MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

रघुनाथ कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांच्यावर पीडितेचा गंभीर आरोप

मागच्या काही दिवसापासून रघुनाथ कुचिक अत्याचार प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे. या प्रकरणाला पुढे आणण्याचे काम भाजपच्या महिला नेत्या चित्र वाघ यांनी केलं. पीडितेला न्याय मिळून देण्यासाठी त्या लढत असल्याचं त्या सांगत होत्या. पण आज मराठी वाहिनी साम टीव्हीवर येऊन पीडित मुलीने भाजप नेत्या चित्र वाघ यांच्या गंभीर आरोप केले आहेत. रघुनाथ कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांचाच मोठा रोल असल्याचं पीडित मुलीने सांगितलं आहे. रघुनाथ कुचिक प्रकरण नेमकं काय आहे, चित्रा वाघ यांचा प्रकरणात काय रोल आहे आणि पीडित मुलीने त्यांच्यावर काय आरोप केले आहेत याचा आढावा आपण घेऊ.

रघुनाथ कुचिक प्रकरण काय आहे ?

रघुनाथ कुचिक हे शिवसेनेचे सभासद आणि पदाधिकारी आहेत. रघुनाथ यांच्या ओळखीच्या एक मुलीने त्यांच्यावर लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केल्याचा रोप केला होता. रघुनाथ यांच्यापासून आपल्याला मूल होणार होते असा आरोप तिने केला होता. हे प्रकरणात प्रकाशझोतात आल्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित मुलीला न्याय देण्यासारखा तिला मदत देऊ केली. पीडित मुलींसाठी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषेद सुद्धा घेतली आहे. तेंव्हापसूनच या प्रकरणाशी चित्रा वाघ यांचे नाव जोडले गेले आहे. रघुनाथ कुचिक यांच्या अटकेची मागणी चित्रा वाघ यांनी केली होती.

पीडितेने चित्रा वाघ यांच्यावर काय आरोप केले आहेत ?

आज १२ एप्रिलला रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडित मुलीने साम टीव्हीवर धक्कादायक खुलासे केले आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार रघुनाथ कुचिक यांनी तिच्या लग्नाचे अमिश दाखवून अत्याचार केले होते. पण ह्या सर्व प्रकरणाला मोठे केले चित्रा वाघ यांनी. चित्रा वाघ यांनीच मला रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात तक्रार करायला भाग पाडले. मी ज्या वेळेस तक्रार करण्यास असमर्थता दर्शवली तेंव्हा त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. चित्रा वाघ यांचे माणसे माझ्या कॉल बघत होते. मी कोणाला बोलते , कोणाला कॉल करते यांच्या बद्दल त्यांना माहित असायचे. मागच्या आठवड्यात चित्रा वाघ यांच्या माणसांनी मला गोव्याला नेले. माझी इच्छा नसताना देखील त्यांनी मला गोव्यात ठेवले. परत महाराष्ट्रात आल्यावर चित्रा वाघ यांच्या आदेशानेच केस पुढे गेली. मला माहित नाही चित्रा वाघ यांचे माझ्या केस मध्ये काय फायदा आहे पण त्यांनी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. मी जर याचा खुलासा केला तर मला जीवे मारण्याची धमकी त्यांनी आधीच दिली आहे त्यामुळे मला संरक्षण मिळाले पाहिजे तशी राज्यसरकारकडे मागणी करत आहे.

चित्रा वाघ यांनी ह्या सर्व आरोपांना काय उत्तर दिले ?

साम टीव्हीवर बोलताना चित्र वाघ यांनी पीडित मुलीचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. पीडित मुलीला न्याय मिळवा यासाठी मी प्रयत्न केले आहेत. या प्रकरणात माझंही काहीही स्वार्थ नसल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे. पुढे चित्रा वाघ म्हणाल्या मला तर हा रघुनाथ कुचिक कोण आहे याची माहिती देखील नव्हती पण मुलीवर अत्याचार झाल्यामुळे मला या प्रकरणाकडे लक्ष द्यावे लागले. मला माहिती नाही पीडित मुलगी माझ्यावर असे आरोप का करत आहे पण ह्या सर्व आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. पोलिसांना चौकशी करायची असल्यास मी पोलिसांना सर्व मदत करायला तयार आहे. पीडित मुलीने केलेल्या आरोपांमुळे दुसऱ्या पीडित मुलांना मदत करायला कोणी पुढे येणार नाही. याची तिने काळजी घयायला हवी होती असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या.

राष्ट्रवादीकडून चित्रा वाघ यांच्यावर टीका होत आहे

चित्रा वाघ आधी राष्ट्रवादी पक्षामध्ये होत्या पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या आधी त्या भाजप मध्ये गेल्या. राष्ट्रवादी आणि चित्रा वाघ यांच्यात नेहमीच वादावादी होत असते. आज देखील राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी चित्र वाघ यांच्यावर टीका करताना म्हणाल्या कि चित्रा वाघ यांनी पीडित मुलीचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी केला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख यांनी देखील चित्रा वाघ यांच्या वर टीका केली आहे. त्यांचे ट्विट सध्या वायरल होत आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.