कर्नाटक जानेवारी पासून राष्ट्रीय चर्चेत आहे. उडपी जिल्ह्यात घडलेल्या हिजाब प्रकरण तर सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलं. हिजाब प्रकरण शांत होत आहे असं दिसत असताना नवा वाद उभा राहिला आहे. २० फेब्रुवारीच्या रात्री २६ वर्षीय बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष यांची शिवमोग्गा जिल्ह्यात हत्या करण्यात आली आहे. हर्षची हत्या आणि हिजाब प्रकरणाचा संबंध जोडला जात आहे.
हर्षचा मृत्यू आणि हिजाब प्रकरणाचा संबंध नसल्याचं कर्नाटक सरकार म्हणतंय.
रविवारी २० फेब्रुवारीच्या सायंकाळी हर्षची हत्या झाल्याची बातमी आली. हर्षची हत्या आणि हिजाब प्रकरणाचा संबंध जोडला जायला सुरुवात झाली. ट्विटर आणि फेसबुक वर तश्या अफवा पसरवल्या गेल्या. हिजाब प्रकरणात हर्ष हिजाबच्या विरोधात प्रदर्शन करत होता. हिजाब प्रकरणाच्या वेळी हर्ष उडपी जिल्ह्यात होता. फेसबुक आणि ट्विटवर भगवे उपरणे असलेले त्याचे फोटो वायरल होत आहेत. कर्नाटक भाजपचे नेते मुस्लिम कट्टरवाद्यांनीच हर्षची हत्या केल्याचा आरोप करत आहेत.
हर्षच्या हत्येबद्दल पत्रकारांनी कर्नाटकचे गृहमंत्री ज्याणेंद्र याना विचारलं असता त्यांनी हर्षच्या हत्येचा आणि हिजाब प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचं म्हंटले आहे. हर्षवर अनेक प्रकरणात केस असल्याचं देखील त्यांनी पत्रकारांना सांगितलं आहे. हर्षच्या परिवाराची ज्याणेंद्र यांची भेट देखील घेतली आहे.
काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामह्या यांनी मुख्यमंत्री बी एस बोमाई आणि ग्रहमंत्री ज्याणेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हर्षची हत्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या शिवमोग्गा जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात तरुणांच्या हत्या होत असतील तर मुख्यमंत्री राज्य कसे सांभाळणार ? त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे.
हिजाबच प्रकरण काय झालं होत.
कर्नाटकाच्या उडपी जिल्ह्या जानेवारी २० ला महाविद्यालय प्रशासन आणि मुस्लिम विद्यार्थिनी यांच्यात हिजाबवरून मतभेद झाले झाले होते. महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालय परिसरात हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली होती. हिजाब घालणे आमचा अधिकार असल्याचं मत मुस्लिम विद्यार्थिनीचा होत. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन परिसरात आंदोलनं देखील केलं. विद्यार्थिनीच्या आंदोलनाला काही लोकांनी हिंदू – मुस्लिम वादाचा रंग दिला. काही दिवस महाविद्यायालच्या परिसरात तणावाचे वातावरण झाले होते.
सोशल मीडिया वरून वातावरण तापवण्याचं काम चालू आहे.
हर्षची हत्या झाल्यावर त्याचा हिजाब वादाशी संबंध जोडला गेला. रविवारी रात्रीपासूनच फेसबुक आणि ट्विटर वर #justiceforharsh हा ट्रेंड चालवला जात आहे. बजरंग दलाचे लोक हा ट्रेंड चालवत आहेत. अनेक सेलेब्रेटी देखील हर्ष साठी ट्विट करतं आहेत. अभिनेत्री रविना टंडनने ट्विट केले आहे.
हर्षची हत्या कशामुळे झाली आहे हे पोलीस चौकशी नंतर कळेल पण त्याला हिंदू मुस्लिम रंग देऊन राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !