MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

चैन मार्केटिंग करणाऱ्या Amway कंपनीचा ईडीने बाजार उठवलाय

amway-india-enterprises-private-limited-company-accused-running-multi-level-marketing-scam

खाली दोन माणसं जोडायची दोन महिन्यात दारात BMW उभी असणारं. हे डायलॉग एकदा तरी ऐकला असणार. ब्रेन वॉश झाल्यासारखं मार्केटिंग करणारे पोरं पोरी यांच्यापैकी BMW असलेला मी अजून बघितला नाही मग तरी चैन मार्केटिंगच्या जाळ्यात लोक का अडकतेत हे अजून कळलं नाही. काही कंपन्या स्टॅंडर्डच्या नावाखाली चालूच होत्या. Amway सारखी मोठी कंपनी तरी कधी वाटलं नव्हतं कि संशयाच्या भोवऱ्यात अटकेल. ईडीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ही माहिती दिली आहे. विषय थोडक्यात काय आहे हे एकदा समजून घेऊ.

नेत्यावर धाडसत्र चालू असताना Amway कुठे मधूनच आली हे जरा आश्चर्य वाटत असलं तरी खरं आहे. Amway इंडिया एन्टरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सक्तवसूली संचालनालयाने म्हणजे ईडीने (ED) Amway इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड (Amway India) या कंपनीच्या मालकीची 757.77 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. Amway इंडिया मल्टी लेव्हल मार्केटिंग घोटाळा चालवत असल्याचा आरोप आहे. संलग्न मालमत्तांमध्ये दिंडीगुल, तामिळनाडू येथील कंपनीची जमीन आणि कारखाना इमारत समाविष्ट आहे. त्याचबरोबर कंपनीचा कारखाना, यंत्रसामग्री, वाहने, बँक खाती आणि मुदत ठेवी यांचा समावेश आहे.

ED ने केलेल्या मनी लाँड्रिंगच्या तपासात असे आढळून आले आहे की Amway ही अमेरिकन मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनी, डायरेक्ट सेलिंग मल्टी लेव्हल मार्केटिंग नेटवर्कच्या नावाखाली पिरॅमिड फसवणूक करत आहे. ईडीला असे आढळून आले की कंपनीने ऑफर केलेल्या बहुतेक उत्पादनांची किंमत त्यांच्या पर्यायांच्या तुलनेत जास्त आहेत. वस्तुस्थितीपासून अनभिज्ञ असलेले अनेक लोक कंपनीचे सदस्य म्हणून सामील होण्यासाठी आणि अत्याधिक किंमतीत उत्पादने खरेदी करण्याच्या मोहाला बळी पडतात किंवा प्रवृत्त होतात. यातील गंमतीचा भाग म्हणजे नवीन सभासद स्वतःच्या वापरासाठी Amway ची उत्पादने खरेदी करत नसून कंपनीचा सदस्य बनून श्रीमंत होण्यासाठी खरेदी करत होते. कंपनीने 2002-03 ते 2021-22 या कालावधीत तिच्या व्यवसायातून 27,562 कोटी रुपये गोळा केले. याच कालावधीत Amway ने भारत आणि अमेरिकेतील आपले वितरक आणि सदस्य यांना 7588 कोटी रुपयांचे कमिशन दिले आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.