MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

हिटलरने स्वतःला गोळी मारण्याअगोदर लग्न केले होते. (Adolf Hitler and Eva Braun)

पहिल्या महायुद्धात जर्मनीचा दारुण पराभव झाला. जिंकलेल्या मित्र राष्ट्रांनी जर्मनीवर अपमानकारक अटी लावून जर्मनीला अपमानित केले. पहिल्या महायुद्धानंतर एडॉल्फ हिटलर जर्मनीच्या राजकारणात आला. महायुद्धात जर्मनीचा पराभव ‘ज्यू’ लोकांमुळे झाला असल्याचा प्रचार हिटलरने करायला सुरुवात केली आणि हिटलर जर्मनी मध्ये प्रचंड प्रसिद्ध झाला. पहिल्या महायुद्धात जर्मनी हरल्याचा बदल घेण्यासाठी मला निवडून द्या म्हणून हिटलरने प्रचार केला. १९२४ मध्ये हिटलरने त्याचा नाझी पक्ष जर्मनीच्या सत्तेत आणला. निवडणुकीच्या माध्यमांतून सत्तेत आलेल्या एडॉल्फ हिटलरने स्वतःला हुकूमशहा घोषित केले आणि जगावर दुसरे महायुद्ध लादले. हुकूमशहा एडॉल्फ हिटलरचा शेवट मात्र वाईट झाला. त्याला स्वतःवर गोळी झाडून संपवावे लागले. त्याच्यावर ही वेळ का आली?

दुसरे महायुद्ध

१९३९ ला जर्मनीने पोलंडवर हल्ला करून दुसरे महायुद्ध सुरु केले. जर्मनीच्या बाजूने इटली आणि जपान होते तर त्यांच्या विरोधात मित्र राष्ट्रे उभे टाकले होते. महायुद्धाच्या सुरुवातीला जर्मनीची नाझी सेना प्रचंड गतीने मित्र राष्ट्रांना जिंकत होती. पोलंड, नेदरलँड आणि रशियाचा पश्चिम भाग हिटलरच्या नाझी सेनेने जिंकला होता. युरोपमध्ये जर्मनी आणि इटली दोघांची जोडी मित्र राष्ट्रांना टक्कर देत होती तर युरोपच्या बाहेर जपान त्यांची बाजू सांभाळत होते.

जर्मनीने रशियावर आक्रमण केले होते. ‘मॉस्को’च्या सीमेवर नाझी सेना पोहचली होती. रशिया जर्मनीने जिंकल्यात जमा होते. जपानच्या पर्ल बंदराच्या हल्यानंतर मात्र चित्र पालटले. अमेरिका पण युद्धात ओढली गेली. अमेरिकेच्या प्रवेशानंतर मित्र राष्ट्रे मजबूत झाले होते. ‘स्टॅलिनच्या’ रशियाने जर्मनीवर उलट आक्रमण करायला सुरुवात केली, इथेच जर्मनी आणि हिट्लरचा अंत सुरु झाला.

बर्लिन पडले

हिटलरची नाझी सेना जग जिंकायला निघाली होती पण रशियाने घेतलेल्या आघाडी मुळे जर्मनीला माघार घ्यावी लागत होती. रशियन सैन्याने ‘मॉस्को’ पासून नाझी सेनेला जिंकण्यास सुरुवात केली होती.
रशियन सैन्याने नाझी सेनेपासून पोलंड, नेदरलँडची सुटका केली होती. १९४५ च्या मार्चमध्ये रशियन सैन्य बर्लिनच्या जवळ आले होते. मे १९४५ पर्यंत आता स्पष्ट झालं होत की जर्मनी हारत आहे. रशियन सैन्य फक्त बर्लिनमध्ये येण्याचं बाकी होत. हिटलर बर्लिनमध्ये त्याची प्रियसी ‘इवा ब्राउन’ सोबत महालाच्या बंकरमध्ये लपला होता.

हिटलरचा शेवटचा दिवस

महायुद्ध सुरु होण्याअगोदरच एडॉल्फ हिटलरने सर्वाना सांगितले होते कि आपण जर युद्ध हरलो तर दुष्मन सेनेच्या हाती लागण्याअगोदर स्वतःला मारून टाका. बर्लिन पाडण्यासाठी थोडाच वेळ होता. रशियन सैन्य बर्लिनवर चढाई करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे आता पुढे काय होणार हे बंकर मध्ये असलेल्या सर्व लोकांना अंदाज होता. आता कुठून मदत येणार नाही याचा अंदाज आल्यावर हिटलरने स्वतःला संपून घेणार असल्याचे जाहीर केलं. हिटलरची प्रियसी ‘इवा ब्राउन’ ने हिटलर सोबत राहण्याचा निर्णय घेतला. हिटलर आणि इवाचे लग्न झाले नसल्याने हिटलरने शेवटच्या दिवशी बंकर मधेच लग्न केले.

लग्न झाल्यावर हिटलरने त्याच्या सैन्य अधिकाऱ्यांना बोलावून घेतले सर्वाना हात मिळवत हिटलर म्हणत होता, ‘सर्वानी आपल्याला धोका दिला आहे, आपला शेवट आला आहे.’ अधिकाऱ्यांना विष आणायला सांगून त्याचे परीक्षण करायला सांगितले. त्याची आवडती कुत्री ‘ब्लॉन्डी’ वर विष परीक्षण करायचे आदेश सैन्याला दिले. विष परीक्षण यशस्वी झाले होते ‘ब्लॉन्डी’ मरण पावली होती. त्यानंतर हिटलर आणि इवा दोघे विष घेऊन त्यांच्या खोलीत गेले आणि सर्वाना जाण्यास सांगितले. सर्व अधिकारी गेल्यावर हिटलरने स्वतःला आणि प्रियासी इवा ब्राउनला गोळी घालून संपवले.

जग जिंकण्यासाठी एडॉल्फ हिटलर त्याच्याच जर्मनीतील ज्यू लोकांचे बळी घेतले, जगावर युद्ध लादले मात्र त्याचा शेवट दयनीय झाला.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.