजून घेऊ तर हा किस्सा आहे १९७८ चा.
आणीबाणीमुळे इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण गेलं
देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे कारण देऊन इंदिरा गांधी यांनी १७७५ च्या जून मध्ये आणीबाणी लावली. आणीबाणी मध्ये सर्व नागरिकांचे मूलभूत अभिकर काढून घेतेले होते. सरकारच्या विरोधात बोलायची परवानगी नव्हती. देशभरातल्या सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक केली होती. जयप्रकाश नारायण ,मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी सारखे नेते गजाआड होते. पोलिसांकडून जनतेला सतावण्याचे काम चालू होते. ह्या काळात देशभर दहशतीचं वातावरण झालं होत. देशातील जनता इंदिरा गांधी यांच्या विरोधात गेली होती.
शेवटी १९ महिन्यानंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली आणि देशात निवडणूक लावल्या. १९७७ च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी आणि काँग्रेसचा मोठा पराभव झाला. देशात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात जनता दल सत्तेत आलं
जनता दल इंदिरा गांधींच्या हात धुवून मागे लागले
आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी विरोधी पक्षातल्या नेत्यांना प्रचंड त्रास देण्याचे काम केले होते. त्यांना पूर्ण आणीबाणीच्या काळात जेल किंवा अज्ञातवासात राहावे लागले होते. त्यामुळे सत्तेत आल्यावर इंदिरा गांधींनी दिलेल्या त्रासाचा ते बदला घेणार हे साहजिकच होते. जनता दलाचं सरकार स्थापन झाल्यावर काहीच दिवसात इंदिरा गांधीना त्रास देण्यास सुरुवात झाली होती. पोलीस यंत्रणांना इंदिरा गांधींच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते..गृहमंत्री असलेले चौधरी चरण सिंग तर इंदिरा गांधी याना अटक करण्यासाठी उतावीळ झाले होते. ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली त्याची त्यांना शिक्षा मिळायला हवीच अशीच चौधरी चरणसिंग यांची भूमिका होती.
आणीबाणीच्या काळात झालेल्या सर्व व्यवहारांची चौकशी केली गेली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरॊप लावण्यात आले. सरकारकडूनच इंदिरा गांधींना त्रास देण्याचे आदेश असल्यामुळे पोलीस तर सुसाट सुटले होते. त्यांना कसलेही भान राहिले नव्हते. मणिपूरच्या एका गुन्ह्यात तर जनता दल सरकारने हद्द केली. मणिपूर मध्ये इंदिरा गांधी यांच्या विरोधात कोंबड्या आणि अंडे चोरल्याचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलन केले होते. जनता दलाने असे सुडाचे आणि बिनबुडाचे आरोप केल्यावर साहजिकच याचा त्रास आणि पुढे फायदा पण इंदिराजींना झाला. हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत पण यामुळे इतिहासात एका गंमतीदार घटनेची नोंद झाली.
हे खास आपल्यासाठी
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
संघाच्या शाखांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी १० हजार तिरंगा शाखा काढणार