मागच्या एक आठवड्यापासून पाकिस्तान चर्चेत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्या विरोधात विरोधकांनी त्यांच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला होता. इम्रान यांच्या बाजूने खासदार नव्हते, त्यांचे बहुमत गेले होते. ३ एप्रिलला संसदेत त्यावर मतदान होणार होते. नियमांप्रमाणे मतदान व्हायला हवे होते पण बहुमत नसल्यामुळे इम्रान खान यांनी विरोधकांना गुगली टाकली आणि पाकिस्तानची संसद रद्द करून घेतली. ९० दिवसात नव्या निवडणुकांची घोषणा केली; पण इम्रान खान यांना पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने बोल्ड केले आहे. इम्रान सरकारचा संसद बरखास्तीची निर्णय अवैध ठरवला आहे. नव्याने निवडणूक घेणे, अविश्वास प्रस्तावावर मतदान न घेणे पाकिस्तानी संविधानाच्या नियमात बसत नाही म्हणून न्यायधीशांनी सरकारचा निर्णय रद्द केला आणि पाकिस्तानी संसद चालू ठेवावी असा निर्णय दिला. पाकिस्तान मध्ये नेमकं काय झालं होतं, नियमबाह्य जाऊन इम्रान खान यांनी संसद बरखास्त का केली होती आणि आता पाकिस्तान मध्ये काय होईल याचा आढावा आपण घेऊ.
अनुच्छेद सहाचा वापर करत संसद बरखास्त केली
इम्रान खानचे सरकार खूप दिवसांपासून अडचणीत आले होते. युतीत असणारे पक्ष इम्रान खानवर खुश नव्हते त्यामुळे त्यांनी इम्रान खान सरकारचा पाठिंबा काढून घ्यायची घोषणा केली होती. सरकारमध्ये बेबनाव आहे याचा फायदा विरोधकांनी घेतला आणि त्यांनी २५ मार्चला संसदेत इम्रान खान सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला. संसदेच्या नियमानुसार अविश्वास प्रस्ताव आल्यावर त्यावर मतदान होणार होते. पाकिस्तानी संसदेच्या अध्यक्षांनी ३ एप्रिलला मतदान ठेवले होते. इम्रान खान सरकार जवळ ८ दिवसांचा वेळ होता पाठिंबा मिळवण्यासाठी नाहीतर सरकारवरून पायउतार होण्याशिवाय पर्याय नव्हता. अनेक प्रयत्न करून देखील इम्रान खान यांना पाठिंबा जमवणे शक्य झाले नाही. त्यामुळे इम्रान खान सरकारला पायउतार व्हावे लागणार होते. पण इम्रान खान यांनी अनुच्छेद सहाचा वापर केला आणि संसद रद्द केली.
पाकिस्तानी संविधानातील अनुच्छेद सहा मध्ये एक विशेष प्रावधान करून ठेवले आहे. अनुच्छेद सहा नुसार जर पाकिस्तानी सरकारला वाटले कि देशावर संकट आले आहे. देशाचे विरोधक पाकिस्तान सरकारला पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. अश्या वेळेला पाकिस्तान सरकार संसद बरखास्त करू शकते आणि नव्याने निवडणूक घेऊ शकते.
इम्रान खान सरकरचे विरोधक अमेरिकेकडुन पैसे घेऊन सरकार पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे देशावर संकट आले आहे. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी अनुच्छेद सहाचा वापर करत इम्रान खान सरकारने संसद बरखास्त करण्याची मागणी संसदेच्या अध्यक्षांकडे केली. सरकारचा निर्णय अध्यक्षांनी स्वीकारला आणि संसद बरखास्त केली.
हा लोकशाहीचा खून आहे आम्ही कोर्टात जाणार
इम्रान खानचे विरोधक सरकारच्या निर्णयाने शॉक झाले होते. त्यांना असा निर्णय अपेक्षित नव्हता. इम्रान सरकार जाणार हे फिक्स होत त्यामळे विरोधकांनी सरकार बनवण्याची तयारी केली होती. पण इम्रान खान यांनी सर्वाना धक्का दिला. नव्याने निवडणुकांना सामोरे गेल्यावर इम्रान खान परत सत्तेत येतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच इम्रान यांनी नव्याने निवडणुका लावल्या होत्या.
इम्रान खान यांच्या विरोधकांनी त्याच्यावर टीकांच्या तोफा डागल्या होत्या. बेनिझूर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांनी तर हा लोकशाहीचा खून आहे असं म्हंटल होतं. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मारियम नवाझ यांनी तर इम्रान खान देशद्रोही असल्याचे जाहीर केले. मरियम यांनी इम्रान खान यांच्यावर अनुच्छेद पाच नुसार देशद्रोहाची कारवाही व्हावी म्हणून मागणी केली होती. विरोधकांना सरकारचा निर्णय स्वीकारण्या शिवाय पर्याय नव्हता पण आम्ही कोर्टात जाणार असल्याचे विरोधकांनी सांगितले होते.
इम्रान खान सरकारचा निर्णय त्यांनी कोर्टात चॅलेंज केला आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला. कोर्टाने निकाल दिल्यावर बिलावल भुट्टो यांनी ट्विट करत निकालाचे स्वागत केले आहे.
कोर्टाच्या निर्णयामुळे इम्रानची खुर्ची जाणार
सरकार वाचवण्याचे सगळे प्रयत्न करून देखील सरकार वाचत नाही असं वाटल्यावर इम्रान खान यांनी असा टोकाचा निर्णय घेतला होता. पण , संसदचे सभापती कासिम खान सूरी यांचा अविश्वास प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचं सांगताच संसदेत अविश्वास ठरावावर मतदान घ्यावं, असं ही सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यामुळे आज ९ एप्रिलला इम्रान सरकारला अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. इम्रान सरकार आज पडू शकते. पण इम्रान खान यांचे यांचे सरकार गेल्यावर कोण सत्तेत येईल, कोण पंतप्रधान होईल याची विरोधकांकडे रूपरेखा नाही असं पाकिस्तानच्या राजकारण लिहणारे पत्रकार सांगत आहेत. त्यामुळे किमान काही दिवस तरी पाकिस्तान राजकीय दृष्ट्या अस्थिर राहणार आहे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !