MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

Bitcoin पहिल्यांदा वापरलं गेलं ते पिझ्झा विकत घेण्यासाठी.

bitcoin-pizza-day-story-marathi

Crypto Currency हा अजूनही लय लोकांना न उलगडलेलं कोड आहे. पैसे मिळतेत म्हणून काही जण यात हात पाय मारतेत. काही देशांनी Crypto (आभासी) ला अधिकृत मान्यता दिली आहे अशा बातम्या चालू आहेत. पण या चलनाचा व्यवहारात कधी उपयोग होणार हे अजून पण नीट समजलेलं नाही. काही दिवसांपूर्वी भारत सरकार क्रिप्टोकरन्सी बंद करणार असल्याची कुजबुज ऐकू आली होती. यामुळे बंद काही झालं नाही पण क्रिप्टो खेळणाऱ्या लोकांना भारी तोटा झाला. मार्केट पडलं, भारी नुकसान झालं. थोडक्यात क्रिप्टो करन्सी काय आहे आधी हे बघू मग आपण पुढे जाऊ.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ?

क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल किंवा आभासी चलन आहे जी क्रिप्टोग्राफीद्वारे सुरक्षित केली जाते. ज्यामुळे बनावट खर्च करणे जवळजवळ अशक्य होते. क्रिप्टोकरन्सी हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित विकेंद्रित नेटवर्क आहेत. एकदम खोलात न जाता एवढं समजून घेतलं कि क्रिप्टो हे सुरक्षित चलन या अर्थाने एका अज्ञात व्यक्तीने निर्माण केलं आहे. त्याचा उद्देश हा होता कि क्रिप्टोचलनामुळे आर्थिक व्यवहार हे एका व्यवस्थेवर अवलंबून राहणार नाही. व्यवहाराचं विकेंद्रीकरण झाल्यास या यंत्रणेला हॅक करणे अवघड जाईल. हॅकरला पूर्ण व्यवस्था हॅक करणे सोपे जाणार नाही. आणि हाच या चलनाचा तोटा पण आहे. कारण क्रिप्टो चलनात जबाबदारी घेणारी यंत्रणा अशी कोणी नाही. तुमच्या खिशातील दहा रुपयांचा कागद भारत सरकारने अधिकृत केल्यामुळे त्याला मूल्य आहे. क्रिप्टोला असं अधिकृत करणारं कोणी नाही पण हीच याची शक्ती मानली जाते. काही देश क्रिप्टो अधिकृत करण्याच्या विचारात आहे तर काही बॅन करण्याच्या विचारात आहेत. पण या दोन्ही जणांना हे लक्षात येत नाही मुळात या चलनाला सरकारच्या मान्यतेची गरजच लागत नाही आणि दुसरी गोष्ट क्रिप्टोला ठराविक ठिकाणावरून बंद करणे शक्य असते तर ते कधीच झाले असते. क्रिप्टो चलनाचा असा काही ठराविक ठिकाणी साठा नाही जिथून तो तुम्ही बंद करू शकता. त्यामुळे मान्यता देणे किंवा न देणे हे कोणत्याही सरकारला सहज शक्य नाही.

बिटकॉइन देऊन दोन पिझ्झा घेतले.

२०१० मध्ये बिटकॉइनचा पहिला व्यवहार झाला तेही दोन पिझ्झा देऊन. याला फॅड म्हणा किंवा खरी डील म्हणा, क्रिप्टोकरन्सीने जगाला काही अंशी का होईना झटका दिला आहे. कोणीही क्रिप्टो चलनाविरुद्ध डोळे बंद करून दुर्लक्ष करू शकत नाही. व्हर्च्युअल चलन परिस्थिती उद्योजक आणि बाजार गुंतवणूकदारांसाठी एक भरीव जागा आहे. पण हे सर्व कसे सुरू झाले? पहिला क्रिप्टो व्यवहार उघडपणे दोन पिझ्झाच्या बदल्यात झाला. ऐकून थोडं डोकं चक्रावले पण हे खरं आहे. 22 मे 2010 रोजी, फ्लोरिडा येथील Laszlo Hanyecz या व्यक्तीने स्थानिक पिझ्झा स्टोअरमधून दोन पिझ्झा मिळविण्यासाठी त्याच्या बिटकॉइन्सचा व्यापार केला. वास्तविक कंपनीसोबत व्यावसायिक व्यवहारासाठी बिटकॉइनचा पहिला अधिकृत वापर म्हणून हा व्यवहार ओळखला जातो. पण Bitcoin अद्याप बाजारात स्वीकार्य चलन नव्हते. तर, लॅस्लो हॅनयेकझने त्याच्या नाण्यांचा व्यापार कसा केला?

२०१० मध्ये, Laszlo Hanyecz ने दोन पिझ्झा विकत घेण्यासाठी पापा जॉन्स नावाच्या स्थानिक पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये १०००० बिटकॉइन्स खर्च केले. तेव्हा त्याच्या बिटकॉइन्सची किंमत फक्त $४० होती. परंतु, क्रिप्टोकरन्सी अद्याप व्यावसायिक जगामध्ये नसल्यामुळे, हॅनिएझने Bitcointalk समुदायाशी संपर्क साधला आणि जो कोणी त्याला पिझ्झा विकत देईल त्याला उघडपणे त्याच्या बिटकॉइन्सचा देण्याचा त्याने व्यापार केला. बिटकॉइनचे आजचे मूल्य लक्षात घेता, जे सध्या ४६ हजार डॉलर पेक्षा जास्त आहे. हे दोन पिझ्झा आतापर्यंतचे सर्वात महागडे पिझ्झा म्हणून ओळखले जाऊ शकतात.

बिटकॉइन पिझ्झा दिवस सुरु झाला.

या व्यवहारामुळे वास्तविक जगात क्रिप्टोकरन्सीच्या व्यापारीकरणाची घोषणा झाली, क्रिप्टो चाहत्यांनी २२ मे या दिवसाला बिटकॉइन पिझ्झा दिवस म्हणून नाव दिले. दिवसाला यावर्षी १२ वर्षे पूर्ण होतील. पुढील काही वर्षात क्रिप्टोचा अनेक ठिकाणी वापर असेल पण हे होत असताना सगळ्यांना या दिवसाची आठवण काढावी लागेल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.