MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !

eknath-shinde-new-chankay-of-mahrashtra

राज्यात जे काही सत्ता नाट्य झालं आहे किंवा जे काही घडवल आहे. याचे कर्ते धरते सर्व काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत. मीडियाला चाणक्य शोधायचा खूप किडा असतो पण मला कळत नाही कोणताही मीडिया शिंदेला चाणक्य म्हणून का दाखवत नाहीये. असो ज्याची त्याची मर्जी. तर शिंदेनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पद मिळवल आहे यासाठी ते 2017 पासून प्रयत्न करत आहेत. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळेला शिवसेना मंत्र्यांनी त्यांचे राजीनामे खिशयात ठेवले होते. याचे कर्ते करवते शिंदे होते. त्यांनीच याची सुरुवात केली होती. शरद पवार यांनी पण महापालिका निवडणुकीच्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणूका लागतील याचे संकेत दिले होते. पण देवेंद्र फडवणीस यांनी मुंबईचे महापौर पद शिवसेनेला देवून निवडणूक टाळली.

त्यानंतर दोन वर्ष भाजपा सरकार चालले पण शिवसेना आणि एकनाथ शिंदे फडणवीस यांच्यावर खुश नव्हते. याची प्रचिती 2019 च्या निवडणुकी नंतर राज्याला आली. शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढून राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत जाण्यासाठीचे श्रेय संजय राऊत यांना दिल जातं पण खरे सूत्रधार एकनाथ शिंदेच होते. आठवत असेल तर बघा संजय राऊत मीडिया मध्ये बडबड करत असताना एकनाथ शिंदे ग्राउंडवर काम करत होते. सर्व प्लॅनिंग मध्ये ते आघाडी वर होते. शिंदे मुख्यमंत्री होणार हे जवळ जवळ पक्क झाल होत. पण नवख्या किंवा कमी अनुभवी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करायला अजित पवार यांची नाराजी होती. त्यातूनच अजित पवार यांनी भाजपासोबत हात मिळवले. शरद पवार यांनी एक दिवसात त्यांचा बंड मोडून काढला. अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी एकनाथ शिंदेनी त्यांची ताकद लावली होती. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या संजय बनसोड यांना कस उचलून आणल होत हे राज्याने बघितल आहे.

अजित पवार यांचे बंड शमल्यावर शरद पवार यांनी जपून पावले टाकली आणि मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचे नाव पुढे केल. बाळ ठाकरेंच्या मुलाला मुख्यमंत्री वैगेरे करत आहोत ह्या थापा होत्या. उद्धव यांना मुख्यमंत्री करून शरद पवार यांना त्यांचा पक्ष एक संघ ठेवायचा होता. तो त्यांनी केला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी एकसंघ राहिली. पण ह्या सर्व घटनाक्रमात एक जन नाराज होता. त्याच्या सर्व प्लॅनिंग वर पाणी पडलं होत. त्याच नाव होत एकनाथ संभाजी शिंदे…

परिस्थिति अशी होती की काहीही करता येणं शक्य नव्हत. जे होत आहे त्यात सहभागी होण्याशिवाय त्यांच्या कडे पर्याय नव्हता. शरद पवार यांनी 2019 ला एकनाथ शिंदेना चेक दिला आणि शिंदे थांबले पण शिंदे चेकमट झाले नव्हते. एकनाथ शिंदेची खेळायची बारी बाकी होती. 2019 पासूनच शिंदे सरकारमध्ये खास सक्रिय नव्हते. म्हणजे ते सरकार मध्ये आहेत की नाही ही देखील बऱ्याच लोकाना माहिती नव्हती. पण त्यांच काम चालू होत. शिवसेनेचे आमदार त्यांच्या बाजूने करण्यासाठी त्यांचें प्रयत्न चालूच होते. योग्य वेळ बघून ते त्यांची चाल खेळणार होतेच.

सरकारला दोन वर्षापेक्षा मोठा काळ झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास असे काही काम केले नाही. ही योग्य वेळ शिंदे यांनी ओळखली आणि देवेंद्र फडवणीस यांच्या मदतीने केंद्रीय भाजपाच्या नेत्यांशी बोलण्या केल्या पण आपण मुख्यमंत्री पद घेत आहोत याचा अंदाज फडवणीस यांना लागू दिला नाही. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्व मीडिया फडवणीस यांना चाणक्य म्हणत होता. मात्र हा सर्व खेळ शिंदे करत होते. आपण अस काही करू अस उद्धव यांना समजू नये म्हणून त्यांनी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विधान परिषदेत निवडून आणले. ही देखील शिंदे यांची चाणक्यनीती आहे.

नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची गॅरंटी मिळाल्यावर एकनाथ शिंदे सुरतेला निघाले आणि तिथून गुवाहटीला. एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट मोदी-शहा यांच्यासोबत बोलण्या केल्या याची माहिती त्यांनी देवेंद्र फडवणीस यांना समजू दिली नाही. शिवसेनेच्या आमदारांना याची सर्व माहिती होती. त्याशिवाय ते शिंदे यांच्या बाजूने गेले नसते. हे शिंदे यांच्या चाणक्य नितीचे दुसरे उदाहरण !

उद्धव यांनी राजीनामा दिल्यावर फडणवीस यांना मोदी शहा यांच्याकडून मेसेज आला की शिंदे मुख्यमंत्री होतील. त्यामुळेच फडवणीस फारसे खुश नव्हते. पण ह्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी सरकारच्या बाहेर राहण्याचा निर्णय घेतला खरा पण मोदी-शहा यांना देवेंद्र यांना उपमुख्यमंत्री करायचं होत. मोदींचा आदेश न पाळण्याची फडणवीसांची हिम्मत होणार नव्हतीच आणि झाली पण नाही. गप गुमान उपमुख्यमंत्री पद त्यांना स्वीकारव लागलं आणि पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडवणीस यांना शिंदे यांनी त्यांच्याच बाजूने खेळून चेकमेट केल.

2019 ला शरद पवार यांनी दिलेल्या चेकला शिंदेनीं रुबाबदार उत्तर देत शरद पवारांना चेकमेट केलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले.आर आर आबा 2014 ला विधान भवनात भाषण देताना एकनाथ खंडसे यांना उदेशून म्हंटले होते की सरकार मध्ये फक्त एक नंबरच पद असत, दुसर, तिसर अस काही नसत. आता नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेनीं एक नंबरचे पद घेतले आहे. याचा अर्थ फडवणीस यांच्या कडे काही उरले नाही आणि जे काही असेल ते शिंदे येत्या काळात त्यांच्याकडून हिसकावून घेतील.

उपमुख्यमंत्री पद स्वीकारून फडवणीस संपले आहेत तर उद्धव ठाकरे उभारी घेतील अस काही राहिले नाही त्यामुळे येणारा काळ एकनाथ शिंदेचा असणार आहे. पत्रकार राजदिप सरदेसाई एकदा म्हंटला होता की देवेंद्र फडणवीस दुसरे शरद पवार आहेत. फडणवीस हे शरद पवार होवू शकले नाहीत पण एकनाथ शिंदे नक्कीच दुसरे शरद पवार म्हणून पुढे आले आहेत. राज्याच्या राजकारणाचे केंद्रस्थान शरद पवारांकडून एकनाथ शिंदे यांच्या कडे स्थलांतरित झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे नवे चाणक्य बनले आहेत !

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.