MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

अपघाताने शोध लागलेल्या व्हायग्राने लाखो लोकांच्या सेक्स लाईफला मदत केलीय

जगातल्या सर्व मेडिकल वर सर्वात विकली जाणारी कोणती गोळी असेल तर ती म्हणजे निळी गोळी. आपल्या मराठी लोकांना व्हायग्राच उच्चारण करायला अडचण येते म्हणून व्हायग्राच नाव पडलं निळी गोळी कारण तिचा रंग निळा आहे. व्हायग्राच्या काय करामती आहेत हे आपल्या भारतीयांना वेगळ्या सांगायची गरज नाही. ज्या व्हायग्राने लाखो लोकांची सेक्स लाईफ सुधारलेली आहे ती २५ वर्षाची झाली आहे. १९८७ ला पहिली व्हायग्रा बनवली गेली. तेंव्हा तिच्या पंचविसीला तिचा इतिहास जाणून घेणं बनतच. नेमकं व्हायग्रा आहे काय , तिच्यामुळे लोकांना काय फायदा होतो , व्हायग्राचे साईड ईफेक्ट होतात काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांसाठी व्हायग्रा मार्केट मध्ये आहे कि नाही या सर्व प्रश्नच आढावा आपण ह्यात घेऊ

व्हायग्रा काय आहे ?

 ‘सिल्डेनाफिल’ नावाचं एक औषध आहे याचा वापर ‘Erectile Dysfunction’ म्हणजे पुरूषांच्या लिंगात ताठरता येत नसेल तर त्यावर उपचार म्हणून केला जातो. कामोत्तेजना (सेक्स करण्याची इच्छा) उत्पन्न झाल्यानंतर हे औषध घेतल्यास पुरुषांच्या लिंगामध्ये तात्पुरत्या काळासाठी रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे लिंगात ताठरता येण्यास मदत होते. ह्या  ‘सिल्डेनाफिल’ अनेक औषधे बाजारात उपलब्द आहेत पण सर्वात फेमस काय असेल तर ते आहे व्हायग्रा.

अपघाताने लागला होता व्हायग्राचा शोध ?

सेक्स लाईफ’ सुधारणारी ही गोळी खरंतर, या दृष्टीने तयार करण्यात आली नव्हती. त्याचा मुख्य उद्देश पूर्णत: वेगळा होता.
ही गोष्ट 1990 च्या दशकातील. अमेरिकेतील संशोधकांची एक टीम ‘सिल्डेनाफिल’ नायट्रेट या औषधावर संशोधन करत होती. ‘अॅगीना’ या वैद्यकीय समस्येवर उपचारासाठी या गोळीवर संशोधन करण्यात येत होतं. या आजारात छातीत, खांद्यात तीव्र वेदना झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. औषधनिर्मितीत अग्रेसर असणाऱ्या फायझर या कंपनीकडून हे संशोधन करण्यात येत होतं. याचा प्रमुख उद्देश होता हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या थोड्या रिलॅक्स होतील. जेणेकरून रक्तपुरवठा वाढण्यास मदत होईल.

पण हे संशोधन पूर्णत: फेल गेलं. या औषधाचा चांगला परिणाम संशोधकांना आढळून आला नाही. कंपनीने या औषधाचं संशोधन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण अपघाताने या औषधाचा एक विचित्र परिणाम शरीरावर दिसून येऊ लागला. हा परिणाम कोणालाही अपेक्षित नव्हता. औषधाची चाचणी केलेले स्वयंसेवक औषध घेतल्यानंतर लिंगात खूप ताठरता आल्याचं सांगत होते. हा साईडइफेक्ट सामान्य नव्हता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संशोधनातील अनेक स्वयंसेवकांनी औषध कंपनीला परत देण्यास नकार दिला.

त्यामुळे कंपनीने हे नक्की कशामुळे होतंय. याची चौकशी करण्यासाठी सांगण्यात आलं. चौकशीत समोर आलं की, या गोळीमुळे लिंगात असलेल्या शरीरातील सर्वात लहान रक्तवाहिनीत रक्त पुरवठा वाढला. ज्यामुळे लिंगाची ताठरता दीर्घकाळ वाढली.”

या गोळीमुळे नक्की काय होतं? यासाठी संशोधकांनी नपुंसक व्यक्तीच्या लिंगातील एका पेशीवर अभ्यास सुरू केला. व्हायग्रा दिल्यानंतर लिंगातील रक्तवाहिन्या रिलॅक्स झाल्याचं त्यांना संशोधनात दिसून आलं. तज्ज्ञ म्हणतात, पुरूषांमध्ये कामेच्छा जागृत झाली की लिंगातील स्नायू शिथिल होतात ज्यामुळे रक्तपुरवठा अधिक होण्यास मदत होते.

