MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीचा अर्थ

पश्चिम बंगालच्या विधानसभेत तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केल्यावर ममता बॅनर्जी आता राष्ट्रीय राजकारणात संधीं शोधत आहेत. काँग्रेसची देशभरात अवस्था खूप वाईट आहे. विरोधी पक्षाची जागा सध्या राष्ट्रीय राजकारणात रिकामी आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी काँग्रेसची जागा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. नोव्हेंबर मध्ये ममता यांनी दिल्ली दौरा केला त्यात त्यांनी वेगवेगळ्या पक्षांसोबत बैठका घेतल्या. दिल्ली दौऱ्यानंतर ममता, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबई मध्ये आल्या आहेत.

कसा आहे ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा ?

ममता दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आल्या आहेत. सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेऊन त्या मुंबई दौऱ्याची सुरुवात करतील. त्यानंतर त्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्या भेट घेतील.

काय आहेत दौऱ्या मागची करणे ?

ममता बॅनर्जी सध्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. ऑक्टोबर मधील ममता बॅनर्जी यांचा दिल्ली दौरा पण गाजला होता. दिल्ली दौऱ्यामध्ये ममता यांनी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आणि इतर बिगर भाजपायी पक्षांच्या भेटी घेतल्या होत्या. ममता काँग्रेस सोडून इतर समविचारी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयन्त करत आहेत. ममता यांनी मुंबई दौऱ्याची अधिकृत माहिती दिली नाही परंतु शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट याच गोष्टीचा दुजोरा देत आहे कि ममता बॅनर्जी काँग्रेस शिवाय आघाडीची तयारी करत आहेत.

शरद पवारांची भूमिका ?

शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांचा राजकीय अनुभव पाच दशकांचा आहे. त्यांची भूमिका राष्ट्रीय राजकारणात महत्वाची असते. ममता बॅनर्जी यांच्या भेटी नंतर पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काँग्रेसची अवस्था जुन्या जमीनदारासारखी झाली आहे असं विधान शरद पवार यांनी केलं होत. त्यामुळे शरद पवार ममता यांच्या काँग्रेस शिवाय आघाडीला समर्थन देतात का बघणं महत्वाचं आहे.

काँग्रेस शिवाय तिसऱ्या आघाडी करण्याचा प्रयत्न २०१९ च्या लोकसभा निवडणुकी आधी शरद पवार आणि चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. नरेंद्र मोदी २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने निवडून आले अन काँग्रेस शिवाय तिसरी आघाडी २०१९ मध्ये चांगलीच फसली. ममता बॅनर्जी ही आघाडी कुठल्या दिशेला नेतात हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.