रमण लांबा प्रसिद्ध होता कि तो कधी हेल्मेट घालत नाही आणि हीच गोष्ट त्याचा जीव घेऊन गेली. रमण लांबा भारतीय क्रिकेट मधील असा खेळाडू होता जो मैदानात एखाद्या चित्रपटातील हिरो सारखा वावरायचा. रमणची स्टाईल बघून चाहते हुरळून जायचे. काही जण म्हणायचे रमण लांबा म्हणजे क्रिकेटरच्या कपड्यातील फिल्मस्टार आहे.
रमण लांबा काही काळ असता तर धावा काढणारी मशिन्स म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं असतं. रणजी ट्रॉपीमध्ये त्याने १४ पारींमध्ये १०३४ धाव काढल्या होत्या. सलग दोन शतक ठोकणारा रमण लांबा, विजय हजारे नंतर दुसरा खेळाडू होता. कानपूर येथे पदार्पणातच त्याने सर्वाना भुरळ घातली. ऑस्ट्रेलियाने भारताला २५१ धावांचे आव्हान दिले आहे. १९८० च्या दशकात हे एकदिवसीय मोठे लक्ष्य होते. सुनील गावस्करने २६ धावा केल्यानंतर लांबाचा उदय झाला. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना क्लब क्रिकेटर्ससारखे वागवले. ५३ चेंडूत त्याने ६४ धावा काढल्या.
रमण बिनधास्त शैलीत क्रिकेटचा लोकांना आनंद देत होता. त्याच्या खेळण्याच्या पद्धतीवर अनेक आक्षेप होते पण या सगळ्यांवर तो एकाच उत्तर द्यायचा, ‘ज्यादिवशी जास्त धावा काढेल तेव्हा सगळं विसरून फक्त धाव बघता बसतील. रमण जे बोलला ते त्याने सिद्ध पण करून दाखवलं. अष्टपैलू खेळाडू म्हणून रमण लांबा सगळ्या भूमिका चांगल्या निभावत होता. रमण लांबा त्याच्या धावांवर लक्ष टाकल्यास हे सहज समजून येईल कि तो त्यावेळचा एक चांगला खेळाडू होता.
सचिन तेंडुलकरने कराची टेस्ट पासून पदार्पण केले. याच टेस्ट सामन्यात रमण लांबा खेळणार होता पण ऐन वेळेला तो जखमी असल्या कारणाने त्याच्या जागेवर मोहम्मद अझर त्याच्या जागी आला. या नंतर काही काळ रमण लांबा क्रिकेटपासून तोडा दूर गेलाय असं वाटतं असताना तो बांगलादेशातील ढाका प्रीमियर लीग मध्ये सुपरस्टार झाला होता.
२० फेब्रुवारी १९९८ रोजी रमण बांगलादेशातील ढाका प्रीमियर लीग सामना बंगबंधू स्टेडियम मध्ये खेळत होता. अभानी आणि मोहमेडन क्लब यांच्यातील सामन्यात रमण पॉवर शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत होता. रमण नेहमीच्या पद्धतीने हेल्मेट न घालताच क्षेत्ररक्षण करत होता. कर्णधार अमिनो इस्लाम धावत जाऊन रमण लांबाकडे गेला आणि हेल्मेट घालायला सांगितलं. रमण लांबा ने आता फक्त तीन बॉल तर राहिलेत म्हणून हेल्मेट घालायचं टाळलं. सैफउल्ला खान गोलदांजी करत होता. त्याने जोरदार गोलदांजी केली. फलदांजने धारदार शॉट लगावला. चेंडू इतका वेगवान होता कि रमणच्या कपाळावर आदळला. चेंडू रमणच्या डोक्याला लागून आणि विकेटकीपरकडे गेला. रमण तिथेच पडला पण लगेच उठला. कर्णधार धावत रमण जवळ आला, लागलं का? म्हणून विचारलं. तेव्हा रमण हसत बोलला, ‘मेलो आज तर मी !
रमणला तातडीने मैदानाबाहेर नेलं. ड्रेसिंग रूममध्ये त्यांची प्रकृती बिघडू लागली. अंतर्गत रक्तस्राव सुरु झाला होता. रुग्णालयात दाखल करेपर्यंत रमण बेशुद्ध झाला होता. दिल्लीहून तातडीने एका डॉक्टरला ढाका येथे बोलावण्यात आले. तीन दिवसांच्या उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने २३ फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. रमण लांबा इतक्या लवकर आणि अनपेक्षित जाईल कोणाला वाटलं नव्हतं.
रमण लांबा क्रिकेट मधील न विसरणारे पर्व आहे. रमण लांबा मुळे एका सामन्यात अकरा ऐवजी बारा खेळाडू खेळले. जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा हा नवीन विक्रम झाला असं बोललं गेलं. क्रिकेटर श्रीकांतच्या बदल्यात रमणला बोलावलं. श्रीकांत पुन्हा आला तरी रमण थांबलेला होता. एक षटक टाकून झाल्यांनतर रमण गेला पण तोपर्यंत हा एक वेगळा विक्रम झाला.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?