डॉ बाबासाहेबांना जाऊन आज ६५ वर्ष होत आहेत. ६ डिसेंबर १९५६ ला मुंबई मध्ये बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं. भारताचे संविधान बाबासाहेबांनी लिहलंय. ७५ वर्षांपासून भारत बाबासाहेबांच्या संविधानानुसार आपली वाटचाल करत आहे. मागच्या ७५ वर्षांमध्ये संविधानावर अनेक हल्ले झाले. वेगवेगळ्या टीका झाल्या. परंतु आजही आपला भारत संविधानावर चालतो आहे. १९ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात बाबासाहेबानी भारतीय संविधान आणि राज्यकर्त्यांवर भाष्य केलं आहे ते आज समजून घ्यायला हवं. ७० वर्षांनंतर देखील बाबासाहेब किती अचूक आणि महत्वाचे होते याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
संविधानाचे भविष्य जे लोक सत्तेत आहे त्यांच्यावर अवलंबून आहे.
जगातले कोणतेही संविधान तेंव्हाच चांगले सिद्ध होईल ज्या वेळेस संविधान चालवणारे लोक चांगले असतील आणि जर संविधान कितीही चांगले असले आणि चालवणारे शासनकर्ते जर लायक नसतील तर मात्र ते संविधान वाईट सिद्ध होईल. संविधान फक्त शासन करण्यासाठी सरकारला मार्गदर्शकाची भूमिका निभावते परंतु जर संविधानाला चावलणारे सत्ताधारी आणि लोक जर संविधानाला मानत नसतील, त्याचे पालन करत नसतील तर मात्र संविधान व्यवस्थित काम करू शकणार नाही.
जात, धर्म, पंथ देशाच्या वर नको.
भारतातले लोक नेहमीच जात धर्माच्या नावाने वेगळे राहतात, एकमेकांविरोधात लढतात. भारतीय लोकांमध्ये एकी नसल्यमुळेच भारत गुलामगिरी मध्ये ढकला गेला. इंग्रजांनी १५० वर्ष भारतावर राज्य केले. हा इतिहास परत तर होणार नाही ना याची मला भीती वाटते ? भारत जाती, धर्मापासून अजून स्वतंत्र झाला नाही. आपण जर धर्म, जातीच्या पुढे नाही आलो तर भारत परत पारतंत्र्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हजारो वर्षाच्या गुलामगिरी मधून भारत आता मोकळा, स्वतंत्र श्वास घेत आहे. भारताला स्वतंत्र ठेवण्यासाठी सर्वाना सजग राहायला हवे. आपापल्या जाती धर्मापेक्षा देश महत्वाचा आहे. भारतीयांनी देशाला प्रथम स्थान दिले पाहिजे तरच आपण आपले स्वतंत्र अबाधित राखू.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेशिवाय भारत उभा राहू शकणार नाही.
कोणत्याही देशाची लोकशाही सामाजिक लोकशाही शिवाय टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय तर देशामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांच्या स्वातंत्र्य आणि समतेची काळजी घेणं. सर्वाना सामान विकासाच्या संधी उपलब्ध करून देणं होय. लोकशाही देशामध्ये स्वतंत्र, समता आणि बंधुता एकाच वेळेस नांदायला हवी.
समतेशिवाय जर स्वातंत्र्य मिळेल तर समाजामध्ये एक विशिष्ट्य वर्ग बाकीच्या लोकांच्या पुढे जाईल आणि एक वर्ग ज्यांना संधी मिळाली नाही ते प्रगती करू शकणार नाहीत. बंधुतेशिवाय पण जर स्वातंत्र्य मिळाले तर ज्या लोकांना समाज मान्यता देत नाही ते लोक प्रगती करू शकणार नाहीत. लोकशाही देशाला प्रगती करण्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना बरोबरी ने राबवणे गरजेचे आहे.
(हा भाषणाचा सारांश आहे )
हे खास आपल्यासाठी
बळीराजा आणि त्याचा इतिहास थोडक्यात
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
आपल्या प्रत्येकाला सिंधू संस्कृतीबद्दल काय माहिती आहे?