MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणा दिल्यामुळे राज्यपाल अभिभाषण न करताच गेले.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज 3 मार्च पासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र, राज्यपाल बोलायला उभं राहिल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा सुरुवातीला दिल्या गेल्या. नंतर गोंधळ, घोषणाबाजी सुरू झाली . त्यातच आपलं भाषण सुरू ठेवण्याचा राज्यपालांनी प्रयत्न केला. मात्र, नंतर ते भाषण अर्धवट ठेवूनच निघून गेले.

राज्यपालांनी माफी मागावी अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी आहे.

औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यातील गुरू शिष्यांच्या नात्याबद्दल विधान केलं होतं. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है, असं विधान त्यांनी केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलणं त्याचप्रमाणे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अपमानास्पद बोलण्याचं धाडस राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कसं केलं ? असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मत व्यक्त करून सभागृहात घोषणा दिल्या. जो पर्यंत राज्यपाल माफी मागत नाहीत तो पर्यंत आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करत राहू असा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे.

मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे.

ज्यांची दाऊद इब्राहिम यांच्या हस्तकांशी पार्टनरशिप आहे. ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने ज्यांना कोठडी सुनावली आहे, ज्यांच्या तपासात शेकडोंचे भूखंड बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून घेतल्याचं स्पष्ट झालं, त्या नवाब मलिक यांचा राजीनामा जोपर्यंत उद्धव ठाकरे सरकार घेणार नाही तोपर्यंत आम्ही आक्रमकपणे आमची बाजू मांडत राहू, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.

“दाऊद समर्थकांचा राजीनामा जोवर होत नाही, तोवर आमचा संघर्ष सुरूच राहिल,” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

नवाब मलिक यांना ईडीकडून अटक केली आहे. त्यामुळे भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. पण जर महाविकास आघाडी सरकारने मालिकांचा राजीनामा घेतला तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालिकांचं राजीनामा घ्यायचा नाही असं महाविकस आघाडी सरकारने ठरवले आहे. त्यामुळे नवाब मालिकांच्या राजीनाम्यासाठी अर्थ संकल्पीय अधिवेशन गाजणारच होत. त्याची झलक पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान दिसली आहे.

3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.