MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

चहाच्या टपरीवर दिसणाऱ्या QR कोडवाला दिवसाला २० करोड कमवतो.

ashneer grover net worth

“माझं पाकीट रूमवर राहिलंय तेवढं नाश्त्याचे बिल दे. रूमवर गेलो कि लगेच देतो” एखादा भुरटा दोस्त असतो जी पहिले ही शक्कल लढवून फुकटात नाश्ता खायचा. पण आता ही सोय राहिली नाही. पाकीट नसलं तरी काय फरक पडत नाही मोबाईल आहे ना मग बिल चुकवायला मार्ग नाही. आज टपरीवाला असू दे नाहीतर सोने विकणारा असू दे सगळ्यांना QR कोड लागतोच. गूगल पे, फोन पे आणि पेटीम यांनी लोकांना कॅशलेस फिरायचा इतका कॉन्फिडन्स दिलाय कि दोन रुपयाची गोळी घ्यायचं म्हणलं तरी माणूस सुट्टे दोन रुपये ठेवत नाही. रोज लाखो रुपये या माध्यमातून देवाण घेवाण चालू असते. पण अजून लोकांना कळालं नाही कि हे फुकटात QR वाटणारे पैसे कसे कमवतात. गूगल पे मोठी कंपनी आहे त्यांना काही तरी भविष्यात प्लॅन असेल म्हणून नुकसान सहन करत असेल असं काही लोकांना वाटतं. पण या सगळ्यात भारत पे सारखी लहान कंपनी कस काय तग धरते हा अनेकांना प्रश्न आहे. म्हणून हा विषय फक्त ‘भारत पे’ आणि त्याचा संस्थापक अशनीर ग्रोव्हर बद्दल.

अशनीर ग्रोव्हर हा दिल्लीस्थित IIT मध्ये शिकलेला तरुण सुरवातीपासूनच नवीन काही तरी करण्याच्या शोधात होता. २००४ मध्ये IIT चे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर अशनीर ग्रोव्हरला फ्रान्सला जाण्याची संधी मिळाली. यामुळे अशनीरला पुढील शिक्षणाचा सर्व खर्च एक संस्थेकडून मिळाला. २००४ ते २००६ या काळात अशनीर फ्रांसमध्ये राहिला. २००६ ला IIM अहमदाबाद मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला. अहमदाबाद नंतर अशनीरला पहिली नोकरी मिळाली ती कोटक बँकेत. बँकेत जवळपास सात वर्षे त्याने नोकरी केली. या काळात बॅंकिंग क्षेत्राचा एक तगडा अनुभव पाठीशी आला. अशनीर अजूनही अशा शोधात होता ज्यामुळे त्याला काही तरी वेगळी ओळख मिळेल. बँकिंगच्या कामानंतर एका मित्राने ग्रोफर्स या नवीन व्यवसायाबद्दल सांगितले. ग्रोफर्स ही घरपोच किराणा देणारी कंपनी आहे. अशनीरने या कंपनीत शून्यातून कामाला सुरुवात केली. पहिल्या पेक्षा कमी पगारात त्याने ग्रोफर्स मध्ये काम केलं. या काळात अशनीरला खूप काही शिकायला मिळालं. एखादा व्यवसाय शून्यातून कसा उभारावा हे प्रशिक्षण इथेच त्याला मिळालं. ग्रोफर्समध्ये कधी काळी दिवसाला एकही ग्राहक नसायचा तिथे अशनीरच्या प्रयत्ननातून दिवसाला तीस हजार ग्राहक गोफर्स वरून ऑर्डर करायला लागले. कंपनीला इतक्या मोठ्या पातळीवर घेऊन गेला तरीही त्याला काही कारणास्तव ग्रोफर्स सोडावी लागली.

आयुष्यात थांबणं हे एखाद्या मोठ्या गोष्टीची सुरुवात असू शकते. अशनीरसाठी ग्रोफर्स सोडणे फायद्याचं ठरलं. ग्रोफर्सनंतर काही दिवस अशनीरने PC ज्वेलर्स मध्ये करायला सुरुवात केली. यामुळे दुकानदारांची मानसिकता काय असते हे यादरम्यान अशनीरने अभ्यास केला. थोड्यात दिवसात PC ज्वेलर्स सोडले पण यांनतर काही तरुण जलद पेमेंट यंत्रणेवर काम करत होते आणि ते अशनीरच्या संपर्कात आले. सर्वजण खूप तरुण म्हणते त्यामुळे अशनीर थोडा साशंक होता. पण या तरुणांना तंत्रज्ञान चांगले अवगत होते. अशनीरला बँकिंगचा मोठा अनुभव होता. त्यामुळे आर्थिक आणि तांत्रिक ज्ञान एकत्र करून मोठा व्यवसाय होऊ शकतो हे अशनीरला जाणवले आणि मग जन्म झाला ‘भारत पे’ चा. गूगल आणि फोन पे ला स्पर्धा होणारी होती पण त्यांनी अतिशय लहान व्यावसायिकांना टार्गेट केले. व्यावसायिकांचा महिन्याचा व्यवहार भारत पे कडे होता. त्या व्यवहारावरून भारत पे ने या लोकांना कर्ज द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी तीन हजार कोटींचे कर्ज वाटले आहे. फक्त तीन वर्षात ही कंपनी तीन बिलियन डॉलरवर पोहचली. रुपयात हा हिशोब केला तर दिवसाला २० कोटी रुपये ही कंपनी कमावते. यावरून अशनीरच्या कमाईचा अंदाज आला असेलच.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.