Lido learning ही EdTech कंपनी अनेक कारणांमुळे बंद करण्याची (shut down) वेळ आली आहे. Lido लहान मुलांपासून सर्व गटातल्या मुलांना ऑनलाईन शिक्षण देत होती. Lido सारख्या बाजारात अनेक कंपन्या आहेत. गेल्या काही दिवसात विशेषतः लॉकडाउनमध्ये अनेक ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या कंपन्या आल्या. Byju सारख्या काहींनी`बाजारात वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात करून पालकांना महागडया कोर्ससाठी तयार केलं. पालक जाहिरातीला भुलले. यामुळे विद्यार्थी आणि पालकांचं किती भलं झालं माहित नाही पण कंपन्या मालामाल झाल्या. काल परवा आलेल्या कंपन्या गगनाला भिडल्या. गेल्या दहा वर्षात अशा अनेक डिजिटल कंपन्या आल्या. या कंपन्यांनी फुगवटा दाखवला आणि मार्केटला वेड्यात काढलं. Lido ने पण असंच काही तरी केलं असल्याची शंका आहे. कारण पाच महिन्यापूर्वी या कंपनीने १० मिलियन डॉलर एवढी गुंतवणूक मिळवली तरी सुद्धा Lido कामगारांना द्यायला पैसे नाही असं म्हणतंय.
अनेक कर्मचार्यांच्या मते या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मीटिंगमध्ये लिडो लर्निंगचे संस्थापक साहिल शेठ यांनी टीमला माहिती दिली की लिडो लर्निंग आर्थिक अडचणींचा सामना करत आहे आणि जानेवारी महिन्याचे कर्मचार्यांचे पगार फेब्रुवारीचा पहिला आठवडा झाला तरी देऊ शकले नाहीत. कंपनीने १५०-२०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अनके कर्मचाऱ्यांनी सोशल मीडिया वर याबद्दल जाहीर आक्षेप मांडले आहेत.
सगळेच फसवणरे आहेत असं अजिबात नाही. काही स्टार्ट अपने बाजारात वेगळी पद्धती रूढ केली यामुळे अनेक फायदे झाले आहेत. पण काहींनी कसलाही विचार ना करता पैसे तर दणकून घेतले पण सेवा द्यायची वेळ अली तर गायब झाले. लिडो बद्दल गेल्या काही दिवसात खूप तक्रारी वाढत होत्या अनेक पालक पैसे मिळाले नाही म्हणून तक्रार करत होते. लिडोची लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला उपलब्ध नसायची यामुळे एकूणच कंपनीबद्दल नकारार्थी मत बनत चालले होते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की एडटेक स्टार्टअपने सप्टेंबर २०२१ मध्ये रॉनी स्क्रूवाला यांच्याकडून १० मिलियन डॉलर (अंदाजे ७५ कोटी ) गुंतवणूक म्हणून घेतले होते. रॉनी हे upgrad चे संस्थापक आहेत. रॉनी सारख्या लोकांनी लिडो लर्निंग मध्ये गुंतवणूक केली म्हणून बऱ्याच जणांना धक्काच बसला आहे. आलेल्या माहितीनुसार कंपनी नवीन गुंतवणूक फेरी किंवा संभाव्य संपादनासाठी बोलणी करत आहे. कंपनी बंद होईल का लगेच सांगणं अवघड आहे पण काही तरी तडजोडी करून थोडे फार पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतील.
सगळ्या घटनाक्रमवार जाहीररीत्या कंपनीने काहीच बोललं नाही. पण कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वरील पोस्ट खूप काही सांगून जात आहेत. लिडोच्या कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने आश्वासन दिले आहे की प्रलंबित पगार “३० ते ९० दिवसांत” दिले जातील. तथापि, कर्मचार्यांच्या मते कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती पाहता हे शक्य दिसत नाही. नोव्हेंबर २०२१ पर्यंत कंपनीत काम केलेल्या एका माजी कर्मचाऱ्याच्या लिंक्डइन पोस्टने हे अधोरेखित केले आहे की लिडोमध्ये पगार चुकवणे किंवा अनियमित पगार अशी परिस्थिती नव्हती. तरीही अचानक कंपनीचा डोलारा कसं काय फसला याबद्दल सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !