थोड्या वेळापूर्वी फेसबुक वर गेलो होतो. वेबसाईटच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात मला मित्र योगेशचा वाढदिवस असल्याचं नोटिफिकेशन दिसत होत. योगेशला वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या मन मात्र जुन्या दिवसात गेलं. मित्रांचे वाढदिवस आहेत याची आठवण काढून दिली फेसबुकने. मगच साजरे झाले त्याचे वाढदिवस.
वाढदिवसाचं खुळ आमच्या डोक्यात नव्हताच कधी. याच कारण असं होत कि आम्हाला वाढदिवसाबद्दल माहिती नव्हती ना आमच्या आई बापाला. त्यामुळे वाढदिवस असतो तो साजरा करावा लागतो हे कधी वाटलं नाही. शहरी भागात मात्र पोरांना वाढदिवसाचं पार येडं होत हे शहरात आल्यावर कळलं. माझा खोली मित्र त्याच्या वाढदिवसाची दोन महिने आधी पासूनच वाट पाहत होता. तेंव्हा कळलं वाढदिवस नावाची काहीतरी जबर भारी गोष्ट असते तर. खोली मित्रानं त्याच्या वाढदिवसाची पार्टी दिल्यावरच आपल्याला वाढदिवस आवडायला लागला. वाढदिवसापेक्षा पार्टी आपल्याला आवडली होती हे मात्र खरं.
शहरात आल्यावर वाढदिवस असतात हे लक्षात आलं होत. वाढदिवस कसे साजरे करायचे असतात हे कळलं होत. शे-दोनशे रुपये मध्ये मस्त पैकी वाढदिवस करता येतात हे होत डोक्यात. पण समस्या अशी होती कि आता आपल्याला स्वतःची जन्म तारीख येऊन गेल्याची लक्षात येत नव्हते. त्यामुळे मित्रांचे वाढदिवस लक्षात राहण्याची शक्यता नव्हती. मग आमचा दोस्त होऊन मदतीला आलं फेसबुक.
तसं पाहायला गेलं तर फेसबुक सुरु झालं होत २००५ २००६ च्या दरम्यान. पण आमच्यापर्यंत फेसबुक आलं २००१-२०१२ ला. त्याच काळात आम्ही आमच्या दहावी-अकरावीला होतो. वर्गात एक दोन पोरांकडेच मिनी स्मार्ट मोबाईल होते. त्यांचे कडेच फेसबुक होत. ते ऐटीत सांगायचे फेसबुकला अकाउंट असणं किती महत्वाचे आहे. आमच्या सारख्या गरीब जनतेकडे मोबाईल तर नव्हते मग कुठे जायचे तर त्याकाळी शहरांमध्ये नेट कॅफे सुरु झाले होते. दहा रुपये द्यायचे आणि एक तास बसायचं. ते आपल्या बजेट मध्ये बसायचं. फेसबुक चालवण्यासाठी नेट कॅफे मस्त जागा होती. शाळा सुटली कि आम्ही हमखास नेट कॅफे वरच असायचो.
फेसबुकला अकॉऊंट काढणं आमच्या साठी बँकेत अकाउंट काढण्यासारखं होत. कारण फेसबुक अकाउंट सुरु करताना माहिती तशीच विचारायचं. नाव काय , जन्म तारीख काय , आवडते चित्रपट कोणते असे अनके प्रश्न असायचे. त्यामुळे बॅंकेतला फॉर्म भरत असल्याची फीलिंग यायची. आम्ही स्वतः तर फेसबुकला अकॉउंट सुरु केलेच पण सोबत गावाकडच्या मित्रांचे पण केले. त्यांना फेसबुक वापरायला शिकवले. आम्ही सगळे मित्र एक दोन वर्षात फेसबुक वापरायला लागलो होतो. अकाउंट काढताना फेसबुक ने माहिती घेतली आपणहि काहीही विचार न करता दिली. मधल्या काळात फेसबुकने दुसऱ्या कंपन्यांना ती विकली असल्याच्या बातम्या पण आल्या होत्या. तो खूप डिप विषय आहे त्यासाठी नवीन लेख लिहावा लागेल.
फेसबुक ने सगळ्यांकडूनच माहिती घेतली होती म्हणजे आमच्या मित्रांचे वाढदिवस आम्ही जरी विसरलो पण फेसबुक ला माहिती होते. फेसबुक बरोबर संध्याकाळी १२ ला नोटिफिकेशन पाठवायचं तुमच्या फलाण्या मित्राचा वाढदिवस आहे. नोटिफिकेशन मुळे मित्राचा वाढदिवस असल्याचं कळल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचा वाढदिवस साजरा करायचा आम्ही प्लॅन करायचो. पन्नास पन्नास करून मित्राचा वाढदिवस साजरा व्हायचा.
आधी फक्त शहरात साजरे होणारे वाढदिवस फेसबुकच्या नोटिफिकेशन मुळे गावापर्यंत पोहचले. मधल्या काळात वाढदिवसाचं प्रमाण खूप वाढले होते. म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्या गावात प्रत्येक दिवशी कोणाचा ना कोणाचा वाढदिवस असायचा. वर्ष-दीड वर्ष हे चाललं पण आता प्रमाण कमी झालं आहे. कधी ना कधी होणारच होतं. पण आमच्या सारख्या गावाकडच्या पोरांना वाढदिवसाचा आनंद देण्यात फेसबुकचा मोठा वाट आहे हे नाकारून जमणार नाही.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?