निर्मला सीतारामन यांनी ३९.२५ लाख कोटी रुपयाचा २०२२- २३ वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडताना त्यांनी वेगवेगळ्या योजना आणि पॅकेज जाहीर केले. पण सगळयात जास्त चर्चा होणार आहे ती डिजिटल रुपयाची. कारणंच तसं आहे. डिजिटल रुपया बिटकॉइनला टक्कर देण्यासाठी आणला आहे अशी मार्केट मध्ये चर्चा आहे.
बिटकॉइनची काय भानगड आहे ?
२००९ ला जपानच्या सतोषी नाकामोटो नावाच्या माणसाने बिटकॉइनची सुरुवात केली. त्याच असं म्हणणं होत कि ‘सध्या जी चलने आहेत त्यांना सरकारे नियंत्रित करतात. चलनावर असलेली सरकारांची नियंत्रणे बाजार नियंत्रित करतात ते थांबायला हवेत’. सरकारी नियंत्रण थांबवण्यासाठी नाकामोटोने २००९ ला ब्लॉकचेन टेकनॉलॉजिच्या साहाय्याने बिटकॉइन चालू केले. ब्लॉक चेन टेकनॉलॉजिच्या माध्यमातून चालणाऱ्या बिटकॉइन वर कोणाचेही नियंत्रण राहू शकणार नाही. सतोषी नाकामोटो पण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. सध्या बिटकॉइन मार्केट मध्ये त्याच्या ऑरगॅनिक पद्धतीने वाढते आणि कमी होते. २००९ ला सुरु झालेलं बिटकॉइन दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढल आहे. भारतीय लोकांनी पण बिटकॉइन मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
सरकार का घेऊन येत आहे डिजिटल रुपया?
अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी डिजिटल रुपया कसा असणार आहे या बद्दल काही भाष्य केलं नाही. पण बिटकॉइन भारतात बॅन करण्याच्या बातम्या आल्या होत्या. डिसेंबर महिन्यात सरकारने बिटकॉइनला कसे नियंत्रित करता येईल यासाठी एक समिती पण बनवली आहे. सरकारच्या सर्व हालचाली जर आपण बघितल्या तर आपल्या सहज लक्षात येईल कि सरकार बिटकॉईनला स्पर्धा देण्यासाठीच डिजिटल कॉइन घेऊन येत आहे.
डिजिटल रुपया लोक स्वीकारतील का ?
ब्लॉकचेन टेकनॉलॉजिवरच आरबीआयचा डिजिटल रुपया काम करणार आहे. पण डिजिटल रुपयावर सरकार म्हणून आरबीआयचे नियंत्रण असणार आहे. बिटकॉइन लोक घेत होते कारण ह्या चलनावर कोणाचे ही नियंत्रण नव्हते. त्यामळे बाजार ज्या दिशेला जाईल त्या प्रमाणात बिटकॉइनची किंमत वाढते किंवा कमी होते. पण डिजिटल रुपयाच्या बाबतीत तसे होण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण डिजिटल रुपयाची किंमत आरबीआय फार कमी किंवा जास्त होऊ देणार नाही. तसे झाले तर भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे ज्या पद्धतीने सध्या चलन चालू आहे तसेच चालणार त्यात फार बदल होणार नाही. जर फक्त फॉर्म बदलून रुपयाचं वापरावा लागणार असेल तर ग्राहक बिटकॉइन आणि इतर चलने सोडून डिजिटल रुपया का वापरतील. त्यामुळे डिजिटल रुपया बाजारात चालण्याची शक्यता फार कमीच आहे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !