राष्ट्रवादी काँग्रेसचे विधपरिषेदेचे आमदार अमोल मिटकरी सध्या वादाच्या भोवऱ्यात आले आहेत. इस्लामपूरच्या सभेत ब्राह्मण पुरोहितांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर ब्राह्मण महासंघाने अमोल मिटकरींच्या विरोधात घोषणाबाजी केली. ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करतं असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. एकूणच काय तर अनोल मिटकरींच्या विरोधात वातावरण तापलं आहे.
पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांना अमोल मिटकरींच्या वक्तव्या बाबत विचारलं असता त्यांनी अमोल मिटकरींनी काहीही चूक केलेली नाही किंवा त्यांनी चुकीचे विधान केले नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील अश्याच पद्धीतीने व्यक्त होत आहेत. जवळ जवळ निम्मी राष्ट्रवादी अमोल मिटकरींनी बरोबर वक्तव्य केलं असल्याचं बोलत आहे. मग पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मिटकरींच्या वक्त्यव्यावर दिलगिरी व्यक्त करत आहेत हा मोठा प्रश्न आहे. याचाच आपण आढावा घेणार आहोत.
अमोल मिटकरी नेमकं काय म्हणालेत ?
इस्लामपुरच्या सभेत बोलताना मिटकरी म्हणाले, “मी एका ठिकाणी गेलो होतो. मुलीचा बाप म्हणे, बसा कन्यादान आहे. अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. पण कन्या काय दान करण्याचा विषय असतो का ? ते म्हणाले, हो, हो असतो ना. आम्हाला शिकवलंय असं. “तिथं महाराज नवऱ्या मुलाला म्हणाले, तुमचा आणि तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्या. म्हणा, ‘मम भार्या समर्पयामी’. तेव्हा मी त्या नवरदेवाच्या कानात म्हटलं, अरे येड्या, ‘मम’ म्हणजे माझी, ‘भार्या’ म्हणजे बायको, ‘समर्पयामी’ म्हणजे घेऊन जा, असं ते महाराज म्हणत आहेत.”
भाजपकडून मिटकरींवर चुप्पी कशामुळे ?
खरं तर भारतीय जनता पक्षाला ब्राहमण समाजाकडून समर्थन मिळत पण मिटकरी प्रकरणावर भाजपकडून पाहिजे तसा प्रतिसाद समाजाला मिळाला नाही. पुण्यात जे आंदोलन झाले तर पण ब्राह्मण महासंघाचे झाले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी त्यात नव्हते. पण ब्राह्माण समाजाचे समर्थन मिळत असताना देखील भाजप का मिटकरींच्या विरोधात मजबूत भूमिका घेत नाही हा देखील एक प्रश्न आहे. राजकारणाचे जाणकार सांगतात कि भाजपने राजकीय गणिताचा विचार करून मिटकरी प्रकरणात भूमिका घेतली आहे.
भाजप हा शेटजी-भटजींचा पक्ष आहे, अशी टीका पूर्वीच्या काळी भाजपवर केली जायची. भाजपमध्ये केवळ उच्चवर्णीय नेत्यांची गर्दी आहे. उच्चवर्णीयांचेच प्रश्न भाजप हाती घेतो, असा आरोप केला जायचा. पण पुढे जनमानसातील आपली प्रतिमा बदलण्यासाठी भाजपने माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी हा फॉर्म्युला हाती घेतला. फडणवीसांच्या काळात अनेक मराठा नेते भाजपमध्ये सहभागी झाले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भाजपला बहुजन चेहरामोहरा देण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहे. पण अश्यात जर भाजपने ब्रह्माणांची बाजू घेतली तर बहुजन नेते परत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला जातील म्हणून भाजप मिटकरींच्या विरोधात भूमिका घेत नसल्याचं बोललं जात आहे.
जयंत पाटीलांनी का माघार घेतली ?
राष्ट्रवादी पक्षाला बहुजन समाजाचे समर्थन आहे हे जग जाहीर आहे. पण पक्ष म्हणून राष्ट्र्वादीने कधीही फक्त बहुजनांचा पक्ष म्हणून भूमिका घेतली नाही. राष्ट्रवादी हा पक्ष सर्व जाती धर्मींयांचा पक्ष असल्याचं अध्यक्ष शरद पवार सांगतात. त्यामुळे पक्षाला नेहमीच सर्व जाती धर्मियांची बाजू घ्यावी लागते. प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनी देखील पक्षाची भूमिका घेतली आहे. जयंत पाटील मिटकरींवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “अमोल मिटकरी यांच्या भाषणात बरेच विनोद होते. त्यामुळे सर्व जण पोट धरून हसत होते. त्यांनी लग्नप्रक्रियेतील मंत्रांचा उल्लेख केला आणि त्यानंतर वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर मी त्यांना भाषण थांबवण्याची सूचना दिली. ते वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत आहे.”
पण पक्षाचे कार्यकतें जयंत पाटील यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. पक्षातले अनेक कार्यकर्ते जयंत पाटील यांची भूमिका चुकीचे असल्याचं बोलत आहेत.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !