फेब्रुवारी २०१९ ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम किसान’ हि योजना लागू केली. प्रामुख्यानी अल्प भूदाराक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे या योजनेचा उद्देश होता. २०१९ पासून पीएम किसान योजना पश्चिम बंगाल आणि तेलंगणा राज्य सोडता संपूर्ण देशात लागू आहे. या दोन राज्यांच्या त्यांच्या योजना आहेत. त्यांच्या स्वतःच्या योजनेच्या माध्यमातून ते त्यांचं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतात. पीएम किसान योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयाची मदत केली जाते. आर्थिक मदत तीन टप्यात केली जाते. जानेवारी, एप्रिल आणि ऑगस्ट अश्या तीन टप्यात २००० रु ची मदत शेतकऱ्यांना दिली जाते. पीएम किसान योजेनचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. अनके शेतकरी तर पीएम किसान योजनेच्या पैश्याला मोदींचे पैसे म्हणत असतात.
२०२२ चा पहिला हप्ता जानेवारीच्या पहिल्या तारखेला जमा झाला आहे. एप्रिल महिन्याचा दुसरा हप्ता आणखी जमा व्हायचा बाकी आहे. नेहमी १ एप्रिलला जमा होत असतो मात्र या वेळेला सरकारने योजनेत नवे नियम आणले आहेत. त्यामुळे हा हप्ता पुढच्या महिन्यात मिळू शकतो. योजनेत पारदर्शकता यावी या मागचा उद्देश आहे. पीएम किसानचा हप्ता वेळॊवर मिळवा यासाठी हे नवे नियम काय आहेत आपण समजून घेतले पाहिजेत. तुम्ही समजून घेतल्यावर दुसऱ्या शेतकरी बांधवाना देखील या नियमांच्या बद्दल सांगा म्हणजे कोणताही शेतकरी योजेनेपासून दूर राहणार नाही.
बदल काय झालेत ?
वर सांगितल्याप्रमाणे सरकारने दोन नियम आणले आहेत. त्यातला पहिला नियम म्हणजे, पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तर दुसरा बदल आहे, पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार कार्डाशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
नव्या नियमांची पूर्तता केली नाही तर इथून पुढचे म्हणजे एप्रिल महिन्यापासून पुढचे हप्ते संबंधित शेतकऱ्याला मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
ई-केवायसी कसं करायचं ?
जे शेतकरी बँकेचे व्यवहार करतात त्यांना केवायसी बद्दल माहिती असेल. इंग्रजी मध्ये त्याला KNOW YOUR CUSTOMER म्हणतात. आपला ग्राहक कोण आहे याची ते पडताळणी करत असतात. त्यासाठी तुमचे कागदपत्र त्यांना तापसण्यासाठी द्यावे लागतात. ई-केवायसी देखील फार वेगळं नसतं. eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते. याआधी आधार कार्ड ज्या मोबाईल फोनला लिंक केलेला आहे, त्यावर ओटीपी पाठवून शेतकरी स्वत: ई-केवायसी करू शकत होते. पण, आता केंद्र सरकारनं ही सुविधा स्थगित केली आहे. “त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळच्या सेवा केंद्रावर (सीएससी ) जाऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून घ्यावे. ई-केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख 31 मे 2022 ही असेल.”
आधार कार्ड बँक खात्याला जोडून घ्या
महाराष्ट्राचे कृषी गणना उपायुक्त ‘विनयकुमार आवटे’ यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील 1 कोटी 6 लाख 53 हजार 329 येवढ्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे आणि ते योजनेचा लाभ घेतात. यापैकी 88 लाख 74 हजार 872 लाभार्थ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहेत. तर 17 लाख 78 हजार 283 लाभार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाहीये. त्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते तपासून पाहावं. बँक खात्याशी आधार लिंक नसल्यास ते त्वरित करून घ्यावं. सरकारी सेवा केंद्रावर ते करून मिळतं.
ई-केवायसी आणि आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुम्ही तर करूनच घ्या पण हि माहिती आपल्याला जवळच्या सर्व शेतकरी बांधवाना द्या. अनेक शेतकऱ्यांना ह्या सर्व गोष्टी समजत नाहीत त्यांना मदत करा. शेतकऱ्यांनी एकमेकांना मदत करायला शिकलं पाहिजे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !