MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

नेटफ्लिक्सची एन प्लस सेवा लवकरच भारतात येणार, व्हाट्सअप प्रायव्हसी पॉलिसी वर नवीन खुलासा.

१)नेटफ्लिक्स एम प्लस सर्विस

नेटफ्लिक्स हे नाव काही नवीन नाही. आता या सोबत एक नवीन सेवा जोडण्यात येत आहे. जगभरातील प्रसिद्ध कार्यक्रम, चित्रपट व मालिका यांचे चित्रीकरण कसे करण्यात आले व त्या मागची सगळी कहाणी आपल्याला या नेटफ्लिक्सच्या. एन प्लस सर्विस मार्फत पाहण्यास मिळणार आहे. ही सेवा भारतासह जगभरात लवकरच पाहायला मिळणार आहे

२) बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया

बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया हे पब जी या गेमच नवीन नाव, या संदर्भात एक नवीन माहिती मिळत आहे या गेमच प्रि रजिस्ट्रेशन आज म्हणजे 11 मे पासून सुरु होणार आहे. हा गेम भारतामध्ये १० जून २०२१ रोजी लॉन्च केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बॅटल ग्राऊंड मोबाईल इंडिया हा मोबाईल गेम खेळण्यासाठी उत्सुक असलेल्या जनतेसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

३)व्हाट्सअप ने त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसी वर केला नवीन खुलासा

मागच्या पोस्ट मध्ये याविषयी माहिती तुम्हाला दिली होती की व्हाट्सअप ने त्यांची प्रायव्हसी पॉलिसी कॅन्सल केली आहे व आता ज्या लोकांनी व्हाट्सअप प्रायव्हसी पॉलिसी मान्य केली नाही त्यांचे अकाउंट डिलीट केले जाणार नाही. त्यांच्यावर कोणतेही प्रकारचे निर्बंध घातले जाणार नाही, असे व्हाट्सअप ने सांगितले होते. या सोबतच सांगितलं होतं ही कंपनी ही शेवटी फेसबुक या कंपनी च्या मालकीची आहे आणि फेसबुकचा इतिहास पाहता या लोकांवर काही ना काही भुर्दंड बसेल हे सांगितलं होत. ते आता खरं ठरतंय. व्हाट्सअप आता मिळालेल्या माहितीनुसार अशा लोकांवर लिमिटेड फीचर्सची तलवार टांगणार आहे. जर तुम्ही व्हाट्सअपची प्रायव्हसी पॉलिसी मान्य नसेल केली तर तुम्हाला नवीन ग्रुप सुरू करता येणार नाही. कोणतीही चाट फॉरवर्ड करता येणार नाही. तुम्हाला तुमचा डेटा बॅकअप करता येणार नाही. यासारख्या अशा बऱ्याच मर्यादा असणार आहेत.

४) गुगलचे टू स्टेप व्हेरीफिकेशन होणार सक्तीचे

सुरक्षिततेच्या दृष्टीने टू स्टेप व्हेरीफिकेशन हे आता लवकरच सगळ्यांना सक्तीचे होणार आहे. तर टु स्टेप व्हेरीफिकेशन ही एक अशी प्रणाली आहे ज्यामुळे जरी आपण पासवर्ड टाकून आपल्या जीमेल अकाउंट मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्या मोबाईलवर आलेल्या एक व्हेरिफिकेशन कोड शिवाय तुमचं जी-मेल अकाऊंट मध्ये साइन इन होणार नाही. ही प्रणाली सध्या वैयक्तिक रित्या आपल्याला सुरू करता येत होती आणि आपले अकाऊंटची सुरक्षितता सुनिश्चित करता येत होती. आणखी सुरक्षितता निश्चित करण्यासाठी हे पाऊल गुगल कडून टाकण्यात आलं आहे. ही प्रणाली सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे तर यामुळे आपला फायदाच होणार आहे कोणताही नुकसान होणार नाही. गुगलच्या या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे.

५)फ्लिपकार्ट फ्लॅगशिप फेस्ट सेल

जर तुम्ही महागडा मोबाईल घेऊ इच्छिता तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर 10 ते 14 मे दरम्यान फ्लिपकार्ट फ्लॅगशिप फेस्ट हा सेल सुरू असणार आहे. उत्तम ईएमआय ऑप्शन, एक्सचेंज ऑफर मिळणार आहेत तर नक्कीच या सेलचा फायदा करून घ्या.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.