आज रात्री (२२ एप्रिल ) आठ वाजल्यापासून हे नियम लागू होणार आहेत. या नवीन नियमानुसार काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. ते बदल कसे असतील समजून घेऊ.
ज़िल्हा बंदी आहे का ?
एका जिल्ह्यातून दूसऱ्या जिल्ह्यात जाणार असाल तर खाजगी गाडीतून जाण्यासाठी तुम्ही अत्यावश्यक सेवेत काम करत असणारे असाल किंवा मेडिकल इमर्जेन्सी असेल तरच तुम्हाला एका जिल्ह्यातून दूसऱ्या जिल्ह्यात जाता येईल.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी असेल ?
शहरांतर्गत बसेस ५० टक्के क्षमतेने चालू राहणार. उभा राहून प्रवास करता येणार नाही.
खाजगी बसेस मधून आंतरजिल्हा प्रवास केल्यास १४ दिवस होम कॉरन्टाईन व्हावे लागणार.
आंतरजिल्हा प्रवासासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये मात्र प्रवाशी क्षमतेवर मर्यादा नाहीत. आसन क्षमतेनुसार प्रवास करता येणार आहे. यामध्ये एका शहरात बसेसना दोन थांबे घेता येणार. उभा राहून प्रवास करता येणार नाही. थांबलेल्या स्टॉपवर होम कॉरन्टाईनचा शिक्का मारण्यात येणार व संबंधित व्यक्तिंना १४ दिवस होम कॉरन्टाईन रहावं लागणार. थोडक्यात खाजगी बसेस मधून आंतरजिल्हा प्रवास केल्यास १४ दिवस होम कॉरन्टाईन व्हावे लागणार. आंतरराज्यीय रेल्वे प्रवास करताना महाराष्ट्रात उतरलात तर १४ दिवस कॉरन्टाईन व्हावं लागणार.
आंतरराज्यीय रेल्वे प्रवास करताना महाराष्ट्रात उतरलात तर १४ दिवस कॉरन्टाईन व्हावं लागणार.
सरकारी कार्यालये १५ टक्के क्षमतेनं चालू राहणार.. सरकारी कर्मचारी, वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचारी, मेडिकल इमर्जन्सी असेल तरच तुम्ही लोकल व मेट्रो वापरू शकता.
५० हजार रुपयांचा दंड?
लग्न दोन तासात उरकून घ्याव्येत. २५ लोकांपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असता कामा नये. (नवरा नवरी देखील या २५ लोकांमध्ये येतात) नाहीतर ५० हजार रुपयांचा दंड.
किराणा ७ ते ११ या वेळेत मिळेल.
राणा मालाच्या दुकानांची वेळही आता शासनाकडून बदलण्यात आली आहे. निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
हे खास आपल्यासाठी
कोविडच्या काळात वरदान ठरलेल्या जम्बो हॉस्पिटलचा उगम ब्रिटिशांच्या काळात झालाय
पुणे शहरासाठी नवी नियमावली जाहीर काय सुरु, काय बंद ? (Pune lockdown guidelines today)
लसीकरण पॅकेज विकणाऱ्या हॉटेल वर कारवाई होणार (Hospital and hotel can not offer vaccination package)