मागच्या दोन आठवड्यात पाकिस्तानात जोरात राजकीय हालचाली झाल्या. इम्रान खानवर अविश्वास ठराव आणला गेला. अतिशय अटीतटीच्या प्रसंगात इम्रान खानला पायउतार व्हावे लागले. इम्रान खानची जागा नवाज शरीफचा लहान भाऊ शेहबाज शरीफ यांनी घेतली. इम्रान खान त्यांची बाजू मांडत असताना सत्ता होती तेव्हा त्याने भारताचे कौतुक केले होते. पाकिस्तानात राहून भारताचे कौतुक करतोय म्हणून एका महिला खासदाराने त्याला टोमणा मारला कि एवढा भारत आवडतो तर पाकिस्तान सोडून भारतात राहायला जा ! इम्रानने यावर काही उत्तर दिलं नाही. दरम्यान अविश्वास ठरवा मंजूर झाला आणि इम्रान सत्तेतून गेला. सत्ता गेल्यानंतर इम्रान खान काय भूमिका घेईल यावर सगळ्यांचं लक्ष होतं. लाहोर मध्ये पहिल्याच सभेत इम्रान खानने परत भारताच्या कौतुकाने सभेला सुरुवात केली.
सभेत भारताचं कौतुक करताना इम्रान खान म्हणाला,’ भारताचे विदेशी धोरण स्वतंत्र आहे. परकीय शक्ती भारतावर प्रभाव टाकत नाहीत. भारत Quadrilateral Security Dialogue अंतर्गत अमेरिकेसोबत आहे पण त्याचवेळेस भारत रशियाकडून तेल मागवतो. रशियावर अमेरिकेसह अनेक देशांनी बहिष्कार टाकला आहे तरी भारताने जगाची काळजी न करता रशियाकडून आवश्यक गोष्टींची आयात चालूच ठेवली. भारताचे धोरण तटस्थ आहे असे भारत सांगतो. पण भारत विदेशी धोरण ठरवताना जनतेचा विचार करून निर्णय घेतो. पाकिस्तान मात्र विदेशी धोरण ठरवताना लोकांचा विचार करत नाही. पाकिस्तानी सत्ताधीश हे स्वतःचा स्वार्थ बघतात यामुळे पाकिस्तानी नागरिकांना नुकसान सहन करावं लागतं. एक स्वतंत्र विदेशी धोरणाशिवाय पाकिस्तानचा विकास शक्य नाही.’ पाकिस्तनाच्या धोरणांवर टीका करताना इम्रान खान भारताच्या धोरणांचे तोंडभरून कौतुक करत होते. याअगोदर पण इम्रानने भारताचं कौतुक केलं आहे. यानिमित्ताने इम्रान खानने याआधी भारताबद्दल काय बोललंय हे एकदा वाचा.
पाकिस्तानी आर्मी ही तिथल्या राज्यकर्त्याना स्वतंत्रपणे काम करू देत नाही. इम्रान खानला पाकिस्तानी आर्मीचा राजकारणात सहभाग नको होता पण ही गोष्ट स्पष्ट बोलणे अवघड आहे म्हणून त्यांनी भारतीय आर्मीचे कौतुक करताना पाकिस्तानी आर्मीच्या कारभारावर टीका केली. भारतीय आर्मी भ्रष्टाचार करत नाही म्हणून त्यांच्या कामाला सलाम करावा वाटतो असं इम्रान खान म्हणाले. एकूण भारतीय राजकारणाबद्दल आणि कार्यपध्दतीबद्दल इम्रान खानने कौतुक केले होते.
७ मार्च रोजी एक रॅलीत इम्रान खानने इस्लामबादमधील पश्चिमी राजदूतांवर टीका केली होती. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानने रशियाविरुद्ध मत नोंदवण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकल्याचा आरोप इम्रान खानने केला. रॅलीदरम्यान युरोपियन युनियनवर इम्रान खानने शाब्दिक हल्ला केला आणि विचारले की “आम्ही तुमचे गुलाम आहोत का की तुम्ही म्हणाल ते आम्ही करू?” पुढे इम्रान बोलले कि युरोपियन युनियनने असे पत्र भारताला पाठवले आहे का? यावरून इम्रान खानने असे सांगण्याचा प्रयत्न केला कि जगात भारताला जशी इज्जत आहे ती पाकिस्तनाला नाही.
इम्रान खान पंतप्रधान असताना रशियाच्या दौऱ्यावर गेल्यामुळे अनेक राष्ट्रांनी इम्रान खानवर टीका केली. यावेळेस इम्रान खान यांनी असं बोललं कि जगातील शक्तिशाली राष्ट्रे जी भारताच्या बाजूने उभी आहेत त्यांनी इम्रानच्या रशिया दौऱ्यावर टीका केली आहे. या माध्यमातून इम्रान खान यांनी स्पष्ट सांगितले कि भारत आता पूर्वीसारखा राहिला नाही. मोठी आणि शक्तिशाली राष्ट्रे भारताच्या बाजूने आहेत. एवढाच नाही तर भारत कोणतंही धोरण ठरवताना परकीय मोठ्या राष्ट्रांना भीक घालत नाही.
इम्रान खानच्या बोलण्यात असं दिसून येतंय कि कुठेतरी इम्रान खानला पाकिस्तान हा भारतासारखा अपेक्षित आहे. इम्रान खानचा हाच दृष्टिकोन पाकिस्तानी आर्मीला पसंत नव्हता. परिणामी त्यांना सत्ता सोडावी लागली.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !