पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून देशाचं राजकारण बदलून गेलं आहे. एके काळी काँग्रेस आणि भाजपात होणारी झुंज आता आम आदमी पक्ष आणि भाजपात होताना दिसत आहे. निकालाच्या आधीच भाजपचे नेते आम आदमी पक्षाला फारसे महत्व देत नव्हते पण पंजाबच्या निकालाने त्यांना आपचा विचार करण्याशिवाय पर्याय उरला नाही. एकूण ११७ पैकी ९२ जागा जिंकत आपने सर्वाना चकित केले. निकाल त्यांच्या बाजूने लागल्यामुळे आपचा आत्मविश्वास देखील खूप वाढला आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपवर टीका करताना केजरीवाल आणि त्यांचे नेते आता हातचे राखताना दिसत नाहीत.
दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर विखारी टीका केली. केजरीवालांच्या भाषणानंतर भाजप त्यांच्या विरोधात अक्टिव्ह झाले आहे. काल ३० मार्चला भाजपच्या युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला. हल्ला केला तेंव्हापासून दिल्लीतलं राजकारण तापलं आहे. आपचे नेते म्हणत आहे कि, ‘ जनतेचा केजरीवाल यांना मिळणार पाठिंबा बघून भाजप हादरलं आहे. त्यामुळेच ते केजरीवाल यांच्या वर हल्ला करतं आहेत. भाजपाला माहिती आहे कि मोदी याना फक्त केजरीवालच हरवू शकतात म्हणून त्यांच्या बदनामीचा डाव भाजप करतं आहे.’
आपच्या नेत्यांच्या विधानांवरून असं दिसतं आहे कि ते २०२४ च्या निवडणुकीची तयारीला लागले आहेत. येणाऱ्या लोकसभेला मोदी विरुद्ध केजरीवाल अशी लढत करायची त्यांची तयारी असल्याचं बोललं जात आहे. २०२४ ला मोदी विरुद्ध केजरीवाल अशी लढत झाली तरी मोदींना केजरीवाल खरंच हरवू शकतील का याचा अभ्यास करायला हवा. २०२४ ला काय होईल याचा अंदाज आपल्याला इतिहासाचा अभ्यास करून येऊ शकतो..म्हणून मोदी, केजरीवाल आणि देशाच्या राजकारणाच्या इतिहासावर थोडीशी नजर टाकू..
सामान्य कार्यकर्त्यापासून पंतप्रधान पदापर्यंत मजल मजाक नाही
दैनिक भास्करला दिलेल्या मुलखातील राजनीतिक सल्लागार प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी यांच्या चांगल्या सवयी विषयी भाष्य केलं. किशोर म्हणतात, ‘मोदी हे असे नेते आहेत कि ते समोरचा माणूस बोलत असेल तर त्याला काळजीपूर्वक ऐकतात. प्रत्येक मुद्दयांचा विचार करतात. त्यामुळे त्यांच्या विचारात आणि बाकीच्या नेत्यांच्या विचारात फरक दिसतो. सामान्य घरातून आल्यामुळे नरेंद्र मोदींना सामान्य लोकांच्या जीवनाचे ज्ञान आहे. इंग्रजी मध्ये शब्द आहे ‘सेकंड थॉट’ म्हणजे समोरचा माणूस बोलण्याच्या आधीच आपल्याला कडे त्याची माहिती असणे. सामान्य जनतेच्या बाबतीत मोदींकडे तो ‘सेकंड थॉट’ असल्याचं किशोर सांगतात.”
प्रशांत किशोर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसाठी काम केलं होतं पण आता ते त्यांच्या विरोधात काम करतात. विरोधात काम करणारे लोक पण मोदींच्या शैलीचे कौतुक करताना संकोच करतं नाहीत यावरून आपल्याला समजायला पाहिजे कि मोदी म्हणजे काही साधा विषय नाही.
कॉलेज मध्ये असतानाच नरेंद्र मोदींनी त्यांच्या सामाजिक आयुष्याला सुरुवात केली. राष्ट्रीय स्वयं संघाच्या शाखेत त्यांनी प्रवेश केला. हिंदुत्व आणि अखंड भारत या विचारांनी प्रेरित होऊन नरेंद्र मोदी संघाशी जोडले गेले. पंधरा वर्ष त्यांनी देशाच्या वेग वेगळ्या भागात संघाचे काम केले. संघाच्या परंपरेनुसार संघ त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये पाठवत. नरेंद्र मोदींना देखील त्यांनी राजकारण करण्यासाठी भाजपात पाठवलं. रामजन्मी भूमीच्या आंदोलनात ते खऱ्या अथाने राजकारणात सक्रिय झाले. २००१ ला भाजपने केशूभाई पटेलांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून काढून नरेंद्र मोदींना बसवले. २००१ पासून आजपर्यँत मोदी सतत सत्तेत आहेत. २०१४ पर्यंत मोदी गुजरातचे मुख्यंमत्री होते आणि तेंव्हापासून देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत.
मोदी सत्तेत आल्यापासून विरोधकांचे खूप वाईट दिवस आले आहेत. जनता मोदींना सतत निवडणून देत आहे. २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांनी मोदींना हरवण्याची खूप प्रयत्न केले पण जनतेने त्यांना २८२ वरून ३१२ वर पोहचवले. विरोधक नेहमीच मोदींच्या विरोधात काहींना काही विषय काढून त्यांना मात देण्याचा प्रयत्न करत असतात पण मोदी विरोधकांना राजकीय हुलकावणी देतात.
पण आता भारताचं राजकारण बदललं असल्याचं राजकीय पंडित म्हणतं आहेत. काँग्रेस सारख्या कमकुवत पक्षाची जागा केजरीवाल यांचा आप घेत आहे. केजरीवाल मोदींसारखीच निवडणूक जिणक्यांसाठी मेहनत घेतात आणि मोदी एवढेच ते आक्रमक आहेत. त्यामुळे २०२४ ला केजरीवाल विरुद्ध मोदी मुकाबला झाला तर मोदी हरू पण शकतात असं पत्रकार ‘शिवम वीज’ याना वाटतं.
आयआरएस ते मुख्यमंत्री केजरीवालची स्टोरी पण इंटरेस्टिंग आहे
२०१३ पासून दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले केजरीवाल नेहमीच राष्ट्रीय बातम्यांमध्ये असतात. कधी त्यांच्या कामांमळे तर बऱ्याच वेळेस बाकी नेत्यांवर आरोप केल्यामुळे चर्चेत असतात. पंजाब जिंकल्यापासून तर केजरीवाल फॉर्म मध्ये आले असल्याचं जाणवत आहे. अनेक जण त्यांना भविष्यातला पंतप्रधान म्हणून बघत आहेत.
केजरीवाल इतर नेत्यांसारखे राजकारणी नाहीत. आयआयटी खरगपूर मधून अभियंत्रिकी केल्यावर त्यांनी युपीएसी दिली आणि आयआरएस झाले. भारतीय सेवेत लागल्यावर केजरीवाल फार काळ तिथे टिकले नाहीत. १९९७ ला त्यांनी आयआरएस पदाचा राजीनामा दिली आणि माहिती अधिकाराचे कार्यकतें झाले. दिल्लीतल्या गरीब लोकांना राशन मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या समाजसेवेसाठी २००५ साली रमण मॅगसेसे पुरस्कार देखील मिळाला आहे. पण केजरीवाल लाईमलाईट मध्ये आले २०११ च्या अण्णा आंदोलनात. अण्णा आंदोलनाचे केजरीवाल संयोजक होते. जण लोकपाल कायदा करवून घेण्यासाठी अण्णा आंदोलन चालू होते. केजरीवाल आणि अण्णा आहरे याना त्या आंदोलनात यश मिळालं. पण आंदोलनानंतर केजरीवाल यांनी राजकारणाचा रास्ता धरला. २०१२ च्या डिसेम्बर मध्ये त्यांच्या सहकार्यांना सोबत घेऊन आम आदमी पक्ष स्थापन केला आणि निवडणूक लढवल्या. पहिल्याच निवडणुकीत केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. तेंव्हापासून केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत.
केजरीवाल यांचा प्रवास खूप सहज नव्हता. त्यांनी जे काही मिळवलं आहे ते लक्षणीय आहे. त्यामुळे राजकीय पंडित केजरीवाल २०२४ ला मोदींना टक्कर देतील म्हणतं आहेत. पंजाब निकाल लागल्यापासून केजरीवाल देखील त्याच मूड मध्ये दिसत आहेत. २०२४ लढत केजरीवाल कोणत्या दिशेने नेतात याचा अंदाज लावणं अवघड काम आहे. बाकी कोणाचे काही पण मत असो एवढे मात्र आपण सांगू शकतो कि , २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केजरीवाल विरुद्ध मोदी हा सामना होईल असच दिसतंय.
काँग्रेस आणि इतर पक्षांचे राजकारण
नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात आल्यापासून त्यांनी भारतीय निवडणुकांना वेगळं स्वरूप दिलं आहे. मोदी निवडणुकीत एका प्रतिस्पर्ध्याला आपला विरोधक बनवतात. म्हणजे निवडणूक दोघांमध्ये होईल असं वातावरण तयार करतात. एकदा का तसं वातावरण तयार केलं कि निवडणूक लढवायला सहज होत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी विरोधक म्हणून पुढे केलं. दोन वेळेस हरवल्यानंतर काँग्रेस तिच्या मरणा अवस्थेला पोहचली आहे. त्यामुळेच मोदी आणि भाजपने त्यांचा प्रचार आपच्या केजरीवाल कडे फिरवला आहे. मोदी यांनी जरी केजरीवाल यांच्या कडे मोर्चा वळवला असला तरी काँग्रेस मात्र मोठ्या भूमिकेत असणार आहे. आपने त्यांची जागा घ्यावी हे काँग्रेस सहज होऊ देणार नाही. त्यामुळे भाजपसोबत लढण्याधी आप आणि काँग्रेस मध्ये लढाई होईल.
प्रादेशिक पक्ष त्यांच्या राज्यापुरते मर्यादित आहेत. राष्ट्रीय राजकारणात त्यांना फारसा प्रभाव टाकता येणार नाही. पण त्यांचो भूमिका देखील महत्वाची राहणार आहे. प्रादेशिक पक्ष जर त्याच्या राज्यात मजबुतीने लढले तर भाजपाच्या जागा कमी करू शकतात.
मोदी ,केजरीवाल , काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष या चार बाजूने २०२४ ची लोकसभा फिरेल. लोकसभेला आणखी दोन वर्ष बाकी आहेत. आप आणि भाजप निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पण कोण कोणाला हरवणार हे निडणुकीनंतर कळेल आणि ते ठरवण्याचा अधिकार फक्त जनतेला आहे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !