MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

इंडियाच्या जेम्स बॉण्ड मुळे पाकिस्तानला अणुबॉम्ब बनवायला १५ वर्ष उशीर झाला.

Ajit doval pakistan nuclear plan

Ajit Doval

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ ला सत्तेत आल्यावर त्यांनी त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला. पूर्व आयपीएस अधिकारी अजित डोभाल यांना सुरक्षा सल्लागार पदी नेमण्यात आलं. अजित डोभाल यांची सुरक्षा सल्लगार पदी नेमणूक झाल्याच्या बातम्या भारतापेक्षा पाकिस्तानात जास्त झाल्या. अजित डोभाल यांचा इतिहास आणि काम पाकिस्तानच्या पोरांना देखील माहित आहे. पाकिस्तानी पोलीस यंत्रणा आणि आर्मीला तर अजित डोवाल यांच्या नावाच्या उचक्या लागतात असं ऐकलं आहे.

२०१४ पासून तर अजित डोभाल पंतप्रधान मोदी यांचे सुरक्षा सल्लागार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत जे काही निर्णय सरकार घेत त्यात त्यांचा सहभाग असतोच. २०१६ ला झालेल्या उरी दहशदवादी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या मागे अजित डोवाल यांच डोकं असल्याचं बोललं जात. सर्जिकल स्ट्राईक मध्ये पाकिस्तानची काय अवस्था झाली होती आपल्याला माहिती आहे. सर्जिकल स्ट्राईक मुळे पाकिस्तान पुरता घाबरला होता. भारत कधीही हल्ला करू शकतो हा संदेश सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानकडे गेला. सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाईंड अजित डोभाल होते. त्यामुळे अजित डोभाल यांच्या पाकिस्तानला उचक्या लागणं साहजिकच आहे. पण सर्जिकल स्ट्राईकच्या आधीपण एकदा अजित डोवाल यांनी पाकिस्तानला झटका दिला दिला. तेंव्हापासूनच अजित डोवाल इंडियाचा जेम्स बॉण्ड म्हणून ओळख मिळाली.

अणुबॉम्बच्या शर्यतीत भारताने बाजी मारली पण पाकिस्तानला रोखणे गरजेचे होते.

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून सर्व जगाला अचंबित केले होते. अणुबॉम्बची ताकत जगाने पहिल्यांदाच अनुभवली. हिरोशिमा आणि नागासाकी हि जपानी शहरे उध्वस्त झाली होती. अणुबॉम्बच्या हल्ल्यामुळे दुसरे महायुद्ध तर संपले मात्र सर्व अणुबॉम्ब बनवण्याची स्पर्धा सुरु झाली. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवायच्या असतील तर अणुबॉम्ब बनवण्याशिबवाय पर्याय उरला नव्हता. भारताचा शेजारी चीनने १९६२ ला अणुबॉम्ब बनवून भारताला धक्का दिला. चीन आणि भारताचे नुकतेच युद्ध झाले होते. भारताला चीन कडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यात चीनने अणुबॉम्ब बनवून भारताला धोका निर्माण केला होता.

चीनने अणुबॉम्ब बनवल्यामुळे भारताला अणू कार्यक्रम हाती घ्यावा लागला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अणू कार्यक्रमाला परवानगी दिली. भारतीय वैज्ञानिकांनी कमाल केली अगदी कमी काळात आणि कमी खर्चात १९७२ ला त्यांनी भारताचा अणुबॉम्ब बनवला. राजस्थानच्या पोखरण मध्ये चाचणी करून भारतने अणुबॉम्ब बनवला असल्याची जगाला बातमी दिली.

भारताने अणुबॉम्ब बनवल्यामुळे पाकिस्तान पण अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करणार हे तर साहजिक होत. आणि जर पाकिस्तान अणुबॉम्ब बनवू शकला तर भारताला चीन आणि पाकिस्तान दोन अणुबॉम्ब युक्त देशांशी मुकाबला करावा लागणार होता. त्यामुळे पाकिस्तानला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखणे खूप गरजेचे होते.

पाकिस्तानअणुबॉम्ब बनवणार नाही यांची जबादारी RAW कडे देण्यात आली.

पाकिस्तानला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी भारत सरकार आणि RAW ( RESEARCH AND ANALYSIS WING ) ने प्लॅन बनवला होता. भारताने अणुबॉम्ब बनवल्यामुळे पाकिस्तान लगेच अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीला लागणार होता. त्यामुळे पाकिस्तानच्या काय हालचाली होत आहेत याची माहिती आपल्याला असायला हवी म्हणून RAW ने त्यांचे अधिकारी वेष बदलून पाकिस्तानात पाठवले. आयपीएस असलेले अजित डोभाल तेंव्हा RAW मध्ये होते. पाकिस्तान मिशन वर त्यांची देखील निवड झाली होती. भिकारी बनून पाकिस्तानी अधिकाऱ्यांची रेकी करण्याचे काम अजित डोभाल यांच्या कडे होते.

अणुबॉम्ब बनवण्याचा कार्यक्रम पाकिस्तान गुपित करत होता. बॉम्ब बनवणारे वैज्ञानिक सोडून दुसर्यांना त्याबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यामुळे पाकिस्तानच्या अणुबॉम्ब कार्यक्रमाची माहिती मिळवणे मोठे मुशकील काम होते. पण अजित डोभाल यांनी पाकिस्तानी वैज्ञानिकांची रेकी केली. कोण कोण कुठल्या विभागात आहे याची माहिती काढली. मिळालेली माहिती अजित डोवाल RAW ला देत असतं. RAW आणि भारत सरकार मिळालेल्या माहितीच्या आधारावर पाकिस्तानला रोखण्याचे प्लॅन बनवतं होतं. माहिती बरोबर मिळवत असल्यामुळे पाकिस्तानला भारताचा मुकाबला करणे मुश्किल होत असे.

शेवटी १९९८ ला पाकिस्तान अणुबॉम्बची चाचणी केली. पण वेग वेगळे रिपोर्ट्स सांगतात पाकिस्तानने अणुबॉम्ब बनवला खरा पण बनवायला १५ वर्ष उशीर केला. खरं तर त्यांनी उशीर केला नव्हता तो RAW, अजित डोभाल यांनी उशीर घडवून आणला होता. पाकिस्तान मिशन वर असताना अजित डोभाल सात वर्ष पाकिस्तानात राहिले. पाकिस्तानात सात वर्ष राहून देखील अजित डोभाल भारतात सुखरूप आले. शत्रूच्या देशातुन त्यांना चकवा देऊन आल्यामुळेच अजित डोभाल याना भारताचा जेम्स बॉण्ड असं नाव पडलं .

हे पण वाचा

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.