मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स , टेस्लाचा एलोन मस्क आणि फेसबुकचा झुगरबेर्ग आपल्या देशात सगळ्यांना माहिती आहे पण आपल्याच देशातला ‘जयंती कनानी’ विचारलं तर कोणाला माहिती पण नसेल. हे आपल्या देशाचं दुर्दैव्य आहे. आपले माणसे किती पण मोठे झाले तरी त्याचं कौतुक करायला आपल्याला वेळ नाही. अहमदाबादच्या खाणीत काम करणार्या कामगाराच्या पोरांनी जयंती कनानी याने ११ बिलियनची कंपनी उभा केलीय. जयंती कनानीचा संघर्ष सर्वानी अभ्यास करण्याजोगा आहे.
सहा हजार रुपयापासून सुरुवात केली होती..
जयंती कनानी मूळचा गुजरातच्या अहमदाबादचा. घरची गरिबी असल्यामुळे वडील अहमदाबाद मधेच हिऱ्याच्या खाणीत कामाला होते. अहमदाबाद मध्ये हिऱ्याचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो. जयंती लहान असताना वडिलांना कॅन्सर झाला. घराचे सर्व त्यांच्या खर्चंट जायला लागले. त्यामुळे जयंतीला सरकारी शाळेत शिकण्याशिवाय पर्याय नव्हता. जयंतीचे शिक्षण अहमदाबादच्या सरकारी शाळेत झाले. बारावी झाल्यावर जयंतीने अभियांत्रिकीला प्रवेश घेतला आणि त्याच नशीब बदललं. अभियांत्रिकीचा अभ्यास पूर्ण झाल्यावर जयंती नोकरीसाठी पुण्यात आला. महिन्याला सहा हजार त्याला मिळायचे. पण पुण्यात त्याला चांगले मित्र मिळाले. त्याच मित्रानं सोबतीत जयंती ने नंतर पॉलिगॉन नावाची क्रिप्टो करन्सी काढली.
गेम ऑफ थ्रोन्स साठी पहिली वेबसाईट काढली..
२०१७ ला भारतात हॉलिवूडची गेम ऑफ थ्रोन्स नावाची वेब सिरीस खूप प्रसिद्ध झाली होती. पुढच्या भागात काय असेल लोकांमध्ये अश्या चर्चा व्हायच्या. लोक करत असलेल्या चर्चांमध्ये जयंती कनानीला संधी वाटली. हाऊसिंग डॉट कॉम मध्ये करत असलेल्या जनतेने नोकरी सोडली आणि लोक करत असलेल्या चर्चाना त्यानां एक वेबसाईट उपलब्द करून दिली. जयंतीच्या वेबसाईट वर भारत आणि भारताबाहेरचे लोक आले. गेम ऑफ थ्रोन्सच्या पुढच्या भागात कोणते कॅरेक्टर काय करेल यांच्या चर्चा व्हायच्या. वेबसाईटच्या माध्यमातून जयंती कनानीला व्यवसायाचा अनुभव आला. आणि त्याने दोन वर्षानंतर त्याचा यशस्वी व्यवसाय उभा केला.
पॉलिगॉनला जयंती कनानीने दोन वर्षातच ११ बिलियनची केली.
बिट कॉइन मुळे जगभरात क्रिप्टो करन्सी खूप वाढल्या होत्या. अनेक लोक त्यांचे पैसे क्रिप्टो मध्ये टाकत होते. साहजिकच त्यामुळे भारतात पण अनेक क्रिप्टो करंसीस निघाल्या. आपण पण क्रिप्टो करन्सी बनवू शकतो याची कल्पना जयंतीला होती. पण सुरुवातीला हे शक्य आहे असं त्याला वाटायचं नाही. २०१९ डिसेंबर मध्ये सर्व अभ्यास आणि नियोजन करून जयंती आणि त्यांच्या मित्रांनी मिळून पॉलिगॉन नावाची क्रिप्टो करन्सी सुरु केली. सुरुवातीच्या काळात पॉलिगॉनला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता पण जयंती आणि त्याच्या टीमच्या मेहनतीने ग्राहकांनचा विश्वास मिळवला. ग्राहक हळू हळू पॉलिगॉन कडे यायला लागले. दोन वर्षात पॉलिगॉन कडे १३.५ कोटी ग्राहक आले. भारतातल्या बाकी सर्व क्रिप्टो करन्सी पेक्षा पॉलीगोन मोठी झाली आहे. आजच्या बाजार भावानुसार पॉलिगॉनची किंमत ११ बिलिओयान अमेरिकन डॉलर आहे.
जयंती कनानीची गोष्ट सर्वाना समजली पाहिजे.
यशस्वी झालेल्या लोकांच्या कहाण्या जे लोक संघर्ष करत आहेत त्यांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे यशस्वी लोकांबद्दल नेहमी चर्चा व्हायला हवी. जयंती कनानीने ज्या पद्धतीने गरीब घरातून येऊन पॉलिगॉन सारखी कंपनी उभा केली ते प्रेरणादायी आहे. जगभरातल्या सर्व यशस्वी लोकांबद्दल आपल्याला माहिती असते पण आपल्याला आपल्या देशातल्या उदोजकांबद्दल माहिती असायला हवी.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !