महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात नेहमीच मतभेद होत असतात. सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी भगत सिंग कोश्यारी सोडताना दिसत नाहीत. सरकारने १२ आमदार निवडीचे पत्र कोश्यारीना दिले होते पण भगत सिंग कोश्यारीनी पुढे काय ते सरकवले नाही. मग सरकारने पण त्यांचे विद्यापीठातले अधिकार कमी केले. आणि आता विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून कोश्यारी आणि सरकार यांच्यात वाद सुरु झाला आहे. सरकार आणि कोश्यारी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे पण कोश्यारी काय साधे सरळ राजकारणी नाहीत. त्यामुळे जर सरकार आणि राज्यपालांमधील वाद समजून घ्यायचा असेल तर कोश्यारींचा इतिहास समजून घेणे महत्वाचे आहे.
राजकारणात येण्यापूर्वीच कोश्यारी.
१७ जुन १९४२ ला भगत सिंग कोश्यारी यांचा उत्तराखंड मधील भागेश्वर जिल्ह्यात जन्म झाला. प्राथमिक शिक्षण गावामध्ये घेतल्यावर कोश्यारी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी उत्तर प्रदेशच्या आग्रा इथे आले. आग्रा विद्यापीठातून कोश्यारी यांनी इंग्लिश विषयात पदवी घेतली. विद्यापीठातच कोश्यारी विद्यार्थी चळवळीकडे आकर्षिले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जायला त्यांनी सुरु केले. विद्यापीठात आंदोलने आणि मोर्चे यात कोश्यारी सक्रिय झाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन कोश्यारी विद्यापीठात संघर्ष करत. आणीबाणीच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये देखील कोश्यारी सहभागी झाले होते.
कोश्यारींचे राजकीय आयुष्य
भगत सिंग कोश्यारीनी त्यांच्या राजकीय आयुष्यात खूप चढ उतार अनुभवले आहेत. २००० साली अटल बिहारी सरकारने उत्तरप्रदेशचे विभाजन करून उत्तराखंड राज्याची स्थापना केली. नव्या उत्तराखंड राज्याची जबाबदारी भाजपने भगत सिंग कोश्यारी आणि सहकाऱ्यांकडे सोपवली. २००१ मध्ये त्यांना भाजपने राज्याचे मुख्यमंत्री देखील केले पण २००२ मध्ये राज्यात निवडणूक झाल्या आणि उत्तराखंडमध्ये भाजपचा जोरदार पराभव होऊन काँग्रेस सत्तेत आली. पुढचे पाच वर्ष भगत सिंग कोश्यारी उत्तराखंड राज्याचे विरोधी पक्ष नेते राहिले. २००७ च्या निवडणुकीत कोश्यारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपला राज्यात परत सत्तेत आणले. मात्र केंद्रीय भाजपने कोश्यारीना मुख्यमंत्री पद नाकारले. भूवम चंद्र यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री केले. मुख्यमंत्री पद नाकारल्यावर कोश्यारीना भाजपने दिल्लीत बोलवले आणि २००७ पासून भगत सिंग कोश्यारी भाजपच्या पक्ष संघटनाचे काम करत आहेत. २०१८ ला भाजपने त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पाठवले तेंव्हापासून भगत सिंग कोश्यारी नेहमी चर्चेत असतात.
राजकारणापलीकडचे कोश्यारी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाकी नेत्यांप्रमाणे भगत सिंग कोश्यारी देखील अविवाहित आहेत. लग्न न करण्याची संघांच्या कार्यकर्त्यांची परंपरा आहे. राजकारणाशिवाय कोश्यारी शिक्षक देखील आहेत. महाविद्यालयात त्यांनी शिकवणायचे काम केले आहे. विविध वर्तमानपत्रात कोश्यारी लेख पण लिहीत असतात. “उत्तरांचल प्रदेश क्यू” आणि “उत्तरांचल प्रदेश कि समस्या और समाधान” नावाने कोश्यारींचे दोन हिंदी पुस्तकं देखील प्रसिद्ध झाले आहेत.
साधारपणे राज्यपाल हे कुठल्याही पक्षाचे नसतात किंवा त्यांना तसे राहावे लागते पण भगत सिंग कोश्यारींचा मोठा काळ भाजप पक्षात गेल्यामुळे ते भाजपाची बाजू घेत आहेत असा त्यांच्यावर आरोप होत आहे. राजकारणाची पार्श्वभूमी असलेले राज्यपाल कोश्यारी आणि सरकार यांचा मधील मतभेद कधी संपतात पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे खास आपल्यासाठी
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
संघाच्या शाखांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी १० हजार तिरंगा शाखा काढणार