नुकताच वॅलेंटाईन डे झाला पण वॅलेंटाईन डे असला काय अन नसला काय प्रेम करणारे थांबतात थोडीच, प्रेम चालूच असतं. असं म्हणतात प्रेम निरंतन असतं आपणच स्वतःला त्या पासून दूर ठेवतो. प्रेम मिळवण्यासाठी काय काय नाही करावं लागत. पहिली गोष्ट आपल्याला जी पोरगी आवडते तिला पटवायचं, आपण तिच्यासाठी योग्य आहोत हे समजून देणे काय सोप्पी गोष्ट आहे व्हय. मोठे कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी. इकून तिकून पोरगी राजी झाली तर घरचे राजी होत नाहीत. घरच्यांना समजावून सांगणे जवळ जवळ अशक्यच गोष्ट असते. मग होतात प्लॅन पळून जाण्याचे. पळून जाऊन लग्न केले तरी संघर्ष संपतो थोडीच तो चालू असतो..
बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूरचं पण असच झालं होत. पोरगी राजी झाली तेंव्हा तिच्या घरचे राजी नव्हते. पळून जाऊन लग्न केलं तर वडील स्वीकारायला तयार नव्हते. पण लता मंगेशकरच नाव घेतलं आणि वडील म्हणाले ओके सब कुछ माफ.
शिवांगी कोल्हापुरे सोबत शक्ती कपूरला प्रेम झालं.
चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी शक्ती कपूर दिल्लीतून मुंबईत आला होता. सुरुवातीला छोट्या मोठ्या चित्रपटांमध्ये त्याला काम मिळायचे पण नंतर त्याने अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्री मध्ये आपलं नाव केलं. त्या दरम्यानच शक्ती कपूरला शिवांगी कोल्हापूर यांच्यावर प्रेम झालं. शिवांगी शक्ती कपूर यांच्या पेक्षा दहा वर्षांनी लहान होत्या. साहजिकच मुलगा मुली पेक्षा दहा वर्ष मोठा असल्यामुळे शिवांगी कोल्हापुरे यांच्या घरचे शक्ती आणि शिवांगी यांच्या लग्नाला परवानगी देत नव्हते. घरच्यांना अनेक वेळा विनंती करून पण शिवांगी यांच्या घरचे लग्नाला तयार होत नव्हते. मग काय शक्ती आणि शिवांगी यांनी पळून जाऊन लग्न केले. पळून जाऊन लग्न केले खरे पण शक्ती कपूर यांनी लग्नाची कल्पना त्यांच्या घरच्यांना दिली नव्हती.
पळून जाऊन लग्न केल्यामुळे शक्तीच्या वडिलांनी बोलणे सोडले होते.
पळून जाऊन लग्न केल्यावर शक्ती कपूर यांनी घरी कळवले कि मी लग्न केले आहे. शक्तीच्या घरच्यांना हा धक्का होता. मुलांनी मुंबईतच लग्न केल्यामुळे आई आणि वडील दोघेही शक्तीवर नाराज होते. शक्तीने त्याच्या आईला पळून जाऊन लग्न करणे का गरजेचे होते समजावून सांगितले. आईने त्याला माफ देखील केले. पण शक्तीचे वडील त्याला माफ करायला तयार नव्हते. लग्न केल्यापासून त्यांनी शक्तीशी बोलणे सोडले होते. लग्नाच्या दोन तीन महिन्या नंतर शक्तीच्या आईच्या सांगण्यावर शक्ती आणि शिवांगी त्यांच्या दिल्लीच्या घरी पहिल्यांदा गेले.
घरी गेल्यावर पण शक्तीचे वडील शक्तीवर नाराज होते. पण सून म्हणून आलेल्या मुलीवर कोण कशी नाराजी दाखवणार ? म्हणून शक्तीच्या वडिलांनी शिवांगीला बोलावून घेतले आणि तिच्या घरच्याबद्दल चौकशी केली. आपलं कुटुंब मुंबईतले आहे, गाणं कोकिळा लता मंगेशकर यांची मी भाची आहे असं शिवांगी कोल्हापुरेंनी शक्तीच्या वडिलांना सांगितल्यावर त्यांचा राग एकदमच शांत झाला. लता मंगेशकर यांच्या घरातली मुलगी आपल्या घरची सून झाली म्हणून ते खुश होते. कसलाही उशीर न करता त्यांनी शक्तीला बोलावले आणि त्याला सांगितले लता मंगेशकरांच्या घरची मुलगी आपल्या घरची सून झाली आहे हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे तू केलेल्या चुकीसाठी तुला सब कुछ माफ.
शिवांगी कोल्हापुरे लता मंगेशकर यांच्या घरातील असल्यामुळे शक्ती कपूरच्या वडिलांनी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली. हा किस्सा स्वतः शक्ती कपूरने आज तक वाहिनीवर बोलताना सांगितला आहे.
हे खास आपल्यासाठी
महिला आणि पुरुषांमध्ये जननेंद्रियाचा क्षयरोग – जाणून घ्या याबद्दल सर्व काही
ऑटो रिक्शा चालकांमध्ये टीबी चे प्रमाण
पोट दुखतय ? टीबी तर ना , होय असू शकतो टीबी.. काय आहेत लक्षणे वाचा.