MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

२०१४ साली गोपीनाथ मुंडेंनी वर्तवलेलं भविष्य खरं ठरलंय ..

राजकीय जाणकार आपल्याला प्रत्येक कोपऱ्यावर मिळतील. जगातल्या कोणत्या देशात कोणाचं सरकार येईल , कोणत्या नेत्याचं काय चुकलं ह्या बद्दल त्या नेत्या पेक्षा ह्यांना जास्त कळत असल्या सारखं ते बोलत असतात. पण खरं सांगायचं झालं तर प्रत्येक क्षेत्रातले काही जाणकार असतात. त्या क्षेत्रात काम करणारे लोकच फक्त त्या क्षेत्राबद्दल व्यवस्थित सांगू शकतात आपण त्यावरच विश्वास ठेवला पाहिजे. २०१४ साली भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षा बद्दल भाष्य केलं होत. ते आज सात वर्षानंतर खरं होताना दिसत आहे.

दिल्लीत सरकार बनवल्यावर सगळ्या देशभर आपची चर्चा होत होती.

अण्णा आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या आम आदमी पक्षाची २०१२ साली स्थापना केली. पक्ष स्थापनेच्या एक वर्षातच त्यांनी दिल्लीत सर्वात जास्त २८ जागा जिंकत सरकार बनवलं. साहजिकच एक वर्ष आधी सुरु झालेली पार्टी जर सरकार बनवत असेल तर तर त्याची देशभर चर्चा होणार. आम आदमी पक्षच्या भविष्य काय असेल ह्यावर चर्चा होत असे. अनेक जाणकार अरविंद केजरीवाल फार काळ राजकारणात टिकाव धरू शकणार नाहीत असे भाष्य करायचे. पण गोपीनाथ मुंडे यांनी आम आदमी पक्षा बद्दल एकदम बरोबर मत व्यक्त केलं होत. मुंडेंच्या वक्तव्याचा प्रत्यय २०२२ साली येत आहे.

आम्हाला नाही काँग्रेसला विचार करायची गरज आहे.

आयबीयन लोकमतचे त्यावेळचे संपादक निखिल वागळे यांनी गोपीनाथ मुंडे यांची मुलाखत घेतली होती. वागळे यांनी त्यांना राज्य आणि देशातल्या राजकारणावर मुंडेंना प्रश्न विचारले होते. नवीनच स्थापन झालेल्या आम आदमी पक्ष बद्दल तुम्हाला काय वाटतं असा सरळ प्रश्न जेंव्हा वागळेनी केल्यावर मुंडे म्हणाले होते , कि आम आदमी पक्षाला अण्णा हजारेंची पुण्याई आहे. दिल्लीत खुप काळ अण्णा आंदोलन राहिल्यामुळे त्यांच्या साठी दिल्लीत राजकारण कारण सोपं गेलं. पण खरं तर हा काँग्रेस सरकारचावरचा राग लोकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच लोकांनी त्यांना मतदान केलं. पण आमचं भाजपचं देखील मतदान वाढलं आहे. ह्यावरून हे सिद्ध होत कि आम आदमी पक्ष आमचं मत घेत नसून काँग्रेस पक्षाचं घेत आहे. भविष्यात पण आम आदमी पक्ष काँग्रेसचे मत घेईल त्यामुळे त्यांनी विचार करण्याची गरज आहे. आम्हाला आम आदमी पक्षाचा काहीही धोका नाही.

पंजाब निवडणुक निकालातून काँग्रेसचा धोका स्पष्ट दिसत आहे.

पंजाब राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात मुख्य लढत होती. एकूण ११७ पैकी ९२ जागा जिंकत आम आदमी पक्षाने काँग्रेसला मात दिली आहे. पंजाबच्या निकालावरून एक स्पस्ट झाले आहे कि आम आदमी पक्षाने पंजाबमधून काँग्रेसला संपवले आहे.
राजकीय विषययावर भाष्य करणारे जाणकार सांगत आहेत कि पंजाब तर फक्त सुरुवात आहे. येत्या काळात इतर राज्यामध्ये देखील आम आदमी पक्ष काँग्रेसची जागा घेईल. आम आदमी पक्षाला कसे रोखता येईल याचा विचार काँग्रेसने करणे गरजेचं असल्याचं मत अनेक जण व्यक्त करत आहेत. आम आदमी पक्ष काँग्रेसची जागा घेईल असे गोपीनाथ मुंडे २०१४ साली म्हणाले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी गोपीनाथ मुंडेंची ८ वर्षा पूर्वीची मुलाखत बघितलं तर त्यांना त्याचा फायदा होईल.

३४ व्या मिनिटांपासून गोपीनाथ मुंडेंनी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर भाष्य केले आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.