भारतात इंटरनेट जगात सर्वात स्वस्त आहे. २०१५ ला जिओ आलं आणि ते आणखी स्वस्त झालं. आता इंटरनेटचे भाव थोडे वाढले आहेत पण आणखीही आपलं इंटरनेट बाकीच्या देशांपेक्षा खूप स्वस्त आहे. असो, हा विषय नाही. जसं जस भारतात इंटरनेट वाढत गेलं तसे ऑनलाईन व्यवसाय वाढत गेले. अमॅझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर ई कॉमर्स वेबसाईट्स खूप वाढल्या. सुरुवातीला लोकांना ऑनलाईन खरेदीवर विश्वास नव्हता पण ई कॉमर्स कंपन्यांनी ऑनलाईन खरेदी सुरक्षित आहे हा विश्वास दिला. पण तो काळ आता मागे पडत आहे. ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनाही फसवणूक होताना दिसत आहे, त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे.
मोबाईल ऑर्डर केला होता दगड पाठवला.
ऑनलाईन खरेदीचं काय खरं असत, अश्या चर्चा मी स्वतः खूप वेळा ऐकल्या आहे. पण मला त्यावर विश्वास नव्हता कारण डिलिव्हरीच्या वेळेस काही समस्या आली तर मला माहिती होत कि त्यांचं कस्टमर केअर असतं. आता पण कस्टमर केअर आहे पण लोकांचे अनुभव फार चांगले नाहीत. कधी मदत लागली तर तेवढ्या गतीने ती मिळत नाही. त्यामुळे ऑनलाईन खरेदीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हिंदी न्युज चॅनल लल्लनटॉपचे पत्रकार सौरभ त्रिपाठी आहेत. त्यांच्या एका मित्राने अमॅझॉनवरून वरून त्यांच्यासाठी मोबाइल मागवला होता. पेमेंट्स ऑर्डर करण्याआधीच केले होते. दोन दिवसात त्यांची ऑर्डर आली पण बॉक्स काढून बघितल्यावर तो चकित झाला. मोबाईलच्या जागी ऑर्डर मध्ये दगड भरला होता.
असं झाल्यावर आपण काय करू शकतो ?
पत्रकार सौरभ त्रिपाठी यांच्या मित्रांसोबत असं झाल्यामुळे त्यांनी त्याची माहिती ट्विटरवर पोस्ट करून सर्वाना दिली. अमॅझॉन स्वतः ट्विटवर ऍक्टिव्ह आहे. त्यांचे कस्टमर केअर ट्विटरवर सक्रिय असते. सौरभ त्रिपाठी यांना खूप लवकर मदत मिळून जाईल. सौरभ त्रिपाठी पत्रकार होता म्हणून त्याला लवकर मदत मिळेल पण आपल्या सोबत असं झालं तर आपण काय करू शकतो ?
जर आपल्या सोबत असं झालं तर अजिबात काळजी करायची गरज नाही. अशी फसवेगिरी शक्यतो कंपनी करत नसते. कंपनीत काम करणारे काही लोक असे करत असतात. आपल्या सोबत असं झाल्यावर त्या ई कॉमर्स कंपनीची एक कस्टमर केअर असते. त्यांना संपर्क करायचा. आपल्या सोबत काय घडलं आहे याची त्यांना माहिती द्यायची. आपल्याला मदत करणं त्यांचं काम असत. त्यामुळे मदत करतात. जर कस्टमर केअरवाले मदत करत नसतील तर ट्विटर एक पर्याय आहे. प्रत्येक ई कॉमर्स कंपनीचे ट्विटरला अकॉउंट असते त्यावर आपण डायरेक्ट त्यांना मेसेज करू शकतो.
ऑनलाईन खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे.
ऑनलाईन खरेदी करताना सर्व गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत. बाकी ठिकाणी वस्तूची किंमत किती आहे हे एकदा ऑर्डर कारण्याधी बघितले पाहिजे. अनेक वेळा आपल्याला वस्तूची नेमकी किंमत किती आहे हे माहिती नसते. खरेदी करताना कंपनी आपल्याला पेमेंट करताना ऑनलाईन किंवा कॅश ऑन डिलिव्हरी असे दोन पर्याय देते. ज्या वेळेस आपण मोठ्या किमतीचे सामान घेऊ तेंव्हा शक्य त्यावेळेस कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडला पाहिजे जेणे करून तुम्हाला एक विश्वास राहील कि आपली फसवणूक होणार नाही.
भारत खूप डिजिटल झाला आहे , सर्व गोष्टी डिजिटल होत आहेत पण फसवेगिरी होतच राहील कारण असे करणारे लोक त्याचा मार्ग कुठून तरी शोधून काढतच असतात. त्यामुळे आपणच खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !