MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

सरकार म्हणत असेल गेली एकदाची कटकट, ‘एअर इंडिया’ टाटांची झाली.

एअर इंडिया टाटाची कंपनीची झाल्यामुळे विमानाची उडान भरतानाची सूचना बदलणार आहे. एअर इंडिया मधून प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना,

'हॅलो,. हॅलो धिस इस युअर कॅप्टन स्पिकिंग , वेलकम तो टाटा एअर लाईन्स.' हि सूचना ऐकायला मिळणार आहे.

कधी कधी आपण हौसेने काही वस्तू विकत घेतो. पण नंतर कळत आपण येडे पणा केला आहे. आपल्याला त्या वस्तूचा मेंटेनन्स देखील परवडत नाही. मग आपण ती वस्तू विकायला काढतो आणि आपलं नशीब कोणी ग्राहक पण भेटत नाही. तसंच काहीस एअर इंडिया सरकारी कंपणीच्या बाबतीत झालं होत. त्यामुळेच दोन तीन वर्षांपासून सरकार ‘कोणी एअर इंडिया घेता का एअर इंडिया’ म्हणून जाहिरात करत होत. शेवटी टाटांनी एअर इंडियाला बोली लावली. टाटांच्या टाटा सन्स कंपनीने एअर इंडिया विकत घेतली आणि काल २७ जानेवारीला भारत सरकारकडून एअर इंडिया टाटा सन्सने अधिकृत सामावून घेतली.

एअर इंडिया होती कोणाची ?

तर हि गोस्ट आहे १९३२ ची टाटा ग्रुपचे अध्यक्ष जे आर डी टाटांनी खासगी टाटा एअर लाईन्स सुरु केली. भारत आणि जगभरात प्रवास करण्यासाठी टाटा एअर लाईन्स सेवा द्यायची. १९४७ ला देश स्वतंत्र झाला. संमिश्र पद्धतीने अर्थव्यवस्था चालवण्याचे ठरले. त्यामुळे महत्वाचे व्यवसाय सरकारी मालमत्तेचे असायला हवेत हे ठरले होते. त्यात बँक , दळण वळणाचे साधने इत्यादी. ठरल्याप्रमाणे भारत सरकारने काही बँक आणि एअर लाईन्सचे राष्ट्रीयकरण केले. त्यामुळे टाटा एरलाईन्स भारत सरकारची झाली. १९४७ ते २०२१ असे ६९ वर्ष एअर इंडिया भारत सरकार कडे राहिली.

एअर इंडिया तोट्यात कशी गेली ?

आता सरकारी कंपन्या का तोट्यात जातात ह्या बद्दल सांगायला नको. ढिसाळ सरकारी कारभार , भविष्याचे कसलेही नियोजन नसणे , सरकारी बाबूंच्या हाती सर्व अधिकार देणे आणि सरकार म्हणून नेत्यांची काम न करण्याची मानसिकता. असे किती तरी कारणे देता येतील सरकारी कंपन्या बुडण्याची. एअर इंडियाच्या बाबतीत पण असेच झालेय. जो पर्यत बाजारात एअर इंडिया एकच कंपनी होती तो पर्यत सर्व मस्त सुरु होत. पण १९९१ ला भारत सरकारने अर्थव्यवस्था खासगी प्लेयर्सना मोकळी केली. त्यामुळे साहजिकच स्पर्धा वाढली. आता स्पर्धा वाढली कि गुणवत्ता वाढवावी लागते. पण एअर इंडिया मध्ये कसलीही सुधारणा झाली नाही. खासगी कंपन्या मात्र कमी पैश्यात चांगली सेवा देत होत्या . याचा परिणाम असा झाला कि लोक खासगी कंपन्यांची सेवा घेत होते. इंधनाचे पैसे निघतील एवढा पण धंधा करणे पण एअर इंडियाला अवघड झाले होते. एअर इंडियाचा १९९१ ला सुरु झालेला उलट प्रवास २०१८ येईपर्यँत खूपच वाईट स्थितीवर पोहचला होता. एअर इंडिया चालू ठेवण्यासाठी सरकारला टॅक्सच्या पैस्यातुन दर दिवशी २० कोटी खर्चावे लागत होते. त्यामुळे एअर इंडिया विकण्याशिवाय सरकार कडे पर्याय उरला नव्हता.

तोट्यातली कंपनी टाटांनी का विकत घेतली ?

कोणताही व्यापारी तोट्यात असलेली कंपनी विकत घेणार नाही. पण टाटांनी घेतली त्याला दोन तीन करणे आहेत. पहीले कारण तर हेच आहे कि एअर इंडिया हि मूळची टाटा कंपनीचीच ‘जे आर डी टाटांनी’ मोठ्या मेहनीतीने उभारली होती. त्यामुळे जर आपली जुनी कंपनी आपल्याला विकत घेता येऊ शकत असेल तर कोण घेणार नाही? दुसरं महत्वाचं कारण १५० वर्षांपासून टाटा कंपनी चालू आहे. त्यामुळे कंपनीकडे एअर इंडिया चालवणायसाठी योग्य तेवढा अनुभव आणि संसाधने आहेत. तिसरं कारण म्हणजे इंडिया इंडिया घेण्यासाठी ताटाला जास्त पैसे मोजावे लागणार नव्हते. याच कारण होत एअर इंडिया वर १५ हजार कोटीच असलेले कर्ज. कर्ज सोडून राहिलेले पैसे सरकारला द्यायचे होते आणि उरलेले कर्ज टप्याटप्याने भरण्याचे मुभा होती. त्यामुळे टाटांनी केवळ २७०० कोटी मध्ये एअर इंडिया विकत घेतली आणि बाकी १५००० कोटी टाटा कंपनी टप्या टप्याने भरणार आहे. साहजिक एवढे सगळे कारण असल्यामुळे टाटांनी एअर इंडिया घेतली. सर्व प्रक्रिया पूर्ण करून भारत सरकारने टाटा सन्स कडे एअर इंडिया सोपवली आहे. ६९ वर्षानंतर एअर इंडिया तिच्या जुन्या घरी गेली आहे.

एअर इंडिया टाटाची कंपनीची झाल्यामुळे विमानाची उडान भरतानाची सूचना बदलणार आहे. एअर इंडिया मधून प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना,

‘हॅलो,. हॅलो धिस इस युअर कॅप्टन तो टाटा एअर लाईन्स.’ हि सूचना ऐकायला मिळणार आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.