भारतीय वंशाचे ‘पराग अग्रवाल’ ट्विटरचे सीईओ झाल्यावर भरपूर बातम्या झाल्या. मिम बनवणाऱ्या पोरांनी पराग आणि ट्विटर वर भरपूर मिम बनवले. अनेक जण परागला टॅग करून आमचे फॉलोवर्स वाढत नाहीत. तू कर काही तरी आपण सगळे भारतीय भाऊ भाऊ नाही का ? म्हणून ट्विट करायचे. तेंव्हा कस सगळं ट्विटमय वातावरण झालं होत. हा झाला सगळा मजेचा भाग पण काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी माझे फॉलोवर्स वाढत नाहीत म्हणून ट्विटरला खरे खुरे पत्र लिहले आहे.
पत्रं लिहण्याचे कारण कि ….
आता राहुल गांधी काँग्रेस सारख्या पक्षाचे नेते. त्यामुळे त्यांचे फॉलोवर्स कमी असण्याचे कारण नाही. ट्विटरवर त्यांचे जवळ जवळ २० लाख फॉलोवर्स आहेत. पण त्यांचं असं म्हणणं आहे कि, ” माझे ट्विट खूप वायरल होतात. पण त्या पटीत माझे फॉलोवर्स काय वाढत नाहीत. म्हणजे जेवढ्या ट्विटर वापरकर्त्यां पर्यंत माझे ट्विट जाते त्यातले काही तरी फॉलोवर्स यायला पाहिजेत ना ? पण तस होत नाही. बाकी नेत्यांचे मात्र फॉलोवर्स फटाफट वाढत आहेत. त्यात आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, भारतीय जनता पार्टीचे अमित शहा, योगी आदित्यनाथ महाराज. जर ह्या नेत्यांचे फॉलोवर्स वाढत असतील तर माझ्या अकाउंटचे फॉलोवर्स वाढायला पाहिजे कि नाही ? पण तसे होत नाही. म्हणजे ट्विटर माझा आवाज दाबण्यासाठी फॉलोवर्स वाढू देत नाही. ट्विटरने हा भेद भाव केला नाही पाहिजे. ”
फॉलोवर्स कमी असले तर एवढं काय टेन्शन…
आपल्या कोणत्याही सोशल मीडिया अकॉउंटवर जा आपले फॉलोवर्स किती असतात ? तर आपल्या ओळखीचे लोक. पण आपल्याला काही फरक पडतो का ? नाहीच पडत, म्हणजे आपल्याला कोणी फॉलो केलं काय अन नाही केलं काय सारखच. मग ह्या नेत्यांना काय एवढी चिंता फॉलोवर्सची. काय आहे ह्या नेत्यांचं दुकानाचं चालत त्यांच्या फॉलोवर्सवर. ते कसं विचारालं तर जेवढे जास्त फॉलोवर्स तेवढ त्यांच काम सोपं कारण त्यांना जे सांगायचं आहे , बोलायचं आहे ते सोशल मीडिया वर लिहू शकतात. कुठं जायची गरज नाही कि कसला खर्च करायची आवश्यकता नाही. अन त्याच्याही पुढं ज्याचे जास्त फॉलोवर्स लोक त्या पुढाऱ्याला जास्त पॉवरफुल म्हणतात. त्यामुळे फॉलोवर्स वाढवणं पुढाऱ्यांच काम. ह्यात काही पुढारी यशस्वी होतात. त्यांचे वाढतात फटाफट फॉलोवर्स पण काही जणांचे वाढत नाहीत. राहुलं गांधी त्यातलेच एक. दोन वर्षांपासून १७ लाख ट्विटर फॉलोवर्स वर अडकलेत. आता दोन वर्षांपासून फॉलोवर्स वाढत नाहीत म्हंटल्यावर टेन्शन तर येणारच ना ?
ट्विटरकडून काय ऊत्तर आलं नाही.
ट्विटर असो नाहीतर दुसरे सोशल मीडियावाले लय हुशार हाईत. त्यांच्यावर कोणी आरोप केला कि अजिबात उत्तर देतं नाहीत. त्यामुळे राहुलं गांधी यांच्या पत्राला उत्तर मिळण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे राहुल गांधींनी झाकली मूठ ठेवली असती तर कोणाला कळले देखील नसते कि राहुल गांधींचे फॉलोवर्स वाढत नाहीत म्हणून. पण त्यांच्या पत्राने जग जाहीर झालं आणि विरोधकांना आणखी एक मुद्दा पण मिळाला.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !