MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने गुगलसोबत युती केलीये.

गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारती एरटेल मध्ये एक बिलियन यूएस डॉलर गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं आहे. एकूण गुंतवणुकी पैकी ७० % ते एरटेलची शेयर्स घेणार आहेत. तर उरलेली रक्कम गुगल आणि एरटेल मिळून वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये गुंतवणूक करणार आहेत.

सात वर्ष अगोदर म्हणजे २०१५ पर्यंत आयडिया, वोडाफोन, एरटेलचा एक थाट होता. थाट म्हणजे ह्यांच्या शिवाय कोणाचं काही चालायचं नाही. ह्या तीन कंपन्या त्यांच्या मनात येईल त्या भावात प्लॅन विकायचे. लोकांनाही काही पर्याय नव्हता. पण २०१५ ला भारताच्या टेलिकॉम सेक्टर मध्ये भूकंप झाला ‘जिओ’ त्याच नाव. जिओच्या एन्ट्री नंतर सगळं मार्केट बदलून गेलं.

जिओने आयडिया वोडाफोनचा बाजार उठवला.

सप्टेंबर महिन्याच्या वार्षिक सभेला संभोधित करताना मुकेश अंबानी यांनी जिओची घोषणा केली. सप्टेंबर महिन्यापासून पुढचे तीन महिने भारतातल्या सर्व शहरात ४ जी इंटरनेट आणि कॉलींग फ्री असेल. साहजिकच कॉलींग आणि इंटरनेट फ्री मिळत असल्यामुळे जिओकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित झाले. ४ जिच्या स्पीडमध्ये फ्री इंटरनेट मिळत असल्यामुळे आयडिया आणि वोडाफोनचे ग्राहक जिओत आले. कारण आयडिया आणि वोडाफोन दोन्ही कंपन्यांकडे त्यावेळेला ४ जीची सेवा नव्हती. आयडिया वोडाफोनचे गेलेले ग्राहक परत त्या कंपन्यांकडे परतले नाहीत. त्यामुळे आयडिया आणि वोडाफोन दोन्ही कंपन्या तोट्यात गेल्या. जिओच मार्केट खूप मोठं झाल्यामुळे आयडिया आणि वोडाफोन दोन्ही कंपन्यांना एकट्याने जीओला टक्कर देणे शक्य नव्हतं. आयडिया वोडाफोन दोंघांनी मिळून ‘व्ही आय’ नावाची कंपनी सुरु केली. पण तो पर्यंत जिओ खूप मोठी झाली होती. दोन्ही कंपन्या एकत्र येऊन देखील ते जिओला टक्कर देऊ शकले नाहीत. कर्ज वाढल्यामुळे भारत सरकारने व्ही आय ची ३५% टक्के भागीदारी घेतली. आयडिया वोडाफोनची ‘व्ही आय’ कंपनीत सरकारची भागीदारी मोठी झाली आहे. म्हणजे आयडिया आणि वोडाफोनचा बाजार उठलाच आहे.

जिओच्या वादळात एरटेल कशी काय टिकली ?

आयडिया वोडाफोनचे किल्ले धडाधड कोसळत असताना ‘लक्ष्मी मित्तल’ यांची भारती एअरटेल जिओच्या वादळात पण उभी आहे. जिओला ही एकच आता स्पर्धक कंपनी उरली आहे. आयडिया आणि वोडाफोन ह्या दोन्ही कंपन्यांनी भविष्यात गुंतवणूक केली नव्हती. येणारा काळ ४ जीचा आहे, हे ओळखण्यात ते कमी पडले. एअरटेल मात्र इथे जिंकली. जिओ बाजारात येण्या अगोदरच एरटेलने ४ जी आणले होते. एअरटेल म्हणजे स्पीड असा त्यांचा प्रचार आणि जाहिरात होती. जिओने आणलेले ४ जी एअरटेलकडे आधीच असल्यामुळे एअरटेलचे ग्राहक जिओकडे गेले नाहीत. जिओ बाजारात आल्यावर एअरटेल त्यांचे मनसुबे ओळखले आणि सावध पावले टाकली. एअरटेलने त्यांच्या प्लानचे भाव कमी केले. इंटरनेट स्पीड वाढवली. तोटा सहन करून पण एअरटेलने जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांचा फायदा त्यांना झाला. आयडिया आणि वोडाफोन कोसळत असताना एअरटेल मात्र तग धरून आहे.

गुगलला सोबत घेऊन एरटेल मार्केट गाजवू शकतंय…

गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारती एअरटेल मध्ये एक बिलियन यूएस डॉलर गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं आहे. एकूण गुंतवणुकी पैकी ७० % ते एअरटेलची शेयर्स घेणार आहेत. तर उरलेली रक्कम गुगल आणि एअरटेल मिळून वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये गुंतवणूक करणार आहेत. त्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्टस, ५ जी , ६ जी इत्यादी आहे. एअरटेलने अगोदरच ५ जी वर काम सुरु केले आहे. हैद्राबाद शहरात त्यांनी ४ जीची चाचणी देखील केली आहे. एअरटेलची स्वतःचे कौशल्य आणि गुगलची मदत एकत्र आली तर ते सहज जीओला टक्कर देऊ शकतात. गुगल आणि एअरटेल मध्ये तेवढी ताकद आहे. येत्या काळात गुगलच्या मदतीने एअरटेल मार्केट गाजवू शकते.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.