राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ११ मार्चला विधिमंडळात २०२२-२०२३ या वर्षाचा अर्थ संकल्प मांडला आहे. अर्थसंकल्प मांडताना त्यांनी राज्याच्या शेती , आरोग्य , रस्ते , पर्यटन आणि इतर क्षेत्रासाठी निधीची घोषणा केली आहे. कोणत्या क्षेत्रासाठी किती निधीची घोषणा केली आहे. कोणती नवी योजना राज्य सरकारने आणली आहे. ह्या सर्व घोषणा आपल्याला माहिती पाहिजे.
शेतीसाठीच्या घोषणा..
१) नियमित कर्जफेड करणाऱ्या 20 लाख शेतकर्यांसाठी 2022-23 मध्ये 10 हजार कोटींची खर्च केले जाणार.
२) शेततळ्यांच्या अनुदानात 50% वाढ करून 75 हजार करण्यात येणार.
३) कृषी विभागासाठी 3025 कोटींचा निधी राखीव ठेवला आहे.
४) 15,212 कोटी सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाला राखीव ठेवले आहेत.
५) 2022-23 सिंचनाची 22 प्रकल्प सरकार पूर्ण करणार आहे.
६) 3,533 कोटी रूपये मृद व जलसंधारण विभागाला राखीव.
७) 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागांचे उद्दीष्ट आहे, फळबागांसाठी 540 कोटी राखीव ठेवले आहेत.
८) पशुसंवर्धन दुग्धविकास विभागास 406 कोटीची तरतूद.
राज्याच्या आरोग्य विभागासाठी.
१) 11 हजार कोटींचा निधी आरोग्य सेवांवर खर्च करण्याचे नियोजन आहे.
२) हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली , सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार.
३) टाटा कॅन्सर रूग्णालयाला आयुर्वेदिक रूग्णालय उघडण्यासाठी रायगड खालापूर येथे 10 हेक्टर जमीन देण्यात येणार आहे.
४) पुणे जिल्ह्यात इंद्रायणी हे आरोग्य रिसर्च सेंटर उभारण्यात येईल. एकाच ठिकाणी संशोधन, रूग्णालय फिझीओथेरपी इत्यादी अश्या सेवा एकाच ठिकाणी असतील. हे देशातील सर्वात मोठं रिसर्च सेंटर असेल.
ग्रामीण भागासाठी केलेल्या घोषणा.
१) महाराष्ट्रात मिशन महाग्राम राबवले जाणार. त्यासाठी 500 कोटी दिले जाईल.
२) घरकुलांसाठी 6 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.
दळणवणासाठीच्या घोषणा.
१) सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते 15 हजार 773 आणि बांधकाम 1 हजार 88 कोटी रूपये प्रस्तावित.
२) शिर्डी विमानतळाच्या कामासाठी 150 कोटी, रत्नागिरीसाठी 100 कोटी. अमरावती आणि कोल्हापूर विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. गडचिरोलीत नवीन विमानतळ प्रस्तावित.
३) 3000 नवीन बस गाड्या परिवहन विभागाला उपलब्ध करून देणार.
४) समृद्धी महामार्ग भंडारा-गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे.
पर्यटन विभागासाठी.
१) पर्यटन विभागासाठी 1,704 कोटी आणि सांस्कृतिक विभागाला 193 कोटी देण्यात आले आहेत.
२) शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
३) रायगड किल्याच्या जतन संवर्धनासाठी 100 कोटी रूपये निधी.
इतर घोषणा.
१) महापुरुषांच्या नावाच्या राज्यातल्या 10 शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांच्या सुधारणेसाठी प्रत्येकी 1 कोटी निधी देणार.
२) तृतीयपंथीयांना बीज भांडवल आणि स्वयंरोजगार योजना राबवणार. तृतीयपंथीयांना ओळखपत्र उपलब्ध करण्याची विशेष योजना. त्यासाठी 250 कोटींचा निधी.
३) ई-शक्ती योजनेतून अंगणवाडी सेविकांना मोबाईल देणार तर त्यांना दरमहा 1,125 वरून 2,500 वाढ.
४) इलेक्ट्रिक कारसाठी 5,000 चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अर्थ संकल्प मांडल्यावर पत्रकारांना बोलताना अजित पवार म्हणालेत , महाराष्ट्राच्या विकासासाठी महाविकास आघाडी 4 लाख कोटी रुपये उपलब्ध करून देईल. महाराष्ट्र हे 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य आहे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !