महाविकास आघाडी सरकार आल्यापासून दोन तीन नेते प्रचंड चर्चेत असतात. म्हणेज ते दिवसात टीव्ही वर आले नाहीत असं मागच्या दोन वर्षांपासून होतच नाही. त्यातलेच एक नेते आणि मंत्री म्हणजे नवाब मलिक. आज सकाळी ईडीच्या ( ENFORCEMENT DIRECTORATE ) अधिकाऱ्यांनी नवाब मलिक याना त्यांच्या घरून उचलले आहे. ईडीच्या कार्यालयात त्यांना चौकशी साठी नेले आहे.
मलिक यांच्या अटकेची बातमी आली कि राजकीय महाभारत सुरु होणारच होतं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर भाजपच्या इशाऱ्यावर ईडी काम करत असल्याचा घणाघात केला आहे. शरद पवार यांनी आम्हाला अंदाज होता कि नवाब मलिक याना अटक होईल असं वक्तव्य केलं आहे. ईडी राजकीय सुडापोटी कारवाही करत असल्याचा आरोप होत आहे. तर भाजपचे नेते नवाब मालिकांना चौकशीला सामोरे जायला काय समस्या आहे अश्या प्रतिक्रिया देऊन अटकेच समर्थन करत आहेत. राजकीय पक्ष आरोप प्रत्यारोप करत राहतील ते त्यांचं काम आणि त्याचा त्यांना फायदा देखील आहे. पण मंत्री नवाब मलिक याना अटक का केली आहे, त्यांच्यावर आरोप काय आहेत आणि नेमका मॅटर काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे.
दाऊद इब्राहिमच्या गॅंग सोबत मलिक यांचे संबंध असल्याचे आरोप झाले होते.
नोव्हेंबर २०२१ महिन्यात नवाब मलिक यांनी देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांच्यावर भ्रस्टाचाराचे आरोप केले होते. अमृता फडवणीस यांच्यावर आरोप झाले कि त्याचे पती आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी देखील मुंबईत पत्रकार परिषेद घेऊन नवाब मलिक यांच्यावर जमीन गैर व्यवहाराचे आरोप केले. पत्रकार परिषेदेत फडवणीस यांनी मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्यात संबंध असल्याचे आरोप केले होते. दाउदची बहीण हसिना पारकर हिच्या जवळच्या लोकांकडून मलिक यांनी जमीन घेतली असल्याचे आरोप फडवणीस यांनी केले . पत्रकार परिषेदेनंतर फडवणीस यांनी नवाब मलिक यांची पोलिसात तक्रार देखील केली होती.
मनी लॉन्ड्रिंगची केस असल्याचं बोललं जातंय
ईडीने शुक्रवारी दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला ठाण्यातून अटक केली. मनी लॉन्ड्रिंगच्या केस मध्ये त्याला अटक केली. इकबाल कासकर आणि नवाब मलिक यांच्यात लिंक असल्याच्या बातम्या आल्या आहेत. इकबाल कासकरची ईडी चौकशी करत आहे. इकबाल कासकर याने चौकशीत नवाब मलिक याचे नाव घेतल्याच्या देखील बातम्या आल्या आहेत.
मंत्री नवाब मलिक यांना कोणत्या प्रकरणात अटक केली आहे याची माहिती ईडीने दिली नाही. चौकशी झाल्यावर किंवा मलिक याना कोर्टात हजर करण्याच्या आधी ईडी पत्रकार परिषेद घेऊन मलिक यांच्या वर काय आरोप आहेत याची माहिती देईल. पण सध्या तरी मनी लॉन्ड्रिंगची जास्त चर्चा आहे. आज दुपारी किंवा उद्या प्रयन्त नेमकी केस काय आहे ते कळेलच.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !