MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

नेटफ्लिक्सला भारत कळलाच नाही, तीन महिन्यात दोन लाख ग्राहक कमी झाले

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटाफिल्क्स सध्या चर्चेत आहे. मूळ अमेरिकेची असलेली नेटफ्लिक्स लॉकडाउन मध्ये मोठे प्रमाणात वाढलं. ग्राहक वाढत आहेत म्हणून नेटफ्लिक्सने सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. पण नेटफ्लिक्सचे चांगले दिवस संपत चालले आहे. मागच्या तीन महिन्यात नेटफ्लिक्सचे भारतात दोन लाख ग्राहक कमी झाले आहेत. पण हे का झाले याचा आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि नेटफ्लिक्सला भारताचं मार्केट कळलंच नाही. लॉकडाउन मध्ये दुसरा कोणताही पर्याय नव्हता म्हणून लोकांनी नेटफ्लिक्सला पसंदी दिली. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. लोकांना इत्तर पर्याय उपलब्द झाले आहेत. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा फटका नेटफ्लिक्सला बसला असल्याचं बोललं जात आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.

ग्राहक कमी का झाले ?

गेल्या तीन महिन्यात नेटफ्लिक्सचे २ लाख ग्राहकांनी नेटफ्लिक्सकडे पाठ वळवली आहे. गेल्या दशकात नेटफ्लिक्सला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. रशिया-युक्रेन युद्ध, महागाई, इतर ओटीटी नेटवर्कशी असलेली स्पर्धा आणि करोना संकट यामागे कारणं असल्याचं सांगण्यात येत आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत नेटफ्लिक्स सदस्यांची संख्या २२१.६ दशलक्षांवर आली आहे. नेटफ्लिक्सचे म्हणणे आहे की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे त्याचे सदस्य कमी झाले आहेत. नेटफ्लिक्सने रशियामध्ये आपली सेवा बंद केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, २०२० मध्ये वर्क फ्रॉम होम दरम्यान, कंपनीचा विकास दर चांगला होता. परंतु ग्राहक त्यांचे खाते एकमेकांशी शेअर करतात, ज्यामुळे कंपनीचे नुकसान होत आहे. जवळपास २२२ दशलक्ष घरात नेटफ्लिक्स वापरलं जात आहे. परंतु नेटफ्लिक्स खात्यांची संख्या केवळ १०० दशलक्ष आहे. लोक स्वस्त इंटरनेट डेटा आणि स्मार्ट टीव्हीवर नेटफ्लिक्स वापरत आहेत. परंतु टेलिव्हिजन स्ट्रीमिंग सेवा पैसे देत नाही.

नेटफ्लिक्सची ग्राहक संख्या कशी आहे ?

नेटफ्लिक्ससाठी आशिया ही सर्वात लहान बाजारपेठ एक आहे. नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबरच्या बाबतीत सर्वात मोठी बाजारपेठ उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि नंतर युरोप आहे. नेटफ्लिक्सचे आशियामध्ये एकूण ३.२६ कोटी सबस्क्रायबर आहेत, जे त्याच्या एकूण सबस्क्रायबर संख्येच्या १४ टक्के आहे. नेटफ्लिक्स आता आपली वाढ आणि ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी आशियासह इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या काही तिमाहीत नेटफ्लिक्सचे बहुतांश सबस्क्रायबर आशियामधून आले आहेत आणि जपान आणि दक्षिण कोरियामध्ये कंपनीच्या यशाचे श्रेय याला दिले जाते. नेटफ्लिक्सला जपान आणि दक्षिण कोरियामध्ये सारखेच यश मिळाले असले तरी भारतात मात्र अद्याप तेच यश मिळालेले नाही. नेटफ्लिक्ससाठी भारतीय बाजारपेठ अजूनही एक गूढ आहे आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मचीही नेटफ्लिक्ससाठी कठोर स्पर्धा आहे.

नेटफ्लिक्सचे पुढं काय होईल ?

भारतात कमी झालेले दोन लाख ग्राहक खरं तर नेटफ्लिक्सला काहीही फरक करू शकणार नाहीत कारण कंपनी खूप मोठी आहे. पण कंपणीचे सीईओ  रीड यांनी सांगितलं की, “ग्राहकांना स्वस्त पर्याय उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.” यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांचा कल वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे येत्या काळात नेटफ्लिक्सचे प्लॅन आणखी कमी होतील असा अंदाज आहे. भारतात असलेले इतर असलेले प्लॅटफॉर्म पण खूप कमी भावात त्यांची सेवा देतात. नेटफ्लिक्सने जर त्यांचे भाव कमी नाही केले तर त्यांचे आणखी ग्राहक कमी होऊ शकतात.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.