पाकिस्तान कसा देश आहे आपल्या सगळयांना माहितच आहे. भारताला विरोध करण्यासाठी ते काही पण करू शकतात हे सांगायला नको. दुसऱ्याच वाटोळं करण्याच्या नादात कधी आपला धिंगाणा होऊन जातो हे कळत देखील नाही. तसेच काही पाकिस्तानच झालं आहे. भारताची बरोबरी करण्याच्या नादात पाकिस्तानने स्वतःच पार हस करून घेतलं आहे.
कर्जाचे व्याज भरून भरून पाकिस्तान हैराण
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणजे पाकिस्तानी आर्मीचा पोपट आहे. नावाला पंतप्रधान आहे मात्र अधिकार सगळे आर्मीकडे. आणि हा गडी काश्मीर जिकंण्याचा बाता मारतो. तर असो देशाला संबोधित करताना पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानने त्यांच्या सरकारकडे देश चालवायला पैसे नसल्याचे जाहीर केले आहे. पेट्रोल, डिझेल विकत घ्यायला पाकिस्तानकडे पैसे नाहीत. त्यामुळे इम्रान खानने लोकांनी गाड्यांचा वापर कमी करण्याचे आव्हान केले आहे.
पाकिस्तानची पूर्ण अर्थव्यवस्था चाळीस हजार कोटीची आहे मात्र पाकिस्तानवर सध्या दीड लाख कोटीचे कर्ज आहे. पाकिस्तानच्या बँका कर्जाखाली बुडून गेल्या आहेत. पाकिस्तान सरकार जेवढा कर सामान्य पाकिस्तानी लोकांकडून घेत आहे ते सगळे पैसे घेतलेल्या कर्जाचे व्याज भरण्यातच जात आहे. आज पर्यंत पाकिस्तानच्या प्रत्येक सरकारने आपल्या कडे म्हणतात तसे, “रिण काढून सण साजरे केले आहेत”. पाकिस्ताननं उत्पन्न नसताना ज्या देशाकडून कर्ज मिळेल तिथून कर्ज घेतलं. सौदी अरेबिया, अमेरिका, चीन असा कुठलाही देश पाकिस्तानने सोडला नाही. फुकटात मिळतंय असं समजून कर्ज ऐपतीपेक्षा जास्त घेतलं. कर्जाच्या ओझ्यात पाकिस्तान आता पूर्ण बुडून गेला आहे.
ऐपत विसरल्याचे फळ
माणसं जेंव्हा आपली ऐपत विसरतात तेंव्हा जे नाही करायला पाहिजे ते करतात. पाकिस्तानने पण त्यांची ऐपत विसरली. पाकिस्तानला कळायला पाहिजे होते. आपण जे कर्ज घेत आहोत ते कधी ना कधी परत करावे लागेल. पण पाकिस्तानने कर्जाच्या जीवावर भारताची बरोबरी करायचा प्रयत्न केला. भारताच्या विरोधात लढण्यासाठी अमेरिका आणि चीनेने पाकिस्तानला भरमसाठ कर्ज दिली आणि पाकिस्तानने पण कर्जाच्या जीवावर मज्जा केली. आपल्याकडे जसे म्हणतात बापाने घेतलेले कर्ज पोराला फेडावेच लागते. पैसे बुडत नसतात. तसेच पाकिस्तानच्या आधीच्या सरकारांनी घेतलेले कर्ज इम्रान खान यांच्या सरकारला आणि लोकांना मिळून फेडावे लागणार आहे.
आता पाकिस्तान कुणाकडे भीक मागणार?
कर्जाचा बोजा एवढा वाढला आहे कि पाकिस्तानला कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घ्यावं लागणार आहे. पाकिस्तानचे धंदे सगळया जगाला माहित आहेत. जगभरातील दहशदवादी पाकिस्तानातच आहेत. पाकिस्तान सरकार त्यांना काहीही करत नाही. दहशतवाद्यांना पाकिस्तानी सरकारचा वरदहस्त आहे त्यामुळे कुठलाही देश पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करायला तयार नाही. पहिले घेतलेले कर्जच पाकिस्तानची परत फेड करायची ऐपत उरली नसल्यामुळे देखील पाकिस्तानला नवीन कर्ज द्यायला कोणताही देश पुढे येत नाही. कारण पाकिस्तानला कर्ज द्यायचे म्हणजे आपले पैसे बुडाले असाच बाकी देशांचा समज झाला आहे.
घेतलेले कर्ज तर परत करावेच लागणार आहे आणि ते कर्ज पाकिस्तान त्याच्या उत्पन्नातून परत करतील तेवढे त्यांचे उत्पन्न नाही. त्यामुळे कुठल्यातरी देशाकडे पाकिस्तानला भीक मागण्याशिवाय पर्याय नाही. पाकिस्तानला कोणता देश भीक देतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषेत सांगायचं झालं तर,”पाकिस्तानचा कर्ज घेऊन घेऊन करेक्ट कार्यक्रम झाला आहे.”
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !