MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

IMDB रेटिंग मध्ये भारतातील वेब सिरीज जगात एक नंबर ? Scam 1992 : Harshad Mehta Story

स्कॅम 1992 – हर्षद मेहता स्टोरी, IMDB रेटिंग नुसार खरंच जगात एक नंबर वेब सिरीज आहे का?

IMDB 9.6 रेटिंग च्या जोरावर ही सिरीज जगात एक नंबर आहे अशी सध्या चर्चा चालू आहे. 1992 मधील हर्षद मेहता याने केलेला भारतीय इतिहासातील हा एक गाजलेला घोटाळा आहे. गेल्या चार-पाच वर्षात आपल्या इथे चांगल्या वेबसिरिज आल्या. वास्तव घटनांना धरून काही वेबसिरीज आपल्या अपेक्षांना पुरून उरल्या आहेत. IMDB रेटिंग मध्ये भारतीय वेबसिरीज सध्या चांगल्याच गाजत आहे. त्यातील अव्वल वेब सिरीज म्हणजे स्कॅम 1992- हर्षद मेहता स्टोरी.

IMDB रेटिंग इतकं महत्त्वाचं खरंच आहे का?

चित्रपट समीक्षण क्षेत्रातील ही अग्रगण्य संस्था आहे. एका विशिष्ट पद्धतीने ठरवली गेलेली रेटिंग आजपर्यंत खूप विश्वासार्ह मानली गेली आहे. चित्रपटाचा खास नाद असणाऱ्या लोकांना विचारून बघा IMDB रेटिंग शिवाय ते चित्रपट पहायला धजत नाही, इतकं हे रेटिंग महत्त्वाचा आहे. पेड समीक्षण, किंवा बळेच एखाद्या चित्रपटाला इथं मोठं करण्याचा छपरी प्रकार इथे दिसत नाही. म्हणूनच बहुतेक वेळा हे समीक्षण अपेक्षेला न्याय देतं.

IMDB रेटिंग कसे ठरवते?

IMDB चे ऍक्टिव्ह आणि व्हेरिफाईड यूजर हे रेटिंग ठरवतात. IMDB युजर मतदान करतात. पण सरासरी रेटिंग वरून हे रेटिंग ठरवलं जात नाही. जाणून-बुजून एखाद्या चांगल्या कलाकृतीची वा चित्रपटाची रेटिंग पाडण्याचा हेतू असू शकतो हे लक्षात घेऊन सरासरी काढून रेटिंग ठरवलं जात नाही. टिक टॉक ची रेटिंग कशी पडली हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहेच. वेगवेगळ्या निकषावरच IMDB रेटिंग ठरवली जाते. वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री-पुरुष यांची वर्गवारी करून रेटिंग ठरते. तरीही याचा विस्तृत खुलासा अजून पर्यंत झालेला नाही.

स्कॅम 1992 हर्षद मेहता स्टोरी ला ९.६ रेटिंग खरंच आहेत का?

IMDB च्या अधिकृत वेबसाईटवर हर्षद मेहता स्टोरी ला 9.6 आहे. पण हि अजूनही जगात एक नंबर सिरीज नाही. IMDB च्या साईट वर १७ व्या नंबरला हि सिरीज आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे याची तुलना GOT , Breaking Bad या सिरीजशी केली जाते. पण एक बाब लक्षात घ्या. GOT ची ९.२ रेटिंग हि १७ लाख पेक्षा जास्त युजरच्या मतदानावर ठरली आहे. तर Breaking Bad ९.५ ची रेटिंग १४ लाख पेक्षा जास्त युजरच्या मतदानावर ठरली आहे. या दोघांच्या तुलनेत हर्षद मेहता स्टोरी ची रेटिंग फक्त २५ हजार पेक्षा जास्त लोकांच्या मतदानावर ठरली आहे. यावरून लक्षात येईल कि स्कॅम 1992 – हर्षद मेहता स्टोरी रेटिंग पुढच्या काळात कमी होण्याची शक्यता आहे. तरीही हर्षद मेहता हि वेब सिरीज आवर्जून पाहावी अशी आहे. हि वेब सिरीज तुम्हाला अजिबात निराश करणार नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.