MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

२१ वर्षांनी भारताकडे मिस युनिव्हर्स आणणारी हरनाझ कौर संधू कोण आहे?

Harnaz Kaur

२०२१ च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या ‘हरनाझ कौर संधू’ हिने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. हरनाझ कौर संधू सत्तरावी मिस युनिव्हर्स निवडली आहे. २१ वर्षानंतर मिस युनिव्हर्सचा किताब भारताला मिळाला आहे. या आधी २००० मध्ये लारा दत्ताने मिस युनिव्हर्स जिंकले होते.

भारताने आतापर्यंत तीन वेळा मिस युनिव्हर्स जिंकले.

सत्तरावी मिस युनिव्हर्सची स्पर्धा इस्राईलच्या ‘इलियट’ शहरात आयोजित केली होती. या स्पेर्धेत भाग घेण्यासाठी जगभरातून स्पर्धक आल्या होत्या. हरनाझ कौर सिंधूने भारताकडून २०२१ च्या स्पर्धेत मिस युनिव्हर्स पदक जिंकले. हरनाझ कौर संधू तिसरी भारतीय आहे जिने हा पुरस्कार जिंकला आहे.

हरनाझ कौर संधूच्या आधी २००० ला लारा दत्ताने मिस युनिव्हर्स जिंकले होते.

त्या आधी १९९४ च्या स्पर्धेत सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब जिंकलेला आहे.

या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर मिस पॅराग्वे तर तिसऱ्या क्रमांकावर मिस आफ्रिका आहे

कोण आहे मिस युनिव्हर्स २०२१ हरनाझ संधू ?

हरनाझ संधू चंदीगडची आहे. २०१७ चा मिस चंदीगड हा किताब तिने जिंकला आहे. २०१८ मध्ये हरनाझ संधूने मिस मैक्स इमर्ज‍िंग स्टार इंड‍िया २०१८ हा किताब जिंकला तर २०१९ च्या मिस इंडिया स्पर्धेत संधू पहिल्या बारा स्पर्धकांमध्ये होती.

हरनाज संधूने केले आहे चित्रपटांमध्ये देखील काम

मिस युनिव्हर्स होण्याअगोदरच हरनाझ संधूने दोन पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. Bai Ji Kuttange’ आणि  ‘Yaara Diyan Poo Baran हे दोन चित्रपट प्रदर्शित होणे बाकी आहे .

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.