इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी १२ आणि १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा महालिलाव होणार आहे. या लिलावाच्या निमित्ताने सगळ्याच संघांचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे.
बीसीसीआयने लिलावासाठी ५९० खेळाडूंची निवड केली आहे. प्रत्येक संघाकडे त्यांचे चार खेळाडू आहेत उरलेले सर्व खेळाडू ते महा लिलावात त्यांच्या टीम मध्ये घेणार आहेत. आयपीएलच्या महा लिलावात हजारो कोटी रुपयांची बोली लागणार आहे. त्यामुळे महा लिलावाचे सर्व बारकावे आपल्याला माहिती असायला हवे.
२०२२ ला दोन नव्या टीम
अहमदाबाद आणि लखनऊ या दोन टीम वाढल्या आहेत. ह्या दोन नव्या टीम असल्यामुळे त्यांच्या कडे स्वतःचे खेळाडू नव्हते. स्वतःचे खेळाडू नसल्यामुळे अहमदाबाद आणि लखनऊ दोन्ही टीमला महा लिलावच्या आधीच चार खेळाडू घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते. जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही. महा लिलावाच्या आधी मिळालेल्या संधीचा फायदा घेउन अहमदाबाद संघाने त्यांच्या संघात हार्दिक पंड्या , अफगाणिस्तानचा रशीद खान आणि शुभम गिल या तीन खेळाडूंना सामावून घेतले आहे. लखनऊ संघाने के. एल. राहुल आणि मार्कस टॉयनीस या दोंघांना त्यांच्या संघात घेतले आहे.
पंजाबकडे ७२ कोटी आहेत पण बाकीचे ५० कोटीच्या आत अडकले आहेत.
आता तुम्ही म्हणाल पंजाबची टीम स्पेशल आहे का त्यांच्या कडे जास्त पैसे असायला. तर नाही पंजाब स्पेशल नाही फक्त पंजाबने त्यांचे जुने खेळाडू जास्त किमतीत खरेदी केले नाहीत. मयांक अग्रवाल आणि अर्श्वदीप सिंग या दोघांनाच रिटेन केलं आहे. त्यांची बाकी सर्व टीम नवी असणार आहे. पंजाब व्यतिरिक्त बाकी टीम कडे ५० कोटीच्या आसपास पैसे शिल्ल्क आहेत. तेवढ्या पैशातून त्यांना खेळाडू घ्यावे लागणार आहेत.
वॉर्नर आणि श्रेयश अय्यर मोठा भाव खाऊ शकतात.
५९० खेळाडूंमध्ये खूप प्रतिभावान देशी आणि विदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे सर्वच खेळाडूंना चांगला भाव लागणार आहे. पण ऑस्ट्रेलियाचा वॉर्नर आणि अय्यरला मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. याचे कारण पण स्पष्ट आहे. हैद्राबाद संघाने २०१५ ला आयपीएलचे टायटल जिंकून देणाऱ्या वॉर्नरला सोडले आहे. तर दिल्ली संघाने त्याचा कॅप्टन अय्यरला सोडले आहे. हे दोघे यशस्वी कॅप्टन असल्यामुळे प्रत्येक संघ त्यांना त्यांच्या संघात घेण्याचा प्रयत्न करणार. वॉर्नर आणि अय्यर यांच्या साठी सोने पे सुहागा म्हणजे बंगलोर आणि पंजाब टीमला कर्णधार नाहीये. त्यामुळे वॉर्नर आणि अय्यरसाठी हे दोन संघ मोठी किंमत लावू शकतात.
नवे गडी २०२२ चा आयपीएल गाजवू शकतात.
सगळया दहाच्या दहा टीम महा लिलावामध्ये त्यांच्या त्यांच्या टीम मजबूत करणार आहेत. हार्दिक पंड्या अहमदाबाद टीमचा कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे तर के. एल. राहुल लखनऊ टीमची धुरा सांभाळणार आहे. त्यामुळे दोन नव्या टीम नवा जोश भरणार आहेत. अंडर १९ चे नवे खेळाडू पण २०२२ च्या आयपीएल मध्ये येणार आहेत. त्यामुळे नवे स्टार तयार होऊ शकतात.
१३ फेब्रुवारीला महा लिलाव पूर्ण होऊन जाईल. एकदा का लिलाव पूर्ण झाला कि सर्व टीम त्यांच्या तयारीला लागतील. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २०२२ चा आयपीएल सुरु होईल. महा लिलावामुळे सर्व टीमचे खेळाडू बदलणार आहेत. २०२२ चा आयपीएल रंगतदार होण्याची शक्यता आहे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !