MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

शार्क अशनीर ग्रोव्हरच्या बायकोला गैर व्यवहार केला म्हणून भारत पे मधून काढून टाकलंय ।

डिसेंबर २०, २०२१ ला प्रर्दर्शीत झालेली रिऍलिटी शो शार्क टॅंक भारतात हळू हळू प्रसिद्ध झाला. लोकांनी शार्क टॅंकला खूप प्रेम दिल. शो मध्ये शार्क असलेले अमन गुप्ता , अनुपम मित्तल , विनिता सिंग , नमिता थापर , गझल अलघ , पियुष बन्सल आणि अशनीर ग्रोव्हर खूप फेमस झाले. शार्क टॅंकच्या माध्यमातून त्यांचे ब्रँड मोठे झाले. लोकांना त्यांच्या ब्रँड बद्दल समजले. पण शार्क टॅंक सुरु झाल्यापासून सगळयात जास्त चर्चेत आहे भारत पे चा अशनीर ग्रोव्हर. शो चालू असतानाच त्याचे आणि भारत पे चे मतभेद झाल्याच्या बातम्या आली होत्या. अशनीरच्या बातम्या बंद झाल्या आहेत मात्र अशनीरची बायको माधुरी जैनला भारत पे मधून काढून टाकल्याची बातमी आली आहे.

गैर व्यवहार केल्याचा माधुरी जैनवर आरोप आहे.

भारत पे चा सह संस्थपाक अशनीर ग्रोव्हरची बायको माधुरी जैन भारत पे मध्ये आर्थिक विभागाची प्रमुख होती. कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार माधुरी जैनचा विभाग पाहायचा. पण माधुरीने कंपनीच्या व्यवहारातून स्वतः खर्च केल्याचा आरोप तिच्या वर आहे. भारत पे ने माधुरी जैनचा गैर व्यवहार तपासण्यासाठी समिती बसवली होती. चौकशी समितीच्या तपस आवाहलात माधुरी जैन दोषी आढळली आहे. त्यामुळे कंपनीच्या बोर्डाने तिला भारत पे मधून काढून टाकले आहे.

कंपनीच्या बोर्डासोबत मतभेद झाल्यावर अशनीर ४००० कोटी मागितले होते.

भारत पे आणि कोटक बँक एकत्र येऊन काम करणार होते. त्याच्या बोलण्या चालू असताना अशनीर ग्रोव्हर आणि कोटक बँकांच्या अधिकारी यांच्यात वादावादी झाली. वाद एवढा टोकाला पोहचला होता कि अशनीर ग्रोव्हर आणि भारत पे च्या बॉडी सदस्यां पर्यंत पोहचला. वाद मिटत नाही असं दिसल्यावर अशनीर ग्रोव्हरने तीन महिन्याच्या सुट्या घेतल्या जेणे करून मतभेद संपतील. पण त्यांच्यातले मतभेद जास्त झाले. अशनीर ग्रोव्हर भारत पे सोडत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. कंपनी सोडण्यासाठी अशनीर ग्रोव्हरने भारत पे कडे ४००० कोटी मागितले होते. अशनीर ग्रोव्हरच्या बातम्यांमुळे भारत पे ब्रँडला नुकसान होत असल्यामुळे ह्या सर्व खोट्या बातम्या असल्याचं पत्रक भारत पे ला काढावं लागलं होत.

शार्क टॅंक मध्ये अशनीर ग्रोव्हर नवीन आयडिया घेऊन आलेल्या स्पर्धकांना खूप आदर्श असल्यासारखा बोलायचा. आयडिया थोडी हलकी असली स्पर्धकांना निराश करायचा. त्याची आयडिया किती वाईट आहे त्याला सांगायचा अशनीरचा ये डोगला पण है हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता. त्यावर खूप मिम पण आले होते. पण खऱ्या आयुष्यात अशनीर स्वतःचा डोगला आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.