MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

युक्रेनवरून अमेरिका रशिया मध्ये कधीही युद्ध होऊ शकत.

१९९१ ला सोविएत रशिया तुटला तेंव्हा आता अध्यक्ष असलेले पुतीन रशियन सुरक्षा विभागात होते. रशियाचे विभाजन पुतीन त्यांना आवडले नव्हते. विसाव्या शतकातली सगळ्यात वाईट घटना झाली असल्याची प्रतिक्रिया पुतीन याना सोवियत संघाच्या विभाजनावर दिली होती.

रशियाची सुरक्षा करायची असेल तर आपल्याला शेजारी राष्ट्रांवर हल्ला करावाच लागेल. नाहीतर आपले राष्ट्र गेले म्हणूनच समाजा. असे स्पष्ट मत पुतीन यांनी अनके वेळा बोलून दाखवले आहे. पुतीन यांच्या बोलण्याला रशियन इतिहासाचा संदर्भ आहे. १८ व्या शतकातल्या रशियन राजा’ रेगनंट’ याने आपल्या सहकार्याना रशियाच्या सुरक्षे बाबतीत असे भाष्य केले होते. शेजारी राज्यांवर हल्ला करण्याची त्याची योजना होती. राज्याच्या भाषणाने त्याचे सहकारी हल्ल्याला तयार झाले. रशियाने प्रथम हल्ले करून आजूबाजूचे देशे जिंकले आणि जगातला सगळयात मोठा देश बनला.

स्व -सुरक्षेचे कारणं पुढं करून कमजोर देशांवर हल्ला करायची रशियाची नीती आजगायत चालू आहे. त्याच नीतीला पुढे नेत रशिया युक्रेनवर हल्ला कारण्याची तयारी करत आहे.

२०१४ मध्ये युक्रेन मध्ये सरकार बदललं पण हा बदल पुतीन याना आवडला नाही.

युक्रेन सोविएत संघाचा भाग होता. १९९१ ला सोवियत संघ तुटल्यावर तो वेगळा झाला. पण युक्रेनच्या राजकारणामध्ये रशियाचा हस्तक्षेप नेहमी असायचा. २०१४ प्रयत्न सगळं ठीक चालू होत. पण २०१४ ला रशियाने युक्रेनचा क्रिमिया हा भाग सैन्याच्या बळावर हिसकावला आणि सगळं राजकारण बदलून गेलं. क्रिमिया गेल्यामुळे युक्रेनचे लोक रशियाच्या विरोधात गेले. २०१४ पर्यंत युक्रेनचं सरकार रशियाच्या बाजूचे होते म्हणजे सरकारमधील काही लोक पुतीन यांच्या प्रभावाखाली होते. त्यामुळे पुतीन धार्जिण्या सरकारला युक्रेनच्या जनतेने बदलून टाकले. २०१४ मध्ये युक्रेनमध्ये लोकशाहीवादी सरकार आले. युक्रेनच्या जनतेनं निवडून दिलेलं सरकार लोकशाहीवादी नसून अमेरिकेने रशियाच्या विरोधात बनवलं असल्याचा आरोप सरकार पुतीन तेंव्हा पासून करत आहेत .

युक्रेन नाटोमध्ये सहभागी होत असल्याने पुतीन युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत.

युक्रेनच सरकार अमेरिकेन बनवलं असल्याचे पुतिनचे आरोप खरे कि खोटे कोणाला माहिती नाही. पण युक्रेनचे सरकार अमेरिकेचं समर्थन नक्की करतं. रशियाने आधीच क्रीमिया हिसकावल्याने युक्रेनचा रशियावर विश्वास राहिला नाहीं. त्यामुळे रशियाचा मुकाबला करायचा असेल तर युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्याशिवाय पर्याय नाही. युरोप आणि अमेरिकन देशांची मिळून नाटो ( NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION ) हि एक सुरक्षा संघटना आहे. नाटोच्या नियमानुसार सभासद देशावर हल्ला केल्यावर तो पूर्ण संघटनेच्या देशावर हल्ला समजला जातो. त्यामुळेच युक्रेनला नाटोमध्ये सहभागी व्हायचे आहे. पुतीन यांच्या रशियाचा धोका त्यांच्या समोर असल्याने त्यांना नाटोची गरज आहे. काहीच दिवसात युक्रेन नाटोमध्ये सामील होईल. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यावर रशिया कधीही युक्रेनवर हल्ला करू शकणार नाही. कारण तो हल्ला नाटो वर केला असं समजलं जाईल .

पण रशियाची दुसरीच समस्या आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाला तर रशियाच्या ५०० किमी अंतरावर अमेरिकन सैन्य युक्रेन पर्यंत येईल. त्यामुळे रशियाला धोका होऊ शकतो. धोका असल्यामुळेच रशिया युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाख सैन्य आणले आहे. ते कधीही युक्रेनवर चढाई करू शकतात.

अमेरिका रशियावर हल्ला करेल का ?

जागतिक राजकारणात रशिया आणि अमेरिका एकमेकांनाचे दुश्मन आहेत. त्यामुळे शत्रूचा शत्रू आपला दोस्त या नीती नुसार युक्रेन अमेरिकेचा दोस्त झाला आहे. त्यात युक्रेन नाटो मध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळं युक्रेनची जबादारी अमेरिकेवर आली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा व्यवहार बघता ते कधीही युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश देऊ शकतात. त्यामुळे जर रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर जो बायडन यांना प्रतिहल्ला करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

युक्रेनमुळे अमेरिका आणि रशिया एकमेकांसमोर येऊ शकतात. चेंडू आता पुतीन यांच्या कोर्टात गेला आहे. जर पुतीन यांनी युक्रेन वर हल्ला करण्याचे आदेश त्यांच्या सैन्याला तर अमेरिकेला युद्धात उतरावेच लागेल. पुतीन काय निर्णय घेतात हे महत्वाचे आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.