व्हायग्राचा शोध लागण्याआधी ‘Erectile Dysfunction’ म्हणजे पुरूषांच्या लिंगात ताठरता न येण्याच्या समस्येवर तोंडावाटे घेण्याची कोणतीही गोळी नव्हती. लिंगात ताठरता आणण्यासाठी विविध प्रकारचे उपाय केले जात असत. सेक्स टॉनिक्स, टेस्टोस्ट्रोरॉन, हर्बल औषध , लिंगात देण्यात येणारं इंजेक्शन आणि इंप्लांटच्या माध्यमातून लिंगात नसणाऱ्या ताठरतेवर उपचार केले जायचे. ज्याचा काहीवेळा फार कमी किंवा अजिबात फायदा होत नसे.”

व्हायग्रा बाजारात कशी आली ?

सेक्स, कामोत्तेजना यांसारखे शब्द आजही समाजात एक टॅबू म्हणून पाहिले जातात. त्यामुळे व्हायग्रा बाजारात येण्याआधी खूप विरोध झाला होता. व्हायग्रा बाजारात आणण्यासाठी रूनी नेल्सन आणि डॉ. साल जिओजिर्यानी यांचं फार मोठं योगदान आहे. या दोघांनी धार्मिक गुरू, राजकीय नेते यांचा विरोध झुगारून हे औषध बाजारात आणलं. डॉ. साल जिओजिर्यानी व्हायग्राच्या कॅम्पेनचे प्रमुख होते. तर, रूनी नेल्सन हे कॅम्पेनवर लक्ष ठेऊन होते. ही गोळी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरण्यात आलेल्या घोषणा लोकांच्या दृष्टीने बनवण्यात आल्या होत्या. यामध्ये नपुंसक यांसारखे शब्द नव्हते, तर लिंगात ताठरता न येण्यासाठी वापरण्यात येणारा ‘Erectile Dysfunction’ हा शब्दप्रयोग यात करण्यात आले होते.

व्हायग्रा कोणाला दिली जाते ?

‘Erectile Dysfunction’ म्हणजे लिंगात ताठरता नसणाऱ्या व्यक्तींना हे औषध दिलं जातं. साधारपने या औषधाचा असर होण्यासाठी 30 ते 60 मिनिटं लागतात, सेक्स करण्याआधी चार तास हे औषध घेऊ शकतात, पण फक्त हे औषध घेऊन लिंगात ताठरता येणार नाही. त्यासाठी कामोत्तेजना यावी लागते

पुरूषांसाठी व्हायग्रा बाजारात उपलब्ध झाल्यानंतर महिलांमधील कामेच्छा वाढवण्यासाठी 2016 मध्ये ‘फिमेल व्हायग्रा’ गोळीची निर्मिती करण्यात आली. या औषधाचं नाव फ्लिबॅनसेरिन असं आहे. तज्ज्ञ सांगतात, की अनेक प्रकरणात व्हायग्राचा फायदा होतो. पण प्रत्येकालाच होतो असं नाही. ही गोळी जेवताना किंवा जेवल्यानंतर घेतली तरी चालते. पण 50 मिलीग्रॅपपेक्षा जास्त हे औषध घेऊ नये.

भारतात व्हायग्राचा वापर वाढलाय ?

ऑल इंडिया केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, 2010 ते 2018 या काळात भारतात व्हायग्राचा वापर 40 टक्क्यांनी वाढला होता. , भारतात गेल्याकाही वर्षात भारतात व्हायग्राचा वापर खूप जास्त वाढलाय.” पण भारतात या औषधाला सुरूवातीला मोठा विरोध झाला होता. सध्या भारतात व्हायग्राचे अनेक देशी अवतार उपलब्ध आहेत. ज्यांना मोठी मागणी आहे. “देशात व्हायग्रा ओव्हर द काउंटर म्हणजेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय केमिस्ट दुकानात सहज उपलब्ध आहे,” .

“भारतात व्हायग्राचा वापर वाढण्याची तीन प्रमुख कारणं आहेत. सहजरित्या केमिस्टमध्ये उपलब्ध होणारं औषध लोक लैंगिक समस्यांबाबत जागृत झालेत. लैंगिक त्रासाबाबत डॅाक्टरांशी बोलण्यात त्यांना संकोच वाटत नाही. लिंगात ताठरता येत नसेल तर ऑनलाईन खूप माहिती उपलब्ध आहे. लोक ही माहिती वाचून औषध घेत आहेत.” “18 वर्षांच्या मुलांपासून 70-80 वर्षाचे वयोवृद्ध लोक आता व्हायग्रा घेत आहेत. पण हे औषध डॅाक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिलं जाऊ नये. असे भारत सरकारचे नियम आहेत.

व्हायग्राचे साईडइफेक्ट आहेत ?

तज्ज्ञ सागंतात, व्हायग्रा घेताना वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. या औषधाच्या जास्त वापराने आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही हृदयरोगासाठी नायट्रेट असलेली औषधं घेत असाल तर व्हायग्रामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयरोग असलेल्यांनी हे औषध घेताना काळजी घेतली पाहिजे.” हे औषध घेतल्यामुळे काहीवेळा रक्तदाब अचानक कमी होतो. व्हायग्राचे हे साईडइफेक्ट आहेत डोकेदुखी ,गुंगी येणं , डोळ्यांनी स्पष्ट न दिसणं ,नाक चोंदणं ,छातीत दुखणं अचानक दृष्टी जाणं

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.