आपले गुरु चंदन कांबळे यांना भेटण्यासाठी घरातून पळून यावे लागले. पुण्यात कात्रजच्या एका हॉटेलात काम केले पण साजन बेंद्रे गायक झालाच. साजन बेंद्रेच गाणं आहे म्हंटल्यावर ते गाजतच.
लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमधून जी कला येते ती लोक कला असते. लोक कला पूर्णपणे लोकांची असते तिथे नसते कुठलेही कलेचे व्याकरण. नसते कुठलेही बंधन. नसतो कुणाचा ही भेदभाव. लोक कला सगळ्यांना सामावून घेते. त्यामुळेच ती सर्वांना आवडते पण फॅशन अँड स्टँडर्डच्या नावाखाली लोककलेला कमी लेखण्याचा प्रकार चालू झाला होता. कलेचा धंदा करणारे जाणून बुजून हे करत. यामुळे लोक कला मागे पडली. लोक कला म्हणजे अडाणी लोकांची कला आहे असा शिक्का तिच्या वर लावला गेला. तरीही एकसे बढकर एक कलाकारांनी लोककलेला ख्याती मिळवून दिली. लोककलेला लोकगीतांच्या माध्यमातून जिवंत केले. साजन बेंद्रे हा त्यातीलच एक पठ्या.
गुरु शिवाय कला नाही हे समजल्यावर घरातून पळून आले.
घरी गरिबी असल्यावर कला जोपासणे मोठे कठीण काम असते. कारण कलेतून काय आपले पोट भरणार नाही आणि शोक म्हणून आपल्याला ते जोपासणे जमणार नाही. म्हणून गरीब लोक कलेच्या नादी लागत नाहीत. साजन बेंद्रे यांच्या घरी देखील गरिबीचं होती. पण साजन लहान असल्यापासून गाणे म्हणत. पण त्यांच्या कलेला साद देईल असा गुरु त्यांच्या कडे नव्हता. गुरु शिवाय कला उमलत नाही. आपल्याला जर चांगला गायक बनायचे असेल तर गुरु शोधण्याशिवाय पर्याय नाही हे बेंद्रे यांच्या लक्षात आले. बऱ्याच वेळेच्या शोधानंतर त्यांच्या लक्षात आले प्रसिद्ध गायक चंदन कांबळे आपले गुरु होऊ शकतात. आपण त्यांना ‘मला शिकवता का’ म्हणून विचारू शकतो. साजन बेंद्रेने ठरवले कि आपण चंदन कांबळे यांचे शिष्य बनायचे. मग सुरु झाला एकलव्यासारखा प्रवास. चंदन कांबळे यांना भेटण्याची इच्छा होती पण भेटणार कसे? चंदन कांबळे यांच्याशी ना साजन यांची ओळख होती, ना कोणी असा माणूस होता जो त्यांची भेट घालून देईल. खूप वेळ गेल्यावर साजन यांच्या लक्षात आले चंदन कांबळे यांना भेटायचे असेल तर आपल्याला पुण्यात जावे लागेल. एक दिवशी सकाळी गरजेचे सामान घेतले आणि गडी पुण्याला निघाला. ना पुण्यात कोणाची ओळख, ना हक्काच ठिकाण तरी फक्त चंदन कांबळे याना भेटण्याची इच्छा साजन बेंद्रेंना पुण्यात घेऊन आली. पुण्यात साजन कात्रजला उतरले बालाजी नगरच्या छगन केटर्स मध्ये त्यांना काम मिळाले. पुण्यात राहायची आणि कामाची सोय झाली होती पण साजन यांना शोध होता चंदन कांबळे यांचा. त्यासाठीच ते पुण्यात आले होते. एक दोन महिन्याच्या शोधानंतर साजन बेंद्रेंना चंदन कांबळे यांचा पत्ता भेटला. साजन बेंद्रेंनी चंदन कांबळे यांना आपली कथा सांगितली. कांबळेंनी साजन यांचा गुरु होण्याचे स्वीकारले. आपल्या स्वतःच्या घरी साजन यांना ठेऊन घेतले. स्वतःच्या मुलासारखे वाढवले, संगीताची तालीम दिली. तेंव्हापासूनचे त्यांचे गुरु शिष्याचे नाते आजतागायत कायम आहे.
दर वर्षी नवीन गाणे आणून सगळ्यांना ताल धरायला लावतो.
गणपती बाप्पाचं आगमन झालं म्हणजे बाप्पांचं स्वागत करण्यासाठी साजन बेंद्रेच नवीन गाणं येणार असं समीकरणच झालं आहे. एकदा का गाणं आलं कि ते गाणं सगळ्या गणेश मंडळांमध्ये वाजतं. “बोल मे हलगी बजाऊ क्या”..लक्षात आहे ना ? विसरणार कसे आपण सगळेच एकदा तरी ह्या गाण्यावर नाचलो आहोत. साजन बेंद्रेच मला ‘आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाणं ऐकून कित्येकांनी निवडणूक न लढत आमदार होण्याचा फील घेतला आहे. प्रत्येकाला वाटते आपण एक दिवस आमदार खासदार होऊ त्या सगळ्या भावी आमदारांना लक्षात ठेवून बेंद्रेंनी हे गाणं लिहिलं आणि महाराष्ट्रानं ह्या गाण्याला डोक्यावर घेतलं. ढोलकीच्या तालावर लोक नाचतात. जर लोक ढोलकीच्या तालावर नाचत असतील तर आपण त्यांना आपल्या हलगीच्या तालावर नाचायला भाग पाडू असू साजन बेंद्रे याना वाटलं आणि जन्म घेतला ‘बोल में हलगी बजावू क्या’ (sajan bendre halgi bajau kya). ह्या गाण्यानं हलगीला तिची हरवलेली ओळख दिली. मराठवाड्यातली येडादेवी वर साजन यांची श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी येडा देवीच्या जत्रेत साजन यांचं नवीन गाणं येतच. डोळा लागला माझ्या येडुला हे त्यांचं सुपरहिट गाणं आहे.
लोकगीतांना साजन यांनी नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या लोककलेला गरीब लोकांची कला म्हणून बघितले जायचे त्या कलेला साजन बेंद्रे सारख्या कलावंतांनी प्रतिष्टीत लोकांमध्ये जागा मिळवून दिली आहे. टीव्ही वरच्या प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये साजन यांचे गाणे वाजतात. साजन बेंद्रे यांनी खऱ्या अर्थाने सर्व कलाकारांच्या कामावर कळस चढवला आहे.
हे खास आपल्यासाठी
बळीराजा आणि त्याचा इतिहास थोडक्यात
जगातल्या सगळ्या महान गोष्टीपेक्षा काशी श्रेष्ठ वाटते असं अमेरिकन लेखक म्हणतॊ.
लावणी – न सुकणारा मोगऱ्याचा गजरा