MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

२० हजारांच्या आत ५ उत्कृष्ट ५ जी मोबाईल

२०२० नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत विचाराल तर अगदी मोजके ५ जी मोबाईल भारतीय बाजारात पाहायला मिळत होते. ते बरोबर ही होतं कारण की ५ जी ची सेवा कुठेही उपलब्ध नव्हती आणि ती अजून सुद्धा उपलब्ध नाही. पण मात्र येणाऱ्या काही महिन्यांमध्ये ५ जी चे ट्रायल्स सुरू होणार आहेत. २०२२ च्या सुरुवातीला आपल्याला ही सेवा मिळेल अशी एक संभावना आहे. ५ जी मोबाईल विषयी चर्चा सुरु आहे म्हणल्यावर प्रत्येक ब्रँड आपला ५ जी मोबाईल बाजारात आणतोय. काही लोकांच्या मनात हे सुद्धा विचार असतील की हे मोबाईल का म्हणून घ्यायचे ? कारण की अजून आपल्याकडे जरी ५ जी उपलब्ध नसले तरी यात तुम्ही ४ जी वापरू शकता. याव्यतिरिक्त या मोबाईलचे प्रोसेसर हे फार उत्कृष्ट आणि ४ जी मोबाईल पेक्षा चांगले आहेत. यांची क्षमता सुद्धा जास्त आहे. आपण सध्याच्या परिस्थितीत ५ उत्कृष्ट ५ जी मोबाईल जे की २० हजार रुपयांच्या आत आहेत त्यांच्यावर एक नजर टाकूया.

१) Realme Narzo 30 Pro

ह्या मोबाईल विषयी बोलाल तर या मोबाईलची किंमत सुरू होते १६,९९९ रुपयांपासून आणि यातील सर्वात महागडा वर्जन हा १९,९९९ रुपयेला आहे. १६,९९९ मध्ये मध्ये ६/६४ जीबी रॅम व स्टोरेज मिळते. यासोबत यामध्ये मीडिया टेक डायमेन सीटी ८०० यु हे प्रोसेसर आहे. अतिशय चांगलं हे प्रोसेसर आहे. तसंच यामध्ये आपल्याला दोन्ही स्लॉट ५ जी सपोर्टेड आहे. यामध्ये ५००० एम ए एच ची बॅटरी आहे. ३० वॅटची चार्जिंग स्पीड, ४८ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा मागच्या बाजूने आणि १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या मध्ये १२० Hz चा स्मुत डिस्प्ले पाहायला मिळतो, याच्या महागड्या वर्जन मध्ये रॅम आणि इंटरनल (८/१२८) स्टोरेज क्षमता वाढलेली आहे बाकी सर्व गोष्टी समान आहेत.

२) Realme 8 5g

मी या मोबाईल विषयी बोलायचं झालं तर यामध्ये १४,९९९ रुपयांमध्ये मध्ये ४/१२८ व १६,९९९ रुपयांमध्ये ८/१२८ हे दोन वर्जन उपलब्ध आहेत. यामध्ये बॅटरी आणि कॅमेरा हे Realme Narzo 30 Pro सारखेच आहे, यामध्ये आपल्याला ९० Hz चा डिस्प्ले बघायला मिळतो, तसेच प्रोसेसर हे मीडिया टेक डायमेन सीटी ७०० यु आहे. या प्रोसेसरमुळे या फोनची किंमत कमीत कमी झाल्याचे लक्षात येते. हा एक एन्ट्री लेवल ५ जी प्रोसेसर आहे, ज्यांच बजेट हे १५ हजारांच्या जवळ आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

३) Samsung M 42

हा मोबाईल सॅमसंग कंपनी कडून हल्लीच लॉन्च केलेला आहे. यामध्ये कॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर आहे, या फोनची विशेषता अशी की इतक्या उत्तम प्रोसेसर सोबत सॅमसंग कडून लॉन्च झालेला २०,००० रुपयांच्या आत मोबाईल आपल्याला बघायला मिळतो. पण काही गोष्टी यामध्ये कमी सुद्धा केलेल्या आहेत जसे की जरी ५००० एम एच ची बॅटरी मिळते पण यासोबत चार्जिंग स्पीड कमी दिलेली आहे जी की १५ वॅटची आहे. तर हा फोन चार्ज व्हायला बराच वेळ घेऊ शकतो, कॅमेरा विषयी बोलायचं झालं तर ४८ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेंसर आहे. एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले मिळतो. नॉक्सची सिक्युरिटी पण मिळते त्यामुळे आपला फोन सुरक्षित राहील याची हमी ग्राहकांकडे राहील. तसेच ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा मिळते. आपल्याला एनएफसी मिळेल ज्यामुळे कॉन्टॅक्टलेस ट्रांजेक्शन होण्यास मदत होते. जर तुम्ही एक सॅमसंग प्रेमी असाल तर नक्कीच हा फोन तुम्हाला आवडेल पण ज्या लोकांना अजून काही गोष्टी हव्याआहेत आणि अजून चांगले कॅमेरा पाहिजे त्यांनी पुढचा फोन बघा.

४) Realme X7

यामध्ये आपल्याला १९,९९९ रुपयांमध्ये ६/१२८ आणि २१,९९९ रुपयांमध्ये ८/१२८ असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या मोबाईल मध्ये मीडिया टेक डायमेन सिटी ८०० यु वापरले आहे. हा मोबाईल इतर मोबाईल पेक्षा काही जास्त वैशिष्ट्य ( फीचर्स ) ग्राहकांना देतो. यामध्ये ६४ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे व १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी खूप चांगली असून बरेचसे मोड आपल्याला त्यामध्ये मिळतात. सोबतच लिक्विड कुलिंग, इन डिस्प्लेफिंगर प्रिंट, ४३१० एम एच ची बॅटरी व त्यासोबत ५० वॅटची सुपर डार्ट चार्जिंग मिळते. सुपर अमोलेड डिस्प्ले यामध्ये आहे. जे लोक वीस हजार रुपये खर्च करू इच्छिता आणि ५ जी मोबाईल घेण्यात उत्सुक आहेत त्याच्यासाठी हा मोबाईल सर्वोत्तम पर्याय आहे.

५) Oppo A74

ह्या मोबाईलची किंमत १९,९९९ रुपये इतकी आहे आणि यामध्ये आपल्याला ६/१२८ जीबी रॅम व इंटरनल स्टोरेज आहे. कॅमेरा ४८ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप मागच्या बाजूने आणि फ्रंट कॅमेरा मात्र ८ मेगापिक्सेलचा आहे. तसेच बॅटरी ५००० एम एच आणि प्रोसेसर हे कॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० आहे. यामध्ये प्रोसेसर हे अजून चांगल्या प्रकारचा असू शकला असता. सेल्फी कॅमेरा सुद्धा १६ मेगापिक्सल द्यायला हवा होता मात्र ओप्पो कंपनीचा फॅन बेस याला नक्कीच पसंती देईल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.