एलआयसीने सेबीकडे ( SECURITY EXCHANGE BOARD OF INDIA ) आयपीओ साठी अर्ज दाखल केला होता. १३ फेब्रुवारीला सेबी कडून त्यांना सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे पुढच्या पंधरा दिवसात एलआयसीचा आयपीओ बाजारात येणार हे पक्के झालं आहे. भारत सरकारने एलआयसीचा ५ टक्के भाग बाजारात विकण्याचे ठरवले आहे. ठरवलेल्या पाच टाक्याच्या ३५ % सामान्य ग्राहकांना शेयर्स विकणार आहेत, ५ % एलआयसीच्या कर्मचार्यांना तर १० % एलआयसीच्या पॉलिसी धारकांना राखीव आहेत आणि उरलेले ५०% शेयर्स मुक्त बाजारात विकले जातील. आयपीओ मध्ये शेयर्स घेण्यासाठी पॉलिसी धारकांनी पाच गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे.जेणे करून त्यांना आयपीओच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या साठी असलेल्या राखीव १० % भागाचा फायदा घेता येईल.
१) आयपीओ साठी पॉलिसी धारकांची पात्रता
एलआयसीने १३ फेब्रुवारीला सेबीकडे आयपीओच्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे ज्या पॉलिसी धारकांनी १३ फेब्रुवारी २०२२ च्या आधी पॉलिसी घेतली असेल तर पॉलिसी धारक १० % च्या कोट्या साठी पात्र आहेत. ज्या पॉलिसी धारकांना एलआयसी पॉलीसी १३ तारखेच्या नंतर घेतली आहे त्यांना याचा फायदा घेता येणार नाही.
२) एलआयसी पॉलिसी पॅन कार्डला जोडलेली पाहिजे.
१० % कोट्याचा फायदा घेण्यासाठी पॉलीसी धारकांनी त्यांची पॉलिसी पॅन कार्डला जोडलेली असणे आवश्यक आहे. ज्या पॉलिसी धारकांची पॉलिसी पॅन कार्डला जोडलेली नाही त्यांना १० % कोट्याचा फायदा होणार नाही.
जर तुम्ही पॉलिसी धारक असाल तर ह्या लिंक वर बघू शकता कि तुमची पॉलीसी पॅन कार्डला जोडलेली आहे कि नाही. .https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus
पॅन कार्डला जोडायचं राहिले असेल तर तुम्ही या लिंक वर जाऊन तुमची पॉलिसी पॅन कार्ड ला जोडू शकता. https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/
पॉलिसी पॅन कार्डला जोडण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी आहे. त्यांनतर जोडलेल्या पॉलिसी धारकांना आयपीओत १० % कोट्याचा फायदा होणार नाही.
३) जॉईंट पॉलिसी असणाऱ्यांसाठीचे नियम
जर पॉलिसी दोघांच्या नावाने जॉईंट असेल आणि दोघांनी आयपीओत वेग वेगळी अर्ज केली तर दोघाना पण ग्राह्य धरले जाईल. १० % राखीव कोट्याचा फायदा जॉईंट पॉलिसी धारकांना देखील घेता येईल.
४) जॉईंट डिमॅट अकाउंट असेल तर
शेयर्स बाजारात काम करण्यासाठी ग्राहकांना डिमॅट अकाउंट असायला लागते. जर पॉलिसी धारकांचे जॉईंट डिमॅट अकाउंट असेल तर पहिल्यादा बघून घ्या कि तुमचं अकाउंट प्रायमरी आहे कि सेकंडरी. प्रायमरी असेल तर तुम्हाला ते वापरता येईल पण जॉईंट सेकंडरी अकाउंटला आयपीओत परवानगी नाही.
५) सर्व पॉलिसी धारक १० % कोट्यासाठी अर्ज करू शकतात का ?
ग्रुप पॉलिसीधारक सोडून सर्व पॉलिसी धारकांना आयपीओ साठी सेबी कडून परवानगी आहे. फक्त पॉलिसी धारक एनआरआय ( NON RESIDENT INDIAN ) नसावा एनआरआय पॉलिसी धारकांना एलआयसी आयपीओत १० % कोटा मिळणार नाही.
एलआयसीचा आयपीओ येण्याआधी पॉलिसी धारकांनी ह्या पाच गोष्टीं पूर्ण आहेत का याचा विचार केला पाहिजे. जेणेकरून ऐन वेळेला गरबड होणार नाही.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !