लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे नवे लष्करप्रमुख असणार आहेत. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करप्रमुख एमएम नरवणे यांची जागा घेतील. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे एमएम नरवणे यांच्यानंतर लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. सध्या लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे सध्या लष्कराचे उपप्रमुख आहेत. मनोज पांडे यांच्या निवडीमुळे महाराष्ट्राला सलग दुसऱ्यानंद आर्मी प्रमुखाचा मान मिळाला आहे. नागपूरचे असलेले मनोज पांडे एम एम नरवणे यांच्या नंतर दुसरे मराठी आर्मी प्रमुख असणार आहेत. त्यामुळे मनोज पांडे यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे १ मे रोजी २९ वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. लष्करप्रमुख एमएम नरवणे यांचा ३० एप्रिल रोजी २८ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. नॅशनल डिफेन्स अकादमीतुन ग्रॅजुवेट झालेले मनोज पांडे १९८२ मध्ये ‘कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये’ जॉईन झाले. जम्मू आणि काश्मीरमधील बॉर्डर जवळ पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांनी इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. मनोज पांडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. अनेक दहशतवाद विरोधी ऑपरेशन मध्ये त्यांचा सहभाग होता. निवृत्त होणार सेनाप्रमुख जनरल एमएम नरवणे आणि सर्व कर्मचारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची २९ वे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन अभिनंदन केले आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे १ मे २०२२ रोजी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील, अशी माहिती लष्कराने दिली आहे.
ऑपरेशन पराक्रममध्ये मनोज पांडेची भूमिका
डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन पराक्रमचा भाग म्हणून पाकिस्तानच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले होते. ही घटना घडली तेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती उदभवली होती. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशन पराक्रम दरम्यान पाकिस्तान बॉर्डरला इंजिनियर रेजिमेंटला लीड केले. यासोबतच पश्चिम सेक्टरमध्ये अभियंता ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड आणि पश्चिम लडाखच्या उच्च उंचीच्या भागात हिल डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे.
नागपूरकर मनोज पांडे
मनोज पांडे हे नागपूरचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सी.डी. पांडे आणि रेडिओ अँकर प्रेमा पांडे यांचा मुलगा आहेत. मनोज पांडे यांचा मुलगा अक्षय पांडे इंडियन एरफोर्स मध्ये कमिशन्ड ऑफिसर आहे. लेफ्टनन्ट जनरल मनोज पांडे यांची बायक अर्चना पांडे डेंटिस्ट आहेत.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !