MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

साऊथच्या राजकारणात थलापती विजयच्या फॅन क्लबने स्थानिक निवडणुका जिंकल्या

Vijay Makkal Iyakkam era begins information in marathi

दक्षिणेकडे हिरो राजकारणात येतो ही आता विशेष गोष्ट राहिली नाही. दक्षिणेचे एकूण राजकारण चित्रपटांभोवती फिरते. इथल्या राजकारणात सत्ताधारी असो किंवा विरोधक प्रत्येक मोठा नेता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चित्रपटाशी संबंधित असतोच. दक्षिणेत चित्रपटांचा प्रभाव असलेली आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यातील लोक चित्रपटासाठी जास्तच वेडी आहेत. दोन्ही राज्यात हिरो मुख्यमंत्री झालेत. बदलत्या काळात यात बदल होईल असं वाटलं होतं पण दक्षिणेत उलट झालं. तामिळनाडूच्या राजकारणात सध्या नाव गाजतंय ते थलापती विजयचं. विजयला त्याचे कट्टर फॅन पुढचा मुख्यमंत्री म्हणून बघत आहेत. विजय अजून राजकारणात तितकासा नाही तरी सुद्धा त्याच्या नावाने स्थानिक स्वराज्य निवडणुका लढवल्या गेल्या आणि विजयला मानणारे उमेदवार जिंकले सुद्धा.

राजकारणात नाव वापरलं म्हणून कुटुंबाच्या विरोधात विजय कोर्टात गेला होता.

विजयच्या वडिलांना विजय राजकारणात यावं असं वाटत होतं. दक्षिण भारतात विजय म्हणजे रजनीकांत नंतर सगळ्यात मोठं नाव. साहजिकच विजयचे वडील एस ए राजशेखर यांनी मुलाच्या नावाचा करिष्मा वापर करून राजकारण करणे सोपे जाईल म्हणून त्यांनी विजयच्या नावाने एका पक्षाची नोंदणी केली. All India Thalapathy Vijay Makkal Iyakkam या नावाने पक्षाची नोंदणी केली. स्वतःला त्यांनी सरचिटणीस म्हणून घोषित केले. विजयची आई शोभा यांना खजिनदार तर जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष घोषित केले. हे सगळं चालू असताना विजयला कसलीही कल्पना नव्हती. मुलगाच आहे म्हणल्यावर एवढं काय त्यात असं समजून विजयच्या वडिलांनी विजयला गृहीत धरले. विजयला समजल्यानंतर त्याने सरळ कोर्टात ११ जणांविरुद्ध तक्रार केली. यात आई आणि वडील दोघांवर पण त्याने आरोप केले आहेत. यानंतर त्याने स्पष्टीकरण देऊन सांगितले कि या पक्षाचा आणि त्याचा काही संबंध नाही. कोणीही या पक्षात जाऊ नये. विजयच्या नावाने कोणतीही सभा किंवा राजकीय कार्यक्रम करत असेल तर त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू, असे विजयने स्पष्ट केले.
(Thalapathy Vijay Files Court Case Against His Parents)

नुसत्या नावावर फॅन क्लबने निवडणुका लढवल्या आणि विजयची राजकारणात एंट्री झाली

विजयने घरच्यांना नाव वापरू दिले नाही पण तामिळनाडूतील Thalapathy Vijay Makkal Iyakkam फॅन क्लबने यासंबंधी विजयला विचारणा केली होती. विजयसाठी ही संधी होती आणि आवाहन पण. एखादा अभिनेता मोठा लोकांमुळे होतो तर फायदा पण लोकांना झाला पाहिजे. केवळ कुटुंबाचा त्याच्या यशात वाटा नाही तर सगळ्यांचा आहे या विचाराने विजयने त्याच्या चाहत्यांना निवडणुकीत उभी राहणायची परवानगी दिली पण काही अटी ठेवल्या. विजयने प्रचाराला जाणार नसल्याचं सांगितलं. शिवाय उमेदवारांमध्ये स्त्री पुरुष प्रमाण समान पाहिजे. या सगळ्या अटी मान्य करून विजयचे फॅन क्लब मैदानात उतरले. Thalapathy Vijay Makkal Iyakkam फॅन क्लबच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार २०२१ मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १६७ पैकी ११५ जागांवर विजय मिळवला आहे. २०२२ मध्ये सुद्धा त्यांच्या फॅन क्लबला स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये चांगल्या जागा मिळण्याची शक्यात आहे. निवडणुकीचे निकाल येतील तसे चाहते राजकारणात विजयची ग्रँड एंट्री झाल्याचं बोलत आहेत. ट्विटरवर तसा ट्रेंड पण चालू आहे. यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात विजयची एंट्री झाली असं म्हणायला हरकत नाही. दक्षिण भारतात चित्रपटांच्या नायकांना डोक्यावर घेतात हे माहित होतं पण त्यांच्या नावाने लोक निवडणूक जिंकतात हे जरा अति झालं. अभिनयावरून लोक राजकारणाची चव ओळखतात हे फक्त दक्षिण भारतात होऊ शकतं.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.