MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

प्राण्यांवरचा अन्याय कमी करण्यासाठी विराट अनुष्काने चिकन सोडण्याचा निर्णय घेतलाय.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा भारतात सर्वात फेमस कपल आहे. त्याला कारण पण तेवढं मजबूत आहे. आपला विराट भाऊ मोठा क्रिकेटर आणि अनुष्का दीदी प्रसिद्ध अभिनेत्री. दोघांनाही चाहत्यांची कमी नाही त्यात परत दोघे एकत्र असल्यामुळे तर डबल धमाका. त्यामुळे त्यांनी काहीही केलं कि बातमी बनते. खरं तर सेलिब्रेटी लोक बातमी होण्यासाठीच माहिती शेयर करतात. तर मॅटर असा झालाय, अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ टाकलाय. सगळ्या इंटरनेटवर त्याच व्हिडिओची चर्चा आहे. काही लोक त्यांची बाजू घेत आहेत तर काही जण सेलिब्रेटी म्हणजे एक नंबरचे दोगले लोक असं व्यक्त होत आहेत. त्यामुळे विषयाच्या खोलात जाणं आपलं काम ते आम्ही केलय, तुम्ही खाली वाचा.

पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी चिकन सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हणतायत अनुष्का आणि विराट.

व्हिडिओ मध्ये विराट भाऊ आणि अनुष्का दीदी दोघे पण आहेत. व्हिडिओची सुरुवात करताना अनुष्का म्हणतेय ,” मी आणि विराट नेहमी चर्चा करत असतो कि आपली पृथ्वी राहण्यास कशी चांगली होईल. आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपली धरती कशी सुरक्षित ठेवता येईल.” अनुष्काच्या बोलण्यात विराट पुढे ऍड करतो , ” धरतीची सुरक्षा करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्वानी आपल्या आपआपल्या पद्धतीने तसे प्रयत्न केले पाहिजेत. धरती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही दोघे चिकन खाणे बंद करत आहोत. तसा आम्ही निर्णय केला आहे.” व्हिडिओ मध्ये पुढे बोलताना अनुष्का स्पष्ट करते, “आम्हाला प्राणी आवडतात म्हणून आम्ही हा निर्णय घेत नसून प्राण्यांच्या हत्या केल्यामुळे पृथ्वीवर वाईट परिणाम होत आहे त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे.” एकूणच काय तर विराट आणि अनुष्का ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलत आहेत.

सगळ्या भाषणबाजीत अनुष्का अन विराट भाऊ पैसे घेऊन बोलत असल्याचे विसरून गेले..

मी आधी म्हंटल्याप्रमाणे सेलिब्रेटी लोक माहिती तेंव्हाच देतात जेंव्हा त्यांना ती द्यायची असते. हे पत्रकारांना वैगेरे माहिती असतं ह्या सर्व अफवा असत्यात. सगळे सेलिब्रेटी असं करत असतील तर विराट अन अनुष्का का बर त्यांच्या फायद्या शिवाय करत असतील ? आम्ही तर असं ऐकलं आहे, विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्टचे २ कोटी घेतो म्हणून. मग असं अचानक विराट आणि अनुष्का दीदीच पृथीवर प्रेम का वाढलं म्हणून थोडा शोध घेतला तर लक्षात आलं. विराट आणि अनुष्काने ” Blue Tribe official” संस्थेसोबत पेड पार्टनरशिप केली आहे. म्हणजे एकूणच हे काय आहे तर आम्ही पृथ्वीची काळजी करतो पण पैसे मिळत असल्यावर. एकूणच हे असं आहे, ग्लोबल वॉर्मिंग कमी झाले पाहिजे पण सोबत आम्हाला पैसे पण मिळाले पाहिजेत. लोका सांगे ब्रह्म ज्ञान असे नव्हे का ? तर व्हिडिओत विराट भाऊ आणि अनुष्काने मोठा बोल बच्चन दिला आहे मात्र ते आम्ही पैसे घेऊन सांगत आहोत हे सांगायला ते विसरले.

अनुष्का आणि विराट जरी पैसे घेतल्याचे सांगायचे विसरले असले तरी आपण का दुर्लक्ष करावं ? त्यांचे हजारो, लाखो चाहते ते जे सांगतात त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे सेलिब्रेटी काहीही सांगत असेल तर एकदा तपासून बघत जा. म्हणजे तुमचा *सी-कटनार’ नाही. खाली व्हिडिओ देतोय, पोस्टच्या वर पहा तुम्हांला दिसेल ” Paid parternship with bluetribe official.”

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.