MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मिटकरीमुळे चर्चा झालीच आहेत तर कन्यादान गरजेचे आहे कि नाही हे तपासून घेऊ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांचं इस्लामपूरच्या सभेतलं भाषण गाजलं आहे. सर्व टीव्ही वाहिन्यांवरून अमोल मिटकरींच भाषण दाखवलं जात आहे. त्यांच्या भाषणात मिटकरींनी ‘कन्यादान आणि ब्राह्मण पुरोहितांवर’ भाष्य केलं आहे. मिटकरींनी त्यांचा एक किस्सा सांगितला कि, त्यांच्या समोर एका लग्नात कन्यादान होत असताना पुरोहित चुकीचे मंत्र म्हणत होता. पण नवऱ्या मुलाला ते कळतं नव्हते. त्याच्या पुढे जाऊन अमोल मिटकरी म्हणले, मी रक्तदान, अन्नदान ऐकलं होत पण कन्यादान हे जरा जास्त नाही का होत ? कन्या काय दान करायची असते का ?
अमोल मिटकरी यांच्या याच वक्तव्यामुळे ब्राह्मण महासंघाने त्यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यलयाबाहेर आंदोलन केले. अमोल मिटकरी जनतेची दिशाभूल करत असल्याचा त्यांचावर आरोप आहे. पण मी काय म्हणतो, हे कन्यादान प्रकार चर्चेत आलाच आहे तर चर्चा पुढे जायला पाहिजे. जर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली तर मुद्दा निकालात निघू शकतो. नाही तर कोणी अमोल मिटकरी कधी तरी एखाद भाष्य करेल आणि तेवढ्या पुरता तो विषय तापेल आणि पुन्हा पुन्हा थंड होऊन जाईल. मुलगी म्हणजेच कन्या दान करायचा विषय असतो का? धर्मातल्या नियमांप्रमाणे ते गरजेचं आहे का ? आणि आपल्याला हे कन्यादान पटतं का? हे तपासून बघितलंच पाहिजे.

कन्यादान कुठून आलं ?

प्रत्येक हिंदू धर्मियांच्या लग्नातला कन्यादान एक महत्वाचा घटक असतो. अक्षता आणि बाकी कार्यक्रम संपले कि शेवटी कन्यादानाचा कार्यक्रम होत असतो. मुलीचे आई वडील आपली मुलगी मुलाला दान करत असतात. पुरोहित ब्राह्मण त्याच्या मंत्राने विधी पूर्ण करतो. कन्यादानाचे विधी पूर्ण करत असताना मुलीचे आई वडील खूप इमोशनल होतात. पण प्रश्न उरतो लग्नात हे कन्यादान आलं कुठून ?

तर कन्यादानाचं मूळ आहे मनूस्मुर्ती. मनुस्मुर्ती मध्ये हिंदू लग्नाचे विधी लिहलेले आहेत. त्यानुसारच आज देखील हिंदू लग्ने होतात. मनुस्मृती मध्ये कन्यादानाचे महत्व पटवून देताना अशी करणे दिली आहेत कि, मुलगी किंवा बाई पुरुषावर अवलूंबून असते. तिला नेहमीच पुरुषाची गरज लागते. मुलगी लहान असताना मुलीने वडिलांच्या छायेत राहिलं पाहिजे आणि मोठं झाल्यावर नवऱ्याच्या देखरेखी खाली जगलं पाहिजे आणि म्हातारपणी मुलांच्या आदेशाने जगल पाहिजे. म्हणून लहानपण संपल्यावर लग्न होणाऱ्या मुलाला मुलगी दान करून आणि त्याच्या कडून मुलीच्या रक्षणाची अपेक्षा केलेली असते.” तेंव्हापासून हिंदू लग्नामध्ये कन्यादान आलं जे आज पण चालू आहे. अनेक जणांनी कन्यादानाला विरोध केला पण त्यात बदल करायला लोक तयार नाहीत.

हिंदू धर्मात कन्यादान करणं गरजेचं आहे का ?

धर्मग्रंथात लिहलेले नियम त्या त्या धर्मात गरजेचे असतात असं मानतात. त्यांना नाकारणं धर्माला नाकारणं समजलं जात. पण मनुस्मुती काही हिंदू धर्माचा धर्मग्रंथ नाही. त्यामुळे कन्यादान करणे धार्मिक ठरत नाही. मनुस्मुर्ती हि एका मनू नावाच्या ऋषीने लिहलेलं पुस्तक आहे. त्यात हिंदू धर्म कसा असावा, त्याचे नियम काय असावे ह्याच्या बद्दल भाष्य केलं आहे. पण तो धर्म ग्रंथ नाही. त्याकाळच्या हिंदू धर्मियांनी मनुस्मुतीला फक्त नियम ग्रंथ म्हणून स्वीकारले आहे. या सगळ्या अभ्यासातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो कि लग्नात कन्यादान करणे आपल्या मर्जीनुसार आपण स्वीकारू शकतो किंवा नाकारू शकतो.

मुलगी दान करायची गोष्ट आहे का ?

देव, धर्म आणि इतर गोष्टी थोड्या बाजूला ठेवू पण आपल्याला ह्याचा विचार करावा लागणार आहे. आपली मुलगी दान करण्याची गोष्ट आहे का. मला तर नाही वाटतं. अनेक जण म्हणतील नुसता विधी केला तर काय आपण खरंच मुलगी दान करतो का ? नाहीच करत, मान्य आहे. पण मग हे सोंग का ? कशासाठी. पुरोहितांच्या पोटासाठी कि अंधश्रद्धा म्हणून. लग्न आनंदाचे कारण असते. त्या दिवशी आपल्या मुलीला दान करण्याचा विधी का ? ह्याचा विचार आपण करणार आहोत कि नाही. प्रश्न जर फक्त विधीचा असेल तर त्या जागी दुसरा विधी आपण ठेवू शकतो. त्यासाठी कशाला हवा आहे हा किळसवाणा शब्दप्रयोग.

इस्लामपूरच्या सभेत अमोल मिटकरी भाषणात कन्यादानाच्या बद्दल त्यांचे विचार त्याने मांडले. आपल्याला त्यांचे विचार आवडणे गरजेचे नाही किंवा त्यांनी तशी आपल्यावर बळजबरी केली नाही. पण सुजाण नागरिक म्हणून ह्या सर्व धार्मिक विधींवर विचार करायला हरकत नाही. पोटच्या मुलीचे दान करणे किंवा तसा शब्द प्रयोग वापरने किती योग्य आहे हे ज्याचे त्याने तपासून घेणे गरजचे आहे. त्याची सुरुवात झाली आहे याच आपण स्वागत केलं पाहिजे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.