MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

रॉक स्टारची १० वर्षे – चित्रपटाबद्दलच्या कधीही न ऐकलेल्या दहा गोष्टी

दहा वर्षांपूर्वी आलेला रॉक स्टार हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून आहे. रॉक स्टार हा सिनेमा सगळ्यासाठी एक वेगळा प्रयोग होता. दिग्दर्शक इम्तियाझ अली, संगीतकार ए. आर. रेहमान, गीतकार इर्शाद कामिल, गायक मोहित चौहान आणि अभिनेता रणबीर कपूर या सगळ्याच्या दर्जेदार कामाची गोळाबेरीज म्हणजे ही उत्कृष्ट कलाकृती. तर जाणून घ्या या चित्रपटाबद्दलच्या १० मनोरंजक गोष्टी

१) ह्रितिक आणि करिनाला घेऊन २००७ ला इम्तियाझ करणार होता हा चित्रपट

पहिला ड्राफ्ट लिहल्यानंतर दिग्दर्शकाच्या डोळ्यासमोर ही जोडी होती. मात्र फिल्मचा शेवट ज्यामध्ये हिरोचा मृत्यू होतो हे आवडले नाही म्हणून हृतिकने हा सिनेमा करण्यास नकार दिला. तसेच रणबीरच्या बरोबर बहीण करिनाला लव्ह सीन्स शूट करणं अवघड असल्याने तिलाही हा प्रोजेक्ट सोडावा लागला.

२) रणबीरने दिली होती इम्तियाझला रॉक स्टारची ऑफर

सावरिया चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणबीरला एका मित्राने रॉक स्टारची कथा ऐकवली. यानंतर इम्तियाझ दुसऱ्या एका चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन आला तेव्हा रणबीरने रॉक स्टार बद्दल विचारले. सर्व गोष्टी जुळून येत नसल्याने चित्रपट लांबणीवर जात असल्याचं इम्तियाझने सांगितलं. त्यानंतर दोन आठवड्याने इम्तियाझने स्वतः फोन करून रणबीरला सांगितलं कि तो रॉक स्टार वर पुन्हा काम करत आहे. तीन महिन्याने तो स्क्रिप्ट आणि निर्माता घेऊनच रणबीर कडे गेला. यानंतर साकारली ही सर्वोत्तम कलाकृती.

३) शूटिंग उलटी सुरवात केली होती.

फिल्म निर्मात्यांना रणबीरच्या केशरचनेचे सातत्य कुठेही खंडित होऊ द्यायचे नव्हते. हयाच कारणास्तव शेवटचे सीन्स ज्यामध्ये जॉर्डेनचे केस लांब आहेत ते सीन्स पहिले शूट करण्यात आले व सुरवातीला म्हणजेच जॉर्डेन अजून जनार्दन जाखर अवतारात छोटा केसांमध्ये असतो ते नंतर शूट करण्यात आले.

४) हिंदी येत नाही, बॉलीवूड माहित नाही तरीही झाली रातोरात सुपरस्टार

अमेरिकेत वाढलेली नर्गिस फाकरी पेशाने आधी मॉडेल होती. ३२ वर्षीय नर्गिसचा हा पहिलाच चित्रपट होता. नर्गिसला हिंदी अजिबातच येत नसल्याने चित्रपटात मोना घोष शेट्टीने तिला आवाज दिला आहे. तरी सुद्धा तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले आणि तिला त्यावर्षींच्या अनेक पुरस्करांसाठी नामांकन मिळाले, त्यात फिल्म फेअरचा ही समावेश होता.

५) दीपिकाच्या नावाला होती पहिली पसंती

दिग्दर्शक इम्तियाझ अलीची नर्गिसने साकारलेलंय हीर कौलच्या भूमिकेसाठी पहिली पसंती दीपिकाला होती. पण काही कारणास्तव हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. दीपिकाचा त्यावेळेस एकही चित्रपट रिलीज झाला नव्हता. जर दीपिकाला हा चित्रपट मिळाला असता तर तिचा हा पहिलाच चित्रपट ठरला असता. त्यानंतर मात्र दीपिका-इम्तियाझ जोडीने लव्ह आज कल, कॉकटेल, तमाशा असे एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट दिले.

६) रणबीरने भूमिकेसाठी गिटार वाजवायचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते.

सद्दा हक या गाण्यामध्ये जीव ओतून गिटार वाजवणारा जॉर्डन अनेकांच्या मनात अजूनही घर करून आहे. याच भूमिकेला न्याय देण्यासाठी रणबीरने गिटार वाजवण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतले त्याचबरोबर रेहमान जेव्हा स्टुडिओ मध्ये गाणी रेकॉर्ड करायचा तेव्हा प्रत्येक वेळेस रणबीर उपस्थित असायचा.

७)मायकल जॅक्सन कनेक्शन

सद्दा हक गाणं म्हटलं कि डोक्यात येते सुरवातीची गिटार धून. ही धून वाजवली आहे प्रसिद्ध गिटारिस्ट Orianthi Panagaris यांनी जे प्रसिद्ध पॉप गायक मायकल जॅक्सन यांच्या बँडमध्ये मुख्य गिटारिस्ट होते.

८) हजरत निजामुद्दीन कनेक्शन

कुन फाया न आवडणारा माणूस सापडणे अवघड. हजरत निजामुद्दीन दर्ग्यात ही कव्वाली शूट करण्यात आली. रणबीर इम्तियाझ आणि मोहित चौहान या तिघांनी इथेच चित्रपटाच्या संगीताचे अनावरण केले. संगीतकार रेहमानची या दर्ग्यावर निस्सीम श्रद्धा आहे. दिल्ली जेव्हा कधी येतो तेव्हा दर्ग्याला भेट दिल्याशिवाय जात नाही.

९)रणबीरच्या आजोबांची चित्रपटात पाहुणे कलाकाराची भूमिका

रणबीरचे आजोबा म्हणजे शमी कपूर यांनी चित्रपटात बासरी वादकाची भूमिका साकारली आहे. शमी कपूर हे हिंदी सिनेमा श्रुष्टीतील मोठे नाव आहे. चित्रपटात त्यांची भूमिका लहान असली तरी महत्वाची आहे.

१०) ऋषी कपूरला चित्रपटाचे एकही गीत आवडले नव्हते

काश्मीरमध्ये शूटिंग चालू असताना संगीतकार रेहमानने सेटवरील सदस्यांची फिल्मच्या संगीताबद्दल प्रतिक्रिया विचारली. सर्वानी गाणी आवडल्याचे सांगितले मात्र इम्तियाझने ऋषी कपूर यांना एकही गाणं पसंतीस आला नसल्याचे सांगितले. रेहमाननें ही प्रतिक्रिया गंभीरतेने घेऊन नादान परिंदे घर आजा हे गाणं बनवलं

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